Posts

Showing posts from April, 2013

गैरसमज

Image
साला काय गंम्मत आहे ना … मी ग्रॅज्युएट झाल्यावर नोकरी करायचीच नाही अस्सं ठरवलं होतं. नुसत्या डॉक्युमेन्ट्री आणि फिल्म शी रिलेटेश कामं करत राहायची असा निश्चय होता. अर्थात आपण ठरवलेल्या सगळ्या गोष्टी आपण करतोच असं नाही. तरुण असताना लग्न न करण्याचं ब-याच जणांनी ठरवलेलं असतं. आता लग्नाचा दाखला दिलाय म्हणून लगेच नोकरी आणि लग्नाची तुलना करायची काहीच जरुर नाही.  सांगायचा मुद्दा हा, की नोकरी करायची नाही असं ठरवलेलं वर्षभरापूर्वी. वर्षभर केलीच नाही. आवडेल ती कामं केली. जेव्हा पैसे कमवायची गरज आली, तेव्हा नोकरी करायला पाहिजे असंही वाटलं.  पर्याय म्हणून एका खासजी क्लासमध्ये लेक्चरर म्हणून मास्तरकी पण केली. आई शिक्षिका असल्यामुळे पोरानं आईचे गुण घेतलेत असे टोपणे सुद्धा खाल्ले मित्रांकडनं. पण वेळेला पुरतील एवढे पैसे हातात येत होते, म्हणून मग मित्रांच्या टोमण्यांचा काही परिणाम झाला नाही. आणि लेक्चर बेस्ज्ड पैशांमुळ तितकीशी गरज नाही वाटली नोकरीची. अर्थाच घरच्यांना माझं हे असं वागणं, म्हणजे नोकरी न करणं अजिबात आवडत नव्हत. त्यांच्या वागण्यातून त्यांनी याचे ब-याचदा निषेध नोंदवले आहेत. पण आप