Posts

Showing posts from October, 2015

'ही' शान कोणाची?

Image
राग आला की मी बोलणं टाळतो. राग आला की मी मनाला 'वाट्टेल ते' लिहीतो. तेव्हाही मला राग आला होता आणि आताही आलाय. पण तरी मी काहीच बोललो नाही. लिहीणं जास्त सोप्पयं. बोलण्याने लोक दुखावले जातात..  शिवाय काही थोड्या लोकांना हल्ली मन पण असतं... त्यालाही जखम होण्याची शक्यता असते. म्हणून लिहून काढलं की कस्सं आपल्या मनाला ही शांती मिळते आणि समोरच्याला इजा ही होत नाही. असो. तर... रागाचं कारण महत्वाचं नाही. बिहाइंड द स्टोरी सांगतो.. हे खरंतरं खूप आधी लिहीलं होतं.. दोन महिन्यांपूर्वी. पण काय परिस्थिती.. आजही तस्संच चित्रय.  मी हे लिहीलं. गुरुला दाखवलं. त्याला खूपच आवडलं. 'ब्लॉगवर टाकू नकोस हे', असं मला त्यानं बजावलं आणि तरी ते लोकांपर्यंत पोहोचलंच. अर्थात कल्पेश राणेच्या नावाने. आता तो कल्पेश राणे मीच होतो हे काहींना कळलंय. त्यामुळे मला हे उघडपणे टाकण्याचा मोह आवरत नाहीये.  तेव्हा जसा आला होता.. तस्साच किंबहुना त्यापेक्षा जास्त राग यावेळी आलायं. टायटलचा आणि ब्लॉगचा काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजू नये. ऑफ द रेकॉर्ड असलेला ब्लॉग पुढे कॉपी पेस्ट

शाहिर अ'मर' रहे..!

Image
शाहीर अमर शेख यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात झाली. गुरुने त्यांच्यावर भलामोट्ठा ब्लॉग लिहीलाय. त्यात लिहीलेलं सगळच्या सगळं एकदम खरंखुरं आणि प्रामाणिक आहे. मलाही शाहिरांवर लिहावसं वाटतं होतं… पण काय लिहायचं हे नक्की होत नव्हतं. अजूनही नक्की होत नाहीये. शाहीर अमर शेख मोठा माणूस. तुमच्या आमच्या सारख्यांना त्यांची किंमत नाही. हे उद्गार आहेत ते कोर्टचं म्युझिक ज्यांनी केलेलं ना…त्यांचे. शाहीर संभाजी भगत यांचे. आयला आपल्याला हा माणूस इंटरेस्टिंग का वाटू नये… हा प्रश्न मला पडला. पण जसजसं आम्ही त्यांच्या माहितीपटावर काम करू लागलो तसतसे आम्ही समृद्ध होत गेलो, हे खरंय. काम करताना अनेकदा कार्यालयीन व्यवस्थेचा गुरुला आणि मला प्रचंड त्रास झाला. पण सालं त्या अमर शेखांच्या दुःखापुढे आमचं दुःख काहीचं नव्हतं. म्हणून गपगुमान सगळं सहन केलं. एकदा तर एवढा राग आलेला.. पण एका शब्दाने काही बोल्लो नाही. त्याचं झालं अस्सं.. रोजा देशपांडे.. कॉम्रेड डांगेंची कन्या. त्यांचा या डॉक्युमेन्ट्री संदर्भात इंटरव्हू करायचा होता. कॅमेरामन फ्रेम सेट करत होता. मी त्याला सांगितलं आपल्याला