Posts

Showing posts from February, 2012

कोण आहे रे तिकडे जिवंत??

Image
शायद वहा पहोचे ना जमाने की नजर जो जख्म मुझे तेरी मोहब्बत ने दिये है.... असं गालिब म्हणतो... जख्मी होण ं हे जिवतपणाचं लक्षण आहे... या जिवंतपणा वर लिहायचं होतं...कारण एका मित्राने एक साधा प्रश्न विचारलेला मला. आपण बस ट्रेन मधून फिरतो... आपल्या बाजूला बसलेला-उभा असलेला माणूस कोण आहे हे आपल्याला का माहित नसतं...? अस्वस्थच झालो... आयुष्याचं होतं तेवढं सगळं ज्ञान पाझळावं असं वाटलं... म्हणून मग हे लिहावंस वाटलं...! लेखांच नाव आहे - 'कोण आहे रे तिकडे जिवंत..?'      गिरगाव व्हाय दादर हे नाटक पाहिलं... ब-याच दिवसांपासून पाहायचं राहिलेलं... मित्रांकडून खूपसं चांगलंच एकून होतो नाटकाबद्दल... त्यामुळे अपेक्षा ही ब-याच होत्या... आणि त्यातल्या ब-याच पूर्ण झाल्या... नाटक पाहिल्यावर मी आणि एक मैत्रीण त्यातल्या ब-याचशा गोष्टींवर टिका करत होतो... सुधार सुचवत होतो... पण त्या नाटकाच्या प्रयत्नाला आमचा सलाम होता... आणि अजून चार एक लोकांना घेउन पुन्हा येउ नाटकाला असं ठरलं होतं... मात्र हे नाटक पाहण्याआधी किंवा कोणतंही नाटक पाहण्याआधी आणि नंतर... जग तेच होतं...तेच राहणार आहे, पण आता का

हा पिक्चर पाहायला याल ना...विनंती आहे

Image
मुंबई फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने चिक्कार सिनेमे आणि लघुपट, माहितपट पाहिले. ते दळवी सरांनी दाखविले. त्यांचे सहृदय आभार. पण ज्या दिवशी ते नव्हते आले तेव्हा एक आनंद पटवर्धन यांची डॉक्युमेन्ट्री पाहिली. तिचं नावं..... जय भिम कॉम्रेड...! १९९७ मध्ये रमाभाई आंबेडकर चाळीत गोळीबार झाला. ह्या गोष्टीला आज च्या तारखेला १५ वर्ष झाली. या गोळीबाराचे परिणाम असूनही घडताना दिसत आहेत. १० दलितांचे या गोळीबारात नाहक बळी गेले. झालेल्या प्रकारानंतर वातावरण बराच काळ तंग होतं. तेव्हाचा मिडीया मध्ये आताइतका इलेक्ट्रोननिक स्पीड आणि अद्ययावत नव्हता. हा सगळा प्रकार पंधरा वर्षांनी आता कसा झालाय, हे नुकतच मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मधील या डॉक्युमेन्ट्री मध्ये पाहायला मिळाला. काही दिवसांपूर्वी फेसबूक वर एका मूलासोबत हिंदूत्व आणि हिंदूत्वाचा अभिमान यावर मी आणि माझ्या मित्राने वाद घातला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भांडणारे कट्टर मराठे आणि मराठी असून कोणतीच ठोस भूमिका न घेणारे सामान्य लोक, अशी लढाई सुरु होती. ती लढाई कित्येक वर्ष चालू आहे आणि तशीच ती अखंडपणे चालू राहिल. इतिहास त्याला साक्षी आहे. ह