Posts

Showing posts from July, 2015

...दहीहंडीसाठी 'पुन्हा' वाट्टेल ते?

Image
दहीहंडीला अजून तसा बराच वेळंय. पण पुढच्या आठवड्यात गुरुपौर्णिमेला गोविंदा पथकांच्या सरावाचा नारळ फुटेल.  पण खरंतर त्या आधीच दहीहंडीच्या बातम्यांचा नारळ फुटलाय. आशिष शेलार, प्रताप सरनाईक जोडीनं चॅनलवाल्यांना बाईट देताना दिसतायेत. साहसी खेळात दहीहींडीचा समावेश होण्याच्या शक्यता वाढल्याच ते सांगतायेत. नवी स्वप्न गोविंदा पथकांना दाखवली जातायेत. आनंदी आनंदय. आता दहीहंडीच्या उलट सुलट चर्चा सुरु राहतीलंच. पण पुन्हा एकदा या सीजनल बातम्यांना पेव फुटलंय. त्यावर प्रत्येक चॅनेलने एक-एक तासाचं डिस्कशन घेतलं तर आश्चर्य वाटायला नको. दहीहंडीबाबत थोडा सिरियसली विचार केला जातोय.. याचा आनंद आहेच.. त्याबद्दल कौतुक व्हायलाच हवं. पण… बरोब्बर चार वर्षांपूर्वी..२०१२ मध्ये दहीहंडीवर डॉक्युमेन्ट्री बनवली.. दहीहंडीसाठी वाट्टेत ते… हे त्या डॉक्युमेन्ट्रीचं नावं. दहीहंडीने नवी ओळख दिलीये. जेव्हा डॉक्युमेन्ट्रीवर काम करायला घेतला, तेव्हापासून ते आत्तापर्यंत अजूनही हा विषय जैसे थेच आहे. म्हणजे दहीहंडीविषयीचे जे प्रश्न घेऊन आम्ही उत्तर शोधायला चार वर्षांपूर्वी बाहेर पडलो.. तेच प्रश्न काल परवा मला विचारले गेल

जगण्याचं 'अभय' मिळेल?

Image
मॉर्निंग शिफ्ट केली आणि तसाच डायरेक्ट काल पत्रकार संघात गेलो होतो. रात्री यायला बराच उशीर झाला. खूप थकायला झालेलं. पुन्हा दुसऱ्या दिवसी सकाळी ऑफिस होतं. रात्रभर जुलाब… बाथरुममधनं बाहेर येण्याची खोटी… की पुन्हा मी आत. रात्र संडासात काढावी का असा विचार मनात येतच होता की त्यात बाबा उठवायला आले… अंगाला हात लावला तर अंग गरम….केवढा ताप आलाय… घामाघुम झालायेस.. बाबांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी उठून बसलो अंथरुणात तर ही पाठ पुन्हा दुखायला लागली… सगळं अंग जड झालं होतं… लगेचच सरांना फोन करून बरं नसल्याचं सांगितलं… आणि तासभर झोपून लगेच मेडीकल चेकअपला बाबा घेऊन गेले… डॉक्टरांनी गोळ्या दिल्या… त्याने थोडं बरं वाटलं पण कालची रात्र काही केल्या विसरता येत नव्हती… त्यावरूनच दिनेश आठवला… अभयला दिनेशबद्दल सांगायला हवं… दिवसभर घरीच होतो… काय करू या विचारांत अजून थकवा येत होता.. फेसबुकवर बेरक्या ची पोस्ट पाहिली… ती अभयचीच होती.. च्यायला म्हटलं ब्लॉगवर लिहूच आज आपण अभयला… आज त्याला फुकटत सेलिब्रिटी वगैरे झाल्यासारखं वाटलं असेल… तर मिश्टर अभय कुमार देशमुख… अरे ए... ऐक ना अभ्या .. तूला एक सांग