Posts

Showing posts from July, 2017

वागळे, उभ्या महाराष्ट्रानं आता बसून कुणाकडं बघायचं?

Image
वागळे. तशा माझ्या आयुष्यात आतापर्यंत वागळे आडनावाच्या दोनचं व्यक्तींना मी ओळखतो. एक निखिल वागळे. आणि दुसरी नम्रता वागळे. निखिल वागळे सगळ्यांना माहित आहेत. नम्रता सगळ्यांना माहित आहे की नाही. माहित नाही. खरंतर दोघेही एन्कर. वृत्तनिवेदक. दोघांनीही डिबेट शो केलेत. या दोघांमध्ये निखिल वागळे जास्त प्रसिद्ध आणि चर्चेत असतात, हे कोण नाकारेल? वागळेंचा सडेतोड शो टीव्ही ९ मधून तडकाफडकी बंद केल्यानंतर वागळे पुन्हा चर्चेत आलेत. पत्रकारांमध्ये याच्या गप्पा रंगतायेत. विषय चविष्ट आहे. लोकांमध्येही चर्चाय. टीव्ही9 मराठी बघणारे माझे बाबा विचारतायेत.. 'अरे वागळेंचा शो का येत नाहीये?' मी निरुत्तर. यावरुन निखिल वागळे हे काही फक्त पत्रकारांपुरते मर्य़ादित राहिलेले नाहीयेत, हे सिद्ध होते. प्रेक्षकांना त्यांच्यात फार इंटरेस्ट आहे. मला तर असं वाटतं की ज्येष्ठ पत्रकार, संपादक निखिल वागळे हे एका डॉक्यूमेंन्ट्रीचा विषय आहेत. लोकांना फार इंटरेस्ट आहे त्यांच्या एकंदरीत आयुष्यात. एकंदरीत वागळे जे काही करतात, त्याचं गॉसिप करण्यात केवढा इंटरेस्ट रेट आहे, हे इतर चॅनेल्सनी एकदा तपासून बघायला हवं