Posts

Showing posts from April, 2015

ऐतिहासिक क्षणांचे साक्षी व्हा..!

Image
        आपल्या मुंबईमध्ये मंडळं तशी बरीच. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील, गोविंदा पथकांची मंडळ असतील, साईबाबांची मंडळं असतील किंवा अगदी फक्त नावाला असणारी ही मंडळी मुंबईत काही कमी नाहीत. पण आपल्या दादर मध्ये एक मंडळ आहे. त्याचं नाव अमर हिन्द मंडळ. 68 वर्षांची दर्जेदार परंपरा असणारं मध्य मुंबईतल्या जुन्या मंडळांपैकी एक असलेलं हे मंडळ. म्हणजे भारत स्वतंत्र आणि ह्या मंडळाची स्थापना व्हायचं साल एकच.          अमर हिन्द मंडळची युएसपी म्हणजे त्यांची वसंत व्याख्यान माला. देशभरातले वक्ते या व्याख्यानमाले मध्ये येउन व्याख्यान देण्यासाठी उस्तुक असतात. याचं मुख्य कारण म्हणजे अमर हिन्हच्या व्याख्यानमालेला येणारा श्रोता वर्ग. या मंडळाने क्रीडा क्षेत्रामध्येही सक्रियता दाखवली आहे. मंडळाकडून कब्बडी आणि खो-खो या खेळांचे विशेष वर्ग ही घेतले जातात. कला क्षेत्रामध्येही अमर हिन्द वाले मागे नाहीत. मंडळातर्फे रंगभूमीवर येण्यासाठी उत्सुक असलेल्यांसाठी विशेष नाट्यशिबिरं आयोजित केली जातात. बंध निर्बंधांचे, मना वासना, परमनिधानम सारख्या नाटकांद्वारे राज्यनाट्यस्पर्धांमध्येही अमर हिन्दने बाजी मारलेली आहे. गेली