Posts

Showing posts from May, 2017

आपल्यातला बाहुबली कुठंय?

Image
एबीपी माझासाठी तसं फारसं लिखाण होत नाही. ठरवून कित्तेकदा लिहीलेले लेख अर्थवट सोडून दिलेत.  लिंक लागत नाही. माझासाठी लिहीताना फार दडपण असल्यासारखं वाटत राहतं.  असं का होतं माहित नाही. पण तरी हातावर मोजता येतील इतक्या वेळा माझा साठी ब्लॉग लिहीलेत. ते मलाही फारसे आवडलेले नाहीत. पण हा ब्लॉग आवडला होता. तो रविवारचा दिवस होता. अनिष वेबला त्याचं काम करत बसला होता. बाहुबलीनं इतकी कमाई केली वगैरे बातमी समोर होती. त्याला म्हटलं, ब्लॉग लिहून देऊ का.. खूप चालेल. त्यानं पटकन दे म्हणून सांगितलं. घाईघाईत हॉ ब्लॉग आटोपला. त्याला मेल केला. मेघराज सरांना फोनवरुन कळवलं. आणि ब्लॉग वेबसाईटवर आला. अपेक्षा होती की हा ब्लॉग वायरल होईल. पण अपेक्षेप्रमाणे चालला नाही. म्हणजे इतर ब्लॉग आणि पोस्टच्या तुलनेने चांगलाच चालला. पण मनासारखा चालला नाही. त्यामुळे हा ब्लॉग लिहूनही मजा आली नाही. हा ब्लॉग न चालण्याचं कारणही अपेक्षित होतं... त्याचं टायटलमुळे ब्लॉग चालला नाही. बाहुबली हीट झाला.. पण त्याच्यावरचा ब्लॉग जोरदार आपटला. टायटल होतं कटप्पाने बाहुबलीला नाही मारलं ओ...