Posts

Showing posts from 2017

..असा होता टीव्ही ९ मराठीचा राजीनामा!

Image
अमोल मोरे नावाचा एक मित्र टीव्ही९ मध्ये भेटला .  मध्यंतरी त्याचा फोन आला .  नंबर सेव नव्हता म्हणून ओळखलं नाही .  उशिरानं ट्यूब पेटली .  अमोल मूळचा कोकणातला .  मी ही कोकणातलाच .  त्यामुळे लगेच आपुलकी निर्माण होतेच .  हल्लीचीच गोष्ट .  मी जॉईन झालो होतो नुकताच टीव्ही९ मराठीला .  आणि अमोल सोडून चालला होता चॅनेल .  अमोल आता गावी असतो .  लांजा - राजापूर जवळ त्याचं गावंय .  मला वाटलं चांगली संधी मिळाली म्हणून अमोल टीव्ही ९ सोडून जात असावा . पण तसं नव्हतं . अमोल कंटाळला होता . वैतागलेला . गावी जाऊन शेती करायचं अमोलनं मनाशी पक्क केलं . अमोल गावी गेलाय . मी जेव्हा टीव्ही९ मराठी सोडलं . तेव्हा त्यानं फोन केला . फोनवर बोलणं झालं . त्यावरना तो समाधानी वाटत होता . दोन पैसे कमी कमवेन . पण कटकटीचं आयुष्य नको रे बाबा ,   असं अमोल सोडून जाताना बोल्ला होता , ते डोक्यात एकदम घट्ट बसलं होतं . असा धाडसी निर्णय घेणारे अमोलसारखे फार कमी जण उरलेत माध्यमांत काम करणारे . अमोलच्या हिमतीला सलाम . महिन्याभरापूर्वी मी ही टीव्ही ९ सोडल

वागळे, उभ्या महाराष्ट्रानं आता बसून कुणाकडं बघायचं?

Image
वागळे. तशा माझ्या आयुष्यात आतापर्यंत वागळे आडनावाच्या दोनचं व्यक्तींना मी ओळखतो. एक निखिल वागळे. आणि दुसरी नम्रता वागळे. निखिल वागळे सगळ्यांना माहित आहेत. नम्रता सगळ्यांना माहित आहे की नाही. माहित नाही. खरंतर दोघेही एन्कर. वृत्तनिवेदक. दोघांनीही डिबेट शो केलेत. या दोघांमध्ये निखिल वागळे जास्त प्रसिद्ध आणि चर्चेत असतात, हे कोण नाकारेल? वागळेंचा सडेतोड शो टीव्ही ९ मधून तडकाफडकी बंद केल्यानंतर वागळे पुन्हा चर्चेत आलेत. पत्रकारांमध्ये याच्या गप्पा रंगतायेत. विषय चविष्ट आहे. लोकांमध्येही चर्चाय. टीव्ही9 मराठी बघणारे माझे बाबा विचारतायेत.. 'अरे वागळेंचा शो का येत नाहीये?' मी निरुत्तर. यावरुन निखिल वागळे हे काही फक्त पत्रकारांपुरते मर्य़ादित राहिलेले नाहीयेत, हे सिद्ध होते. प्रेक्षकांना त्यांच्यात फार इंटरेस्ट आहे. मला तर असं वाटतं की ज्येष्ठ पत्रकार, संपादक निखिल वागळे हे एका डॉक्यूमेंन्ट्रीचा विषय आहेत. लोकांना फार इंटरेस्ट आहे त्यांच्या एकंदरीत आयुष्यात. एकंदरीत वागळे जे काही करतात, त्याचं गॉसिप करण्यात केवढा इंटरेस्ट रेट आहे, हे इतर चॅनेल्सनी एकदा तपासून बघायला हवं

आपल्यातला बाहुबली कुठंय?

Image
एबीपी माझासाठी तसं फारसं लिखाण होत नाही. ठरवून कित्तेकदा लिहीलेले लेख अर्थवट सोडून दिलेत.  लिंक लागत नाही. माझासाठी लिहीताना फार दडपण असल्यासारखं वाटत राहतं.  असं का होतं माहित नाही. पण तरी हातावर मोजता येतील इतक्या वेळा माझा साठी ब्लॉग लिहीलेत. ते मलाही फारसे आवडलेले नाहीत. पण हा ब्लॉग आवडला होता. तो रविवारचा दिवस होता. अनिष वेबला त्याचं काम करत बसला होता. बाहुबलीनं इतकी कमाई केली वगैरे बातमी समोर होती. त्याला म्हटलं, ब्लॉग लिहून देऊ का.. खूप चालेल. त्यानं पटकन दे म्हणून सांगितलं. घाईघाईत हॉ ब्लॉग आटोपला. त्याला मेल केला. मेघराज सरांना फोनवरुन कळवलं. आणि ब्लॉग वेबसाईटवर आला. अपेक्षा होती की हा ब्लॉग वायरल होईल. पण अपेक्षेप्रमाणे चालला नाही. म्हणजे इतर ब्लॉग आणि पोस्टच्या तुलनेने चांगलाच चालला. पण मनासारखा चालला नाही. त्यामुळे हा ब्लॉग लिहूनही मजा आली नाही. हा ब्लॉग न चालण्याचं कारणही अपेक्षित होतं... त्याचं टायटलमुळे ब्लॉग चालला नाही. बाहुबली हीट झाला.. पण त्याच्यावरचा ब्लॉग जोरदार आपटला. टायटल होतं कटप्पाने बाहुबलीला नाही मारलं ओ...