Posts

Showing posts from July, 2014

तुझे गरम ओठ ओठावर टेकलेस तेव्हा

Image
नारायण सुर्वे. एक विद्रोही, बंडखोर कवी. ते आणि त्यांच्या कवितांवर एक सुंदर माहितीपट बनलेला आहे. माहितीपट ग्रेटच. त्यात किशोर कदम सारख्या कवी मनाच्या अभिनेत्यानी साकारलेली नारायणाची व्यक्तिरेखाही तितकीच सरस. माहितीपटामध्ये ही कविता ऐकलेल्याच आठवत नाही. माहितीपटाचा विषय ही थोडासा गिरणी कामगारांच्या लढ्याचे रंग दाखवणारा असाच होता. त्यामुळे कदाचित ही कविता त्यात समाविष्ट करता आली नसावी. नक्षत्रांचे देणे कार्यक्रमाचे यु ट्ब वर व्हीडीओ पाहत असताना त्यात नारायण ची ही कविता चंद्रकांत काळेंनी सुरेख सादर केलेली. दिवसभर डोक्यात कविता फिरत होती. त्याच दिवशी रात्री गुरु भेटला. गप्पा मारताना ह्या कवितेची याद आली. कवितांचा विषय निघाला. आणि अनायसे त्याच्याकडे असलेल्या कवितेच्या पुस्तकांमध्ये ही कविता असलेल्याचं कळालं. पुस्तकच ठेउन घेतलं. रात्रीत जवळपास अख्खं पुस्तक फस्त केल वाचून. पुस्तकातल्या इतर कविताही ग्रेट आहेत. पण सुर्वेंची सत्य भारीच. कवितेंच नाव – सत्य. एवढं साधं सोप्प सत्य कवितेत मांडता येऊ शकतं याच कौतुक वाटतंय. नेहमीच वाटत राहिल. कविता संग्रही असावी म्हणून खाली कॉपी पेश्ट... तुझे ग

परत..

  साधारण सात महिन्यांचा तो काळ आहे. जानेवारी पासून ते आत्ता आत्ता काल परवा पर्यंतचा. या दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या मानसिकतेमधनं जाता आलं. जावं लागलं. त्यातल्या काही मानसिकता खूप घाबरवणा-या होत्या. काही खूप उत्साहीत करणा-या. काही खूप विचित्र तर काही अतिशय मार्मिक होत्या. त्या सगळ्यांचच स्वागत करायला हवं. त्यांना स्वीकारायला हवंय. त्या निमित्ताने हे सगळं विवेचन.. होय. मी टीव्ही ९ सोडलंय आणि त्याला आता दीड वर्ष झालंय. खूप लोकांना अजूनही अस्संच वाट्टं की मी टीव्ही ९ मध्ये अजूनही काम करतोय. त्या बद्दल थोडंस. मीडीयात …मेन स्ट्रीम मिडीयात मी तीन महिने होतो. झोकून काम केलं टीव्हीत असताना. वेळेची पर्वा वगैरे केली नाही. तीन शीफ्ट सलग काम करण्याचे परिणामही भोगले. पण टीव्हीत काम करणं हे घरच्यांना, नातेवाईकांना आणि परिचयाच्या माणसांना सांगण्यासाठी म्हणून सोडलं तर त्यात जराही ग्रेटनेस नाही. टीव्हीत तोचतोच पणा आहे. वरवर सांगताना सगळे सिनिअर्स नवेपणाचा ढोंग करतात पण त्यांना कोणीतरी सिनिअर असतो आणि त्यांना काही अलिखित नियम फॉलो करावे लागतात, याचा प्रत्यय टीव्हीतल्या पहिल्या नोकरीत आला.