कधीच न पटलेले तन्ना सर


बीएमएम् च्या तीस-या वर्षाला शिकतोय. शेवटचं वर्ष आहे हे. बीएम्एम् ला ज्यांच्यामुळे अँडमिशन मिळालं, ते म्हणजे तन्ना सर. पूर्ण नाव... सुरेंद्र तन्ना. पहिल्या वर्षाला आलो, तेव्हा ते पाटकर कॉलेजचे बीएमएम् चे एचओडी होते. दुस-या वर्षाला त्यांनी राजीनामा दिलेला त्या पदाचा. का ते काही माहित नाही. आताही फक्त बीएमएम् च्याच विद्यार्थ्यांना शिकवतात. खूप नॉलेज आहे, त्यांच्याकडे. खूप सिनिअरही आहेत. त्याचं वय ६० च्या वर आहे. पहिल्या पासना शिक्षकी पेशा आणि त्याच्यासी निगडीतच काम केलीयेत त्यांनी. मुंबई युनिर्व्हसिटी च्या कम्युनिकेशन आणि पत्रकारीता विभागाचे हेड म्हणूनही त्यांनी या आधी काम पाहिलंय.
तन्ना सर आम्हांला पहिल्या आणि तिस-या वर्षाला शिकवायला आहेत. दुस-या वर्षाला ते शिकवायला नव्हते. सर बरंच काही लिहून देतात लेक्चर मध्ये. त्यांच त्यांच गोष्टी पुन्हापुन्हा  सांगतात. काही अनुभवही शेअर करतात. कधीकधी इज्जतीचा फालुदा ही काढतात. पण केव्हा केव्हा सगळ्यांसमोर तारिफही करायल मागेपुढे पाहत नाहीत.
आता त्यांच्यामुळं अँडमिशन कसं मिळालं हे सांगतो...
सायन्स मधून बारावी पास केलेली..५३ टक्के मिळालेले. बीएस्सी, इंजिनिअर वगैरे होईन असं वाटलेलं घरच्यांना. पण मी मुळात सगळ्या शाखा मोकळ्या होतात म्हणून सायन्स घेतलेलं. मला मास कम्युनिकेशन मध्ये स्पेशलायझेशन करायचं होतं. पत्रकारीता हा त्यातलाच एक भाग होता. तेव्हा बीएमएम हा कोर्स नवीनच होता. मुंबईतल्या सगळ्या मोठमोठ्या कॉलेजात फॉर्म भरलेले. पण एकाही ठिकाणी नंबर लागणार नव्हता हे पक्कं माहित होतं. म्हणून रुपारेल ला आर्ट्स साठी अँडमिशन तात्पुरतं घेउन ठेवलं होतं. रुपारेल मध्ये जम बसतच होता... महिन्याभरात पाटकर कॉलेजातून फोन आला... की वेटिंग लीस्ट मध्ये माझा नंबर कनफॉर्म झालाय. उद्याच येउन अँडनिशन घ्या.
तेव्हा १६ हजार फी होती. घरच्यांनी कन्वेन्स करुन लगेचच दुस-या दिवशी अँडमिशन घेतलं. कॉलेज आधीपासूनच सुरु झालेलं. पहिल्या दिवशी पाटकर मध्ये गेल्यावर असं कळालं, ही बीएम्एम् ची दुसरी तुकडी काढण्यासाठी मान्यता मिळाल्यामुळे मला आणि माझ्यासारख्या आणि ५९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला. आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजत होतो. कारण आमच्या व्यतिरिक्त जास्त मार्क मिळालेलेही काही विद्यार्थी आणि त्यांची नावं लिस्ट मध्ये होती. पण लॉटरी सिस्टमप्रमाणे ६० विद्यार्थांना वेटिंग मध्ये डायरेक्ट इन्ट्री मिळाली होती. या सगळ्याच्या मागे जर का कोणी होतं...तर ते तन्ना सर. ते एचओडी होते. आणि त्यांनी ही सारी किमया घडवून आणली होती. काही विद्यार्थांना तर याची कल्पनाही नव्हती. अजूनही नसेल.
एक तर आधी आम्हाला ३-४चं शिक्षकच असतात, तीनही वर्षांसाठी. त्यांतल्या इतरांना आम्ही सहन करु शकतो...त्यांची बाब निराळी आहे. पण सर तुम्ही आता सहन करण्याच्या पलिकडे गेलेला आहात. पण तरीही आम्ही ६० विद्यार्थी ज्यांना तुमच्यामुळे अँडमिशन मिळाले, ते सर्व आम्ही आयुष्यभर तुमचे ऋणी राहू. आणि हे सगळं लिहून तुम्हाला वाईट वाटणार असेल...तर त्याबद्दल आधीच तुमची जाहीर माफी मागतो. आणि सगळा इतिहास मांडतो.
आता तन्ना सर आमचे एचओडी नाहीयेत. पण ब-याचदा त्यांच्याशी बोलताना ते म्हणतात की, मी जर का आता या घडीला तुमचा एचओडी असलो असतो, तर तुमच्या प्रोबलेम मध्ये नक्की मदत केली असती. पण जेव्हा ते एचओडी होते तेव्हा ते खरंच मदत करायचे. आता ते फक्त एक प्राध्यापक आहेत. मात्र आता त्यांच वागणं जराही पटत नाहीये. कारणं बरीच आहेत. आमचे इंन्टनल्स से मार्क त्याच्या हातात असल्यामुळं मी त्यांना काही बोलत नाहीये. रादर कोणीच त्यांना उलट किंवा आर्गु करत नाहीये. करुही नये. पण हे वर्ष संपल की हे सगळं त्यांना नक्की पोस्ट करेन.
आता त्यांना काय बोलणार आहे ते सांगतो...
आदरणीय सुरेंद्र तन्ना सर...
तुम्ही आमचे गुरु आहात. आमच्यापेक्षा तुमचा अनुभव चिक्कार जास्त आहे. आम्ही तुमच्यासमोर मुंगी ही नाही आहोत. आमच्यासाठी तुम्ही एक आदर्श राहाल. पण तुमच्या वागण्यातील काही गोष्टी हल्ली खूप खटकतात. विद्यार्थ्यांनी तुमच्या लेक्चरला वेळेवर यावं असं आपण गृहित धरत असाल, तर स्वतः लेक्चर वेळेत सुरु करुन आपण ती वेळेत संपवावीत. किंवा लेक्चर वाढविणार असाल, तर तशी पूर्वकल्पना विद्यार्थ्यांना द्यावीत.
सर तुम्ही शिकवताना विषय सोडून कुठेतरी भरकटत जाता. परिणामी तुमच्या लेक्चरची वेळ संपलेली असूनही तुम्ही विद्यार्थ्यांना खोळंबून ठेवता. जेवढं अपेक्षित आहे, त्या पेक्षा जरा जास्तच गोष्टी तुम्ही सांगता. ही गोष्ट बहुदा तुमच्या लक्षात आणून देऊनही तुम्ही त्यावर दुर्लक्ष करता.
तुमची शिकवण्याची शैली फारच उत्तम आहे. मात्र जराही प्रभावी नाही. ब-याचदा तुमच्या स्लो स्पीडमुळे कंटाळा येतो. तुम्ही फार बोलता. आणि महत्वाचं म्हणजे गरज नसताना बोलता. विद्यार्थ्यांमध्ये पार्शलिटीही नकळत तुमच्याकडनं घडते, त्याकडे जरा लक्ष ठेवा, ही विनंती.
तुमचा अरेरावी आणि डॉमीनन्स सगळे फक्त आणि फक्त तुम्ही सिनिअर असल्यामुळेच सहन करतात. त्याचा फायदा तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी उचला. तुम्हाला कोणी क्रॉस क्वेश्नन करत नाही, याचा असा जराही अर्थ लावू नये, की तुम्ही दिलेले सगळे निर्णय योग्य आणि सर्वमान्य असतात. तुमचा इंटरफेअरन्स जराही दुर्लक्षित करण्याइतका नसतो. एखादा व्यक्ति मदत मागत असेल, तर त्याच्या गरजेइतकीच मदत त्याला करावी. गरजेव्यतिरीक्त मदत त्यांवर लादू नका.
विद्यार्थी तुमचा सल्ला मागयला येतात. तेव्हा त्यांना फक्त सल्ला द्या. आदेश फर्माउ नका.
गरजने वाले बरसते नहीं – अशा पद्धतीचं तुमचं आचरण, जराही खपवून घेण्यालायक नाही. विद्यार्थी तुमचा आदर करतात, म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना गृहित धरु नये.
मी हे सर्व काही खूपच परखड पणे लिहीलेलं आहे. ब-याचदा माझे सहकारी मित्र विद्यार्थी तुम्हाला घाबरतात आणि हे सर्व बोलायला धजावतात. तुमच्या मागून तुम्हाला वाईटसाईट बोलतात. ही भीती फक्त या साठी आहे कारण तुम्ही आम्हाला १०० पैकी गुण देणार आहात. त्या व्यतिरीक्त कसल्याप्रकारची भीती कोणाला नाहीये.
नेहमी विद्यार्थींनीच तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे का. कधीतरी तुम्हीही आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हालाही कोणतातरी तुमचा शिक्षक आवडला नसेलच की. पण त्याला बदलवण्याची जबाबदारीही आपलीच असल्याचे मी समजतो. म्हणून हा एवढा सगळा खटाटोप.
मी कोणी संत, आणि सद्गुणी नाही. माझ्यातही काही कमतरता असणारचं आहेत. पण आता ह्या सगळ्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता – यावर तुमचा निर्णय, तुमची प्रतिक्रिया, आणि ज्या साठी हे सगळं केलं , ह्याची संक्षेप्त स्वरुपात झलक तुम्ही द्यालच.
तुमच्या मुळे बीएमएम करु शकतोय...याची जाणीव मला आहे. पण याचा अर्थ असाच नाही की तुम्ही कसंही वागावं. आम्हाला पत्रकारीतेत एक शॉर्टकट लक्षात ठेवायला सांगितलेला तुम्ही...तोच तुम्ही कसा विसरु शकता... त्याची आठवण ठेवा... आणि तो शॉर्टकट आहे..Kiss – Keep It Short & Simple.
बाकी तुम्ही सूज्ञ आहातंच!
तसदी बद्दल क्षमस्व!
धन्यवाद!
आपला,
आयुष्यभराचा ऋणी!

Comments