Posts

Showing posts from March, 2012

वाघमारे सचिन...तुला विसरण खूपच कठीणं...

Image
तीन वर्षांचा लेखाजोखा. कॉलेजचा. बीएमएम करताना पाटकर कॉलेजात घालवलेली ती ३ वर्ष आय़ुष्यातली मस्तीभरी वर्ष होती. खुप किडेगिरी, करामती आणि उपद्व्याप केले. ही नुसती धम्माल. आणि खुप सारा अनुभव. कधी चांगले तर कधी वाईट. कधी नुसतेच रटाळवाणे तर कधी कधी खुपच घाई गडबडीचे दिवस. तीन वर्ष पूर्ण व्हायला आलीयेत. पण सगळं काही ताजताज आठवतंय. कॉलेजचा पहिला दिवस लख्ख डोळ्यासमोर उभा राहिलाय. तीन वर्षांत बरीच माणसं मित्र सखे सवंगडी यार दोस्त .....थोडक्यात जीवभावाचे बरेच जण भेटले. त्याचं माझ्या आयुष्यावर असलेलं योगदान अमुलाग्र आहे असं समजतो. ते पांग कधीच फेडता येण्याजोगं नाही आणि म्हणून त्यांच्या विषयीची कृतज्ञता आदर प्रेम राग लोभ सगळं काही जसच्या तसं मांडतोय. कुणी वाचावं या आशेने हे लिहीलेलंच नाही. तीन वर्षांची आयुष्याची गोळा बेरीज करतोय. माझ्यासाठीच. ब-याचदा पुस्तक लिहीताना ते कोणाला तरी अर्पण केलं जात. हे पुस्तक नाहीये, की ते मी कोणाला तरी अर्पण करावं. हे निव्वळ माझं मलाचं. ही गोळा बेरीज कराताना मला सुरुवात करण्यासाठी एकच नाव पहिल्यांदा डोक्यात आलं, ते म्हणजे सचिन वाघमारे. कॉलेज मध्ये असताना आमचा प्