Posts

Showing posts from 2014

सुगंधी जखमा

Image
आपला जन्म मुळातच मरण्यासाठी झालेला आहे, यावर त्याचा ठाम विश्वास होता. जगण्यासाठी जन्माला आलेल्यांना हे तो किंचाळून किंचाळून सांगू लागला होता. त्याला मरणाची एवढी ओढ लागली होती, की तो मरणावर प्रेम करायला लागला. मरण्यासाठी जगू लागला. कधीतरी श्वासांना थांबवायचंय म्हणून तो प्रत्येक श्वास मोजायला लागला. हृदयाच्या ठोक्यांचा अंतर्मुख करणारा आवाज त्याला मरणाची साद घालत होता. तल्लीन होउन, डोळे मिटून तो मरणाची वाट बघत होता. आणि तेव्हा त्याला फराज च्या दोन ओळी आठवल्या. वफ़ा के ख़्वाब मुहब्बत का आसरा ले जा अगर चला है तो जो कुछ मुझे दिया , ले जा ... कधी कोणे एके काळी तो कोणावर तरी प्रेम करुन हरला असेल. अदरवाईज अशी गझल कुणाला का आठवावी. तशाच मिटलेल्या डोळ्यांनी तो देशी दारुच्या त्या दुकानासमोर निमुटपणे जेव्हा झोपी गेला तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. पहाटेची चाहूल लागत होती. कुत्रे आळसावलेल्या आवाजात भुंकत होते. रुममेटचा फोन लागत नाही म्हणून आम्ही तीघे त्याला शोधायला बाहेर पडलो. नेहमीच्या नाक्यांवर चक्रा मारल्या. रात्रभर धावपळ. पोलिसांत जाण्याअगोदर १० वेळा विचार केला. पोलिसांकडे जायला तशी

सांगण्यासारखी गोष्ट अशी... की

Image
२०१४ आता संपायला आलंय. या वर्षात नाय बरेच डॉक्युमेन्ट्रीचे प्रोजेक्ट करायचं ठरवलेल. नाय नाय म्हणता त्यातले बरेच अर्धवट राहीले. काही फक्त डोक्यात अजूनही निपचित एका कोप-यात पडून आहेत. काहीं बद्दल खूपदा फॉलो अप करुनही एक्जिक्यूट करायला जमलेच नाहीत. असं सगळं असतानाही खूप समाधानकारक वर्ष होतं २०१४ असं म्हणायला हरकत नाही. या वर्षात अधिकाधिक कमरशिअल होत असतानाही स्वतःला करावेसे वाटणारे प्रोजेक्ट करता आले.. त्या साठी नोकरी सोडावी लागली नाही, याचं मला विशेष कौतुक वाटतंय. माझं मीच अभिनंदन करतो... सांगण्यासारखी गोष्ट अशी... की गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात माझ्या हातून एक भयंकर अपघात घडला. संध्याकाळची वेळ होती. देवगड हून गोव्याला बहीणीकडे तिचीच वँगेनार गाडी घेउन निघालो होतो. सोबत आई बाबा, आणि बहीणीचे सासरे होते. एकूण आम्ही चौघे जण. आमच्या घरात बाईमाणूस सहसा कधी ड्रायवर च्या बाजूच्या सीटवर बसत नाही. हे असं का ते विचारलं नाही कधी.. पण आई एकटीच स्त्री कँटेगरी मध्ये असल्यामुळे मी तिला त्या दिवशी पुढे बसायला सांगितलं. त्याप्रमाणे ती बसलीही. साधारणपणे संध्याकाळी चार च्या दरम्यान आम्ही

होणा-या 'लाडक्या' बायकोसाठी

Dear Wife, Greeting from your future husband. I don’t know if we have met till now. I might be someone you know really well or someone you have just met. I hope it’s the former. One thing I will make sure is that you are not forced to do anything. Free will is the right of every human being irrespective of their sex. This is not a romantic letter. This is a monologue about what you can expect in the future. Between the time of writing this letter and meeting/marrying you, a lot of things might change. We will change and our perceptions of a lot of things will change and that’s alright. Change is good. I wrote a letter to  our future daughter/son  a few days ago so I guess reading that first would tell you a lot about how I think. The things stated in the above the letters are just the things I want to do. There will be things that you want to do. We will work together to make a list that we want to do. This is not limited to just this aspect of our life. It will be f

...माझा महाराष्ट्र?

Image
निवडणूका जवळ आल्या कीच राजकिय घडामोडींना उधाण येत. स्वाभाविकच आहे ते. पण २५ तारिख इतिहासात नोंदवली गेली. २०१४ च्या घटस्थापनेच्या दिवशी असा राजकिय इतिहास घडेल याची जराही अपेक्षा नव्हती. आघाडी मध्ये बिघाड झाल्याच जराही आश्चर्य नव्हतं. पण दोन्ही युत्या एकाच दिवाशी तुटल्यामुळे वर्ल्ड ब्रेकअप डे साजरा झाल्या सारखं वाटलं. राजकारणातलं मला १ टक्का ही कळत नाही. त्यामुळे मला त्याच्यातले अंदाज वगैरे लावता येत नाहीत. पत्रकार कुठलाही असला तरी राजकारण हा त्याचा फेव्हरेट हॉट टॉपिक आहे आणि नेहमीच राहील. असं असताना राजकारणातल्या अभ्यासापासून मी काहीसा लांबच राहत आलोय. पण तरी यंदा ज्या काही चर्चांना उधाण आलंय, वेगवेगळे निष्कर्ष लावले जातायेत..त्यांचा एकूणच आढावा घेतला तर माझ्या मनात खुप प्रश्न कल्ला करतायेत. त्यातले काही अगदीच बाळबोध आणि टुकार असले तरी ते प्रश्न जिवंत आहेत...आपण जाणकार असाल तर यावर बोलावं...मार्गदर्शन करावं... हक्कानं समजवावं... सेनेला १५१ जागा हव्या होत्या पण त्यातल्या अर्ध्या तरी कन्फर्म निवडून येतील असं होतं का.. उद्धव यांनी मुख्यमंत्री होण्याआधी नगरसेवकाच तरी काम केलंय

सॉरी रे बाप्पा..

Image
ऐ बाप्पा.. ऐकतोयेस ना... तुझ्याशी बोलायचं होतं.. थोडं प्रायव्हेट होतं.. आहेस का तू ऑनलाईन...यू देअर...  ऑनलाईन दिसतोयेस तरी पण एका शब्दाने तुझा रिप्लाय नाही.. हे काही बरोबर नाही हा... मला राग येतोय आता तुझा... माझी सटकायच्या आधी प्लीज बोल ना काहीतरी.. अँटलिस्ट एखादी स्मायली तरी पाठव.. जेणेकरुन तू ऐकतोयस याची खात्री होईल मनाला.. बरं जाउदे.. मी सांगायचं काम करतो... ऐक.. मी काय म्ह णतो..   ते खरं तर तुला उद्या आणायला हवं होतं ना लोकांनी.. पण चारचार पाचपाच दिवस आधीच मंडपात आलायेस तू.. ठिक आहे.. कळतंय मला की तू बौअर झाला असशील कारण सोबत कोणी नसेल तुझ्या... पण उद्यापासून चांदीच आहे ना तुझी... पुढचे दहा दिवस तुझेच की... मग काय वर्षभर मोकळे आहेतच की सगळे.. वर्षभर चर्चा तर होणारच ना... असो.. त्याचं काय झालं की लेख वगैरे वाचले रे मी तुझ्या उत्सवावरचे.. खूप बदलला वगैरे आहेस म्हणे तू... पेपरात बिपरात चर्चा आहे फुल ऑन... चेंच तर पायजेच ना राव... तो तुझा लालबागचा फंटर आहे ना... यंदा भारी काम झालंय बग त्याच्या डेकोरेशन चं.. हा.. आठवलं.. एक्च्युली एक डाउट होता.. ह्या ज्या तुझ्या एवढ्या सा

रोखठोक नाना

Image
नाना पाटेकर वर आपण कितीही जोक मारले.. कितीही जरी त्याची मिमिक्री केली किंवा कितीही चेष्ठा केली तरी त्याच्या अभिनयाबद्दल, त्याच्या कलेबद्दल, त्याच्या बोलण्याबद्दल आणि लिहीण्याबद्दलचं त्याचं जे जिवंत आणि खरोखरी असणं आहे, त्याचा आपल्यावर एक प्रकारचा प्रभाव आहेच. तो प्रभाव आपण नाकारु शकत नाही. मग त्याचं सध्या असलेलं शेतात राहणं असो... आनंदवन ला पैसे द्यायचे होते म्हणून केलेला वेलकम सिनेमा असू दे... राजकारण्यांच्या इव्हेन्ट मध्ये जाउन त्यांच्यावरच तोंडसुख घेण्याचा त्याचा खोडकर स्वभाव असू दे.. त्याची अभिनयची स्वतःची अशी शैली असू दे किंवा त्याचं नुसतंच बोलणं असू दे.. लागबागच्या राजाचं लाईनमध्ये उभं राउन दर्शन घेणं असू दे.. त्याचं सामाजिक भान असू दे किंवा मग त्याचं लिखाण असू दे... विवेक नावांच एक साप्ताहिक आहे. सुप्रसिद्ध वगैरे म्हणू शकतो आपण त्याला. आमचा छोटा भाउ त्या साप्ताहिकात असल्यामुळे त्या साप्ताहिकाबद्दल आम्हाला थोडीफार आस्था. या सात्पाहिकासाठी नाना पाटेकर ने एक लेख लिहीला होता. निमित्त होतं गुरुपौर्णिमेच. लेख छापून येण्याआधीच नाना चा लेख येणार आहे हे कळालेलं. आमचा छोटा भाउ ..विवेक

तुझे गरम ओठ ओठावर टेकलेस तेव्हा

Image
नारायण सुर्वे. एक विद्रोही, बंडखोर कवी. ते आणि त्यांच्या कवितांवर एक सुंदर माहितीपट बनलेला आहे. माहितीपट ग्रेटच. त्यात किशोर कदम सारख्या कवी मनाच्या अभिनेत्यानी साकारलेली नारायणाची व्यक्तिरेखाही तितकीच सरस. माहितीपटामध्ये ही कविता ऐकलेल्याच आठवत नाही. माहितीपटाचा विषय ही थोडासा गिरणी कामगारांच्या लढ्याचे रंग दाखवणारा असाच होता. त्यामुळे कदाचित ही कविता त्यात समाविष्ट करता आली नसावी. नक्षत्रांचे देणे कार्यक्रमाचे यु ट्ब वर व्हीडीओ पाहत असताना त्यात नारायण ची ही कविता चंद्रकांत काळेंनी सुरेख सादर केलेली. दिवसभर डोक्यात कविता फिरत होती. त्याच दिवशी रात्री गुरु भेटला. गप्पा मारताना ह्या कवितेची याद आली. कवितांचा विषय निघाला. आणि अनायसे त्याच्याकडे असलेल्या कवितेच्या पुस्तकांमध्ये ही कविता असलेल्याचं कळालं. पुस्तकच ठेउन घेतलं. रात्रीत जवळपास अख्खं पुस्तक फस्त केल वाचून. पुस्तकातल्या इतर कविताही ग्रेट आहेत. पण सुर्वेंची सत्य भारीच. कवितेंच नाव – सत्य. एवढं साधं सोप्प सत्य कवितेत मांडता येऊ शकतं याच कौतुक वाटतंय. नेहमीच वाटत राहिल. कविता संग्रही असावी म्हणून खाली कॉपी पेश्ट... तुझे ग

परत..

  साधारण सात महिन्यांचा तो काळ आहे. जानेवारी पासून ते आत्ता आत्ता काल परवा पर्यंतचा. या दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या मानसिकतेमधनं जाता आलं. जावं लागलं. त्यातल्या काही मानसिकता खूप घाबरवणा-या होत्या. काही खूप उत्साहीत करणा-या. काही खूप विचित्र तर काही अतिशय मार्मिक होत्या. त्या सगळ्यांचच स्वागत करायला हवं. त्यांना स्वीकारायला हवंय. त्या निमित्ताने हे सगळं विवेचन.. होय. मी टीव्ही ९ सोडलंय आणि त्याला आता दीड वर्ष झालंय. खूप लोकांना अजूनही अस्संच वाट्टं की मी टीव्ही ९ मध्ये अजूनही काम करतोय. त्या बद्दल थोडंस. मीडीयात …मेन स्ट्रीम मिडीयात मी तीन महिने होतो. झोकून काम केलं टीव्हीत असताना. वेळेची पर्वा वगैरे केली नाही. तीन शीफ्ट सलग काम करण्याचे परिणामही भोगले. पण टीव्हीत काम करणं हे घरच्यांना, नातेवाईकांना आणि परिचयाच्या माणसांना सांगण्यासाठी म्हणून सोडलं तर त्यात जराही ग्रेटनेस नाही. टीव्हीत तोचतोच पणा आहे. वरवर सांगताना सगळे सिनिअर्स नवेपणाचा ढोंग करतात पण त्यांना कोणीतरी सिनिअर असतो आणि त्यांना काही अलिखित नियम फॉलो करावे लागतात, याचा प्रत्यय टीव्हीतल्या पहिल्या नोकरीत आला.