Posts

Showing posts from December, 2015

कैचीने नाळ कापली

24 वर्षांपूर्वी जन्मलो. आम्ही राहायला जोगेश्वरीला. ती आईची तिसरी वेळ होती. 8 वर्षांचा गॅप. 83 नंतर डिसेंबरच ते 1991 साल. त्या हॉस्पिटलचं नाव रचना वगैरे होतं असं बाबा सांगतात. मरोळला कुठंतरी ते हॉस्पिटल आहे. मी जाऊन शोधलंही. मला नाही सापडलं. ती शुक्रवारची रात्र होती. मी येण्याचे इन्डिकेशन्स देत होतो. बाबा आईला घेऊन रचनात पोहोचले.  शनिवारची ती पहाट. मला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. पण ते यशस्वी ठरत नव्हते. शेवटी डॉक्टरांनी सिझरिंग करायचं ठरवलं. अखेर कैचीने नाळ कापली गेली. आई मोकळी झाली. मी रडू लागलो. दोन मुलींनंतर मुलगा झाला.. याचा कोण आनंद झाला असेल नै त्या वेळी बाबांना. दोन मुलींनंतर 8 वर्षांनी मुलगा झाला. दोन्ही बहिणींना ही भाऊ मिळाला म्हणून आनंद झालाच असेलच नै. मला तीन आई होत्या. आई..ताई.. आणि माई. आई मला मारायची. ताईही मारायची. माई मारणं टाळायची. बाबांनी फार मारलं नाही. पण जेव्हा मारलं तेव्हा वळ उठले. ताई-माई व माझ्यात जनरेशन गॅप. त्यामुळे आमच्यात म्हणाव्यात अशा गप्पा..चर्चा किंवा तत्सम झालंच नाही. झाली ती भांडणं. एकीशी भांडायचं..दुसरीनं मिटवायचं. एवढंच काय ते