Posts

Showing posts from 2011

आयुष्य तेच आहे...अन् हाच पेच आहे...

गझलनवाज भीमराव पांचाळे एक जबराट व्यक्तिमत्व आणि गायक आणि माणूसही. त्याची गझल ऐकतच हा ब्लॉग लिहायला सुरुवात केलीये... वाचता वाचता तुम्हीही ती ऐकली तर माझं म्हणणं लवकर तुमच्यापर्यंच पोहोचेल... ही त्या गझल ची लिंक.. . http://www.youtube.com/watch?v=SixqjznQV20 आज बरंच काही होतं लिहीण्यासारखं. मध्यंतरी वेळच मिळत नव्हता लिहायला. पण मनात साठवून ठेवलंल लिहायचंच असं प्रत्येक क्षणाला ठरवत होतो. अखेर आज तो योग आलाच. कालच घरी सत्यनारायण घातला. दरवर्षी मार्गशीर्ष मध्ये असतो... पण यंदा थोडा विलंब झालाच. डिसेंबर १, २०११ पासून एका कास्टींग एजेन्सीमध्ये नोकरीला लागलेलो. पद होतं...विडीयो एडीटर. उत्साह मनातल्या मनातच उड्या मारत होता. पगाराची फिकीर नव्हती. अनुभव महत्वाचा वाटत होता. कसला डोंबल्याचा अनुभल मिळाला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरेल. खरं तर बरंच काही शिकलो. पण त्याचा एडीटींग शी काहीच संबंध नव्हता. मी लास्ट इअरला आहे. उपद्व्याप या वर्षाला काही करणार नाही असं ठरवलेलं असतानाही या वर्षी ब-याच करामती करत होतो. नकळतपणे त्या करामतींना यशही येत होतं. आत्मविश्वास गुणावत होता. अशातच मला एका का

आता मलाही त्यांची भिती वाटते!

Image
शरद पवारांवर हल्ला झाला २४ नोव्हेंबर २०११ ला. हरविंदर सिंग नावाच्या कुणा पंजाबी युवकाने हा हल्ला केला. चांगलीच कानाखाली पेटवली शरद पवारांच्या.  हा प्रकार घडला तेव्हा मी दादर ला होतो. सोबत प्रसाद पराडकर नावाचा मित्र होता. प्रोजेक्टच्या निमित्ताने आम्ही शिवाजी पार्क च्या दिशेने निघालो होतो. जाताना आयडीअल-श्रीकृष्ण च्या गल्लीतनं गेलो. तेव्हा सगळंकाही अगदी सुरळीत चालू होतं. पार्कात बराच वेळ चर्चा करत बसलो होतो. पार्कातल्या मैदानात कबड्डीचे सामने लागले होते. २३ तारखेला बरीच मोठीमोठी नेते मंडळी येउन गेली होती. त्यात शरद पवार हे ही एक नाव आणि फोटो बॅनरवर लागलेला होताच. आणीही फोटो अन् नावे होती. साधारण २च्या सुमारास तिथे एक महिला पत्रकार लोकांना मुलाखतीसाठी विचारणा करीत होती. आम्ही मात्र गप्पांमध्येच होतो. पार्कातलं हे असं पत्रकारांच येणंजाणं काही नवीन नव्हतं आम्हाला.   ( नंतर कळालं की ती काय प्रश्न विचारणार होती ते.) साधारण ३च्या सुमारास आम्ही पार्कातून निघालो. येताना शिवसेना भवनाकडनं परतीच्या वाटेला लागलो. बाळासाहेब आणि राज याच्यातल्या तुलनेवर गप्पांम धू न विनोद होत होते. जीप्सीप

चंदूभाउंच्या प्रेरणेने

ब-याच दिवसांनी लिहायला बसलोय. राग आलेला नसतानाही लिहायला बसलोय, हे नमूद करण्यासारखंच. राग आल्यावरच सहसा लिखाण घडतं माझ्याकडनं...ह्या वेळी माझंच मला आश्चर्य वाटावं अशा घडीला लिहायला बसलोय. अर्थांच चंदूभाऊंच्या प्रेरणेनेच... चंद्रकांत वानखेडे यांच आत्मकथन वाचलं. चंदूभाउ हे अनेक सामान्य कार्यकर्त्यांमधीलेच एक कार्यकर्ते. नेते मंडळी बरीच माहिती असतात लोकांना पण नेत्यांचे कार्यकर्ते ऑल द टाईम बिहाइंड द स्टेज. अशा बिहाइंड स्टोरिज मधली ही एक आत्मकथा. सामान्य कार्यकर्त्यांच्या असामन्य जीवनाची हिशोबवही. ह्या हिशोबवहीचं नावं – आपुलाचि वाद आपणासी. मनोविकास प्रकाशनाकडंन प्रकाशित झालेलं हे २०० पानी पुस्तक.. डोक्याची आणि मनाची वेणी गुंडाळेल असंच काहीसं. ब-याच दिवसांनी खरतरं पुस्तक वाचलं. गाडीची सर्विसींग केल्यावर जसं वाटतं न् अगदी तसंच्या तसं वाटतंय. पुस्तकांचे रिव्हू वैगेरे लिहीण्यात मला काही रस नाही. पण हा माणूस मनात घर करुन जाईल असा वाटला पुस्तक वाचताना. पुस्तक वाचनीय आहे. मध्यंतरी अमरावतीला त्यांचा सत्कार झालेला. ओळखीची एक जवळची व्यक्ति गेली होती, त्या कार्यक्रमाला. त्यावरचा एक लेखही नवशक्त

कधीच न पटलेले तन्ना सर

Image
बीएमएम् च्या तीस-या वर्षाला शिकतोय. शेवटचं वर्ष आहे हे. बीएम्एम् ला ज्यांच्यामुळे अँडमिशन मिळालं, ते म्हणजे तन्ना सर. पूर्ण नाव... सुरेंद्र तन्ना. पहिल्या वर्षाला आलो, तेव्हा ते पाटकर कॉलेजचे बीएमएम् चे एचओडी होते. दुस-या वर्षाला त्यांनी राजीनामा दिलेला त्या पदाचा. का ते काही माहित नाही. आताही फक्त बीएमएम् च्याच विद्यार्थ्यांना शिकवतात. खूप नॉलेज आहे, त्यांच्याकडे. खूप सिनिअरही आहेत. त्याचं वय ६० च्या वर आहे. पहिल्या पासना शिक्षकी पेशा आणि त्याच्यासी निगडीतच काम केलीयेत त्यांनी. मुंबई युनिर्व्हसिटी च्या कम्युनिकेशन आणि पत्रकारीता विभागाचे हेड म्हणूनही त्यांनी या आधी काम पाहिलंय. तन्ना सर आम्हांला पहिल्या आणि तिस-या वर्षाला शिकवायला आहेत. दुस-या वर्षाला ते शिकवायला नव्हते. सर बरंच काही लिहून देतात लेक्चर मध्ये. त्यांच त्यांच गोष्टी पुन्हापुन्हा  सांगतात. काही अनुभवही शेअर करतात. कधीकधी इज्जतीचा फालुदा ही काढतात. पण केव्हा केव्हा सगळ्यांसमोर तारिफही करायल मागेपुढे पाहत नाहीत. आता त्यांच्यामुळं अँडमिशन कसं मिळालं हे सांगतो... सायन्स मधून बारावी पास केलेली..५३ टक्के मिळालेले. बीएस

राळेगणसिद्धी लाईव्ह

Image
राळेगणसिद्धी अण्णांच गावं. भष्टाचार विरोधाच्या अण्णांच्या उपोषणाला जितकी प्रसिद्धी मिळाली तितकीच त्याच्या गावाला ही मिळाली. अर्थात याचं सगळं श्रेय प्रसारमाध्यमांना जात. अण्णाचं उपोषण सुरु झाल्यापासना काही प्रेसवाले तिथे तळ ठोकून काही स्टोरी मिळतेय का याची वाट बघतायेत... तर काही स्वतः स्टोरी क्रियेट करण्यात बीझी असल्याचं दिसून आलं. शिरुर पासना १०-१२ किमी च्या अंतरावर असलेलं हे गाव. गावासारखं गाव. शे-दोनशे घरं, दोन मंदिरं, अण्णांनी यशस्वीरीत्या उभे केलेले काही पाठबंधारे सारखे प्रकल्प, शेतीची लांबचलांब असलेली जमीन, नदी, एक शाळा. नगर, औरंगाबाद, पुणे पासना थोड्याफार फरकानं समान अंतरावर असलेलं हे गावं. पारनेर हे राळेगण सिद्धीच्या शेजारचं गावं. शिरुर हून पारनेर ला जायला राळेगणसिद्धी हूनच जावं लागतं. राळेगण सिद्धी ला जाण्यासाठी पुणे-नगर हायवेवरुन शिरुर सोडल्यनंतर एक फाटा आहे. आतमध्ये ६-७ किमी च्या अंतरावर गावाची हद्द सुरु होते. गावात जाण्यासाठीचा इतका चांगला डांबरी रस्ता अण्णांच्या दबदब्याखाली बनवला गेलेला असल्याचं प्रकर्षानं जाणवतं. गावाच्या दिशेने जाताना चौफेर हिरवळ दिसू लागते. कधी का

कैलासवासी कोकण...?

कोकण हा प्रदेश सह्याद्रीच्या भव्यदीव्य अशा घाटीला लागून आहेत. अशा घाटीमध्ये असलेल्या कैलाश स्वामींच वास्तव्य हे अतुल्य आहे. हर हर महादेवाच्या नाम घोषाने निनादून भारावलेली कोकणनगरी आता कैलासवासी होण्याच्या मार्गावर आहे. कोकणातील भिन्न-विभिन्न भागामध्ये खाणकाम(मायनिंग) आणि खाणकामाशी निगडीत प्रकल्प खूप विस्तरित प्रमाणात चालू आहेत. त्या प्रकल्पांचा कोकणावर होणारा विपरीत परिणाम डोळेछाक करता येण्याइतका नाही. बॉक्साईट आणि इतर काही मॅगेनीज सारख्या खाण्यांचे प्रमाण आणि आताच्या औद्योगिकीकरण च्या युगामध्ये अशा धातूंची वाढीव मागणी विश्वासार्ह वाटते. मात्र खाणकाम करताना वापरण्यात येणारे तंत्र, खाणकामाचा निसर्गाने नटलेल्या कोकणावर होणारा परिणाम अतिशय वाईट आहे. वास्तव परिस्थितीमध्ये अशा आणि 49 खाणकाम प्रकल्पांना सरकार तर्फे परवाना देण्यात येतो, याचा अर्थ न कळण्याइतकी मति कोणाचीहि भ्रष्ट झालेली नाही. अशा परिस्थितीला कोकणातील स्थानिक जनतेने ज्या प्रमाणात विरोध आणि टिका करायला हवी होती, ती नोंदवली गेलेली नसल्याने अशा गोष्टी जास्त फावतात, असे प्रामुख्याने दिसून येते. जैतापूर मुळे पर्यावरण हानी

सगळ्यांचीच जात...

Image
         हा ब्लॉग अपडेट करताना मज्जा येतेय.  तीन वर्षांपूर्वी केलेला भीमवंदना नावाचा कार्यक्रम पुन्हा करु शकतोस का अशी विचारणा एका मंडळाकडनं झाली आणि जागरण नावाच्या एका काव्यवाचनाच्या ग्रुपच्या आठवणी पुन्हा नव्याने  जाग्या झाल्या. त्या मंडळाच्या अध्यक्षाला इतरांना न विचारताच मी नकार देउन टाकला. ह्या मंडळाची एक खासियत आहे. हे लोक शिवजयंती आणि आंबेडकर जयंती एकत्रच साजरी करतात. दोन केक चा खर्च होउ नये म्हणून ही काळजी घेतली जाते, असा माझा एक अंदाज आहे. आणि तो सपशेल चूकीचाही असू शकतो.        असो...        तर एका दगडात आंबेडकर आणि शिवाजी यांच्यावर अचूक निशाणी लावणारे हे मंडळ आमचा कार्यक्रम होत नाहीये म्हणून माझ्यावर कमालीचे रागावलेत. त्याचा राग कमी व्हावा म्हणून मी त्यांना शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक आयोजित करण्याचा फुकटचा सल्ला दिला. तर बजेट च्या कारणावरुन आणि नाटकाच्या नादग्रस्त नावाला घाबरुन त्यांनी ते नाटक ठेवण्याचं टाळलं. अद्यापही काही त्यांना कार्यक्रम मिळालेला नाही. मी थोड्याफार प्रमाणात त्यांना दुसरा एखादा कार्यक्रम मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण यश काही आलं