Posts

Showing posts from 2015

कैचीने नाळ कापली

24 वर्षांपूर्वी जन्मलो. आम्ही राहायला जोगेश्वरीला. ती आईची तिसरी वेळ होती. 8 वर्षांचा गॅप. 83 नंतर डिसेंबरच ते 1991 साल. त्या हॉस्पिटलचं नाव रचना वगैरे होतं असं बाबा सांगतात. मरोळला कुठंतरी ते हॉस्पिटल आहे. मी जाऊन शोधलंही. मला नाही सापडलं. ती शुक्रवारची रात्र होती. मी येण्याचे इन्डिकेशन्स देत होतो. बाबा आईला घेऊन रचनात पोहोचले.  शनिवारची ती पहाट. मला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. पण ते यशस्वी ठरत नव्हते. शेवटी डॉक्टरांनी सिझरिंग करायचं ठरवलं. अखेर कैचीने नाळ कापली गेली. आई मोकळी झाली. मी रडू लागलो. दोन मुलींनंतर मुलगा झाला.. याचा कोण आनंद झाला असेल नै त्या वेळी बाबांना. दोन मुलींनंतर 8 वर्षांनी मुलगा झाला. दोन्ही बहिणींना ही भाऊ मिळाला म्हणून आनंद झालाच असेलच नै. मला तीन आई होत्या. आई..ताई.. आणि माई. आई मला मारायची. ताईही मारायची. माई मारणं टाळायची. बाबांनी फार मारलं नाही. पण जेव्हा मारलं तेव्हा वळ उठले. ताई-माई व माझ्यात जनरेशन गॅप. त्यामुळे आमच्यात म्हणाव्यात अशा गप्पा..चर्चा किंवा तत्सम झालंच नाही. झाली ती भांडणं. एकीशी भांडायचं..दुसरीनं मिटवायचं. एवढंच काय ते

...ते दिवस!

Image
तेव्हा ऑफिस गुरुतेंगबहाद्दूर स्टेशनच्या अगदी जवळ होतं . पण आम्ही किंग्स सर्कलला उतरून तिथनं चालत ऑफिसला जायचो . 10 मिनीटं लागायची . कधी एकटा . तर कधी मित्रांसोबत . आत्तापर्यंत केलेल्या नोकऱ्यांमध्ये सगळ्यांत लांब असलेली ही नोकरी . एलिक्झर डिझाईन्स . ही अॅड एजेन्सी सोडून आता जवळपास वर्ष होईल . नव्हे वर्ष झालं . 2014 च्या लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणूकांची फ्रीलान्स कामं संपली होती . मंकरंद आणि मी आम्ही दोघेही आता मोकळे झालो होतो . त्यात निखिल शिंदे हा आमचा कॉलेजमधला मित्र . त्याला महानगरपालिकांच्या निवडणूकांसाठी कँम्पेनिंग करायला टीम हवी होती . ते काम करावस वाटतं होतं . पण वेळ जुळून येत नव्हती . दरम्यान , मकरंदला एक स्टोरी आठवली . अँन्थन चेकॉव्हची . मकरंद कॉलेजमध्ये असताना त्यानं पैसा वसूल या एकांकीकेत काम केलेलं . पैसा वसूल चं संपादन तेव्हा इरावती कर्णिक आणि अद्वैत दादरकर ने केलं होतं . या एकांकीकेची शॉर्ट फिल्म करुयात का असं मकरंद ने विचारलं . तासभर फोनवर एकमेकांशी