Posts

Showing posts from 2012

वाट्टेल ते - का करतोय

Image
दहीहंडी म्हणजे काय , हे काही जणांना विचारलं . तर त्यातल्या ब - याच जणांनी दहीहंडीची व्याख्या एक सण उत्सव म्हणून न सांगता हा एक पॉलिटीकल इव्हेन्ट बनत असल्याचं सांगितलं . एका सांस्कृतिक सणांचा राजकिय इव्हेन्ट बनण्याइतकं दुर्दैव दुसरं कोणतं असणार , असं वाटू लागलं . याच प्रेरणेतून दहीहंडी , बाळगोपाळ , वाढणारी गोविंदा पथक यांवर अभ्यास सुरु केला .       का करतोय – दहीहंडी वर्षातून एकदा येते . मात्र , वर्षभर गोविंदा त्या एका दिवसाची वाट पाहत असतात . एकापेक्षा एक मानवी मनोरे उभे करताना लागणा - या एकसंघतेचा सराव या दहीहंडीच्या आधीपासूनच अहोरात्र सुरू होतो . दहीहंडीच्या दिवशी ओंसडून वाहणारा गोविंदांमधील उत्साह , एकपेक्षा एक सरस थर लावताना लागणारी जिद्द , या सर्व थरारक गोष्टींच्या पलिकडे जाउन आपण विचार केला तर दहीहंडी फोडणा - या गोविंदांना दरवर्षी काय मिळतं ? महिनाभर प्रॅक्टिस करताना मिळालाच तर वडापाव . गोकुळाष्टमीच्या दिवशी पुलाव आणि मसालादूध . एक टीशर्ट . आणि मोठमोठ्या हंड्या फोड