Posts

Showing posts from March, 2014

एवढंच!

Image
                   जींन्दगी ना मिलेगी दोबारा नावाचा एक मस्त सिनेमा आहे . त्यात फरहान अख्तर एका लेडीज पर्स वर गॉगल आणि स्कार्फ ठेउन एक आर्टिफिशिअल कँरेक्टर तयार करतो .. तिला तो बँगवती असं नाव देतो . बँगवतीचं ओरीजिन भगवती . पुरुषांमध्ये भगवान असंही नाव असतं . कोकणात प्रत्येक गावात भगवान नावाचा एकतरी माणूस नक्कीच सापडेल . गीता हे मुलींच नाव . ह्या दोन नावांना एकत्र केल्यावर जो शब्द बनतो .. तो एक हिंदूधर्मग्रंथ … भगवतगीता त्याचं नाव . एवढंच !            भगवतगीतेबद्दल मला पहिल्या पासूनच खूप कुतूहल होतं . आकर्षण नव्हतं . गीता पे हाथ रख के कसम खाओ … असं कोर्टात शपथ घ्यायला सांगतात … हे आम्ही लहान असताना सिनेमात पाहिलेलं असतं . पण मग हिंदू धर्माव्यतिरिक्त जर कोणी कोर्टात साक्ष द्यायला गेला तर त्याने पण गीते वरच हात ठेवून शपथ घ्यायची असते , की त्याला त्याच्या धर्मग्रंथावर हाथ ठेवून शपथ घ्यायला लावतात , असा प्रश्न मनात घर करुन जायचा . एवढंच !                 आता ह्या प्रश