Posts

Showing posts from November, 2011

आता मलाही त्यांची भिती वाटते!

Image
शरद पवारांवर हल्ला झाला २४ नोव्हेंबर २०११ ला. हरविंदर सिंग नावाच्या कुणा पंजाबी युवकाने हा हल्ला केला. चांगलीच कानाखाली पेटवली शरद पवारांच्या.  हा प्रकार घडला तेव्हा मी दादर ला होतो. सोबत प्रसाद पराडकर नावाचा मित्र होता. प्रोजेक्टच्या निमित्ताने आम्ही शिवाजी पार्क च्या दिशेने निघालो होतो. जाताना आयडीअल-श्रीकृष्ण च्या गल्लीतनं गेलो. तेव्हा सगळंकाही अगदी सुरळीत चालू होतं. पार्कात बराच वेळ चर्चा करत बसलो होतो. पार्कातल्या मैदानात कबड्डीचे सामने लागले होते. २३ तारखेला बरीच मोठीमोठी नेते मंडळी येउन गेली होती. त्यात शरद पवार हे ही एक नाव आणि फोटो बॅनरवर लागलेला होताच. आणीही फोटो अन् नावे होती. साधारण २च्या सुमारास तिथे एक महिला पत्रकार लोकांना मुलाखतीसाठी विचारणा करीत होती. आम्ही मात्र गप्पांमध्येच होतो. पार्कातलं हे असं पत्रकारांच येणंजाणं काही नवीन नव्हतं आम्हाला.   ( नंतर कळालं की ती काय प्रश्न विचारणार होती ते.) साधारण ३च्या सुमारास आम्ही पार्कातून निघालो. येताना शिवसेना भवनाकडनं परतीच्या वाटेला लागलो. बाळासाहेब आणि राज याच्यातल्या तुलनेवर गप्पांम धू न विनोद होत होते. जीप्सीप

चंदूभाउंच्या प्रेरणेने

ब-याच दिवसांनी लिहायला बसलोय. राग आलेला नसतानाही लिहायला बसलोय, हे नमूद करण्यासारखंच. राग आल्यावरच सहसा लिखाण घडतं माझ्याकडनं...ह्या वेळी माझंच मला आश्चर्य वाटावं अशा घडीला लिहायला बसलोय. अर्थांच चंदूभाऊंच्या प्रेरणेनेच... चंद्रकांत वानखेडे यांच आत्मकथन वाचलं. चंदूभाउ हे अनेक सामान्य कार्यकर्त्यांमधीलेच एक कार्यकर्ते. नेते मंडळी बरीच माहिती असतात लोकांना पण नेत्यांचे कार्यकर्ते ऑल द टाईम बिहाइंड द स्टेज. अशा बिहाइंड स्टोरिज मधली ही एक आत्मकथा. सामान्य कार्यकर्त्यांच्या असामन्य जीवनाची हिशोबवही. ह्या हिशोबवहीचं नावं – आपुलाचि वाद आपणासी. मनोविकास प्रकाशनाकडंन प्रकाशित झालेलं हे २०० पानी पुस्तक.. डोक्याची आणि मनाची वेणी गुंडाळेल असंच काहीसं. ब-याच दिवसांनी खरतरं पुस्तक वाचलं. गाडीची सर्विसींग केल्यावर जसं वाटतं न् अगदी तसंच्या तसं वाटतंय. पुस्तकांचे रिव्हू वैगेरे लिहीण्यात मला काही रस नाही. पण हा माणूस मनात घर करुन जाईल असा वाटला पुस्तक वाचताना. पुस्तक वाचनीय आहे. मध्यंतरी अमरावतीला त्यांचा सत्कार झालेला. ओळखीची एक जवळची व्यक्ति गेली होती, त्या कार्यक्रमाला. त्यावरचा एक लेखही नवशक्त