Posts

Showing posts from 2013

Remaining राडा

Image
झाला ना राडा...क्रमशः ०२ भ्यांचोद, मनावर कोण घेतो असली बकवास. साली काकू फालतू इंटरेस्ट घेते आपल्यामध्ये. असल्या खूबसूरत बायकांचं मी एक पाह्यलंय. रात्री आपल्या फोंगस नव-याला अंगावर घेउनही बखबखलेलं राह्यचं आणि दिवसा फालतू गोष्टीमध्ये इंटरेस्ट घ्यायचा. पोर होत नाही ना यांना. परत पोर होत नाही म्हणून दुस-याजवळ झोपण्य़ाची यांची हिंमत नसते. खूबसूरत काकूने तो काळ्या मण्यांचा थानापर्यंत सर घातला आहे ना, तसल्या फालतू गोष्टीमध्ये त्यांना आपली भलतीच शान वाटत असते. त्या गोष्टीची आम्हीही इज्जत करावी असं त्यांचं म्हणणं आहे. .... तुम्ही त्या नान्याच्या बहिणीकडे लक्ष देउ नका हो. मरु दे त्या रांडेला. सारी दुनिया ओळखते तिला. ... टँक्सीतले चार डोळे – दोन गॉगलमधले नि दोन काजळ घातलेले. घरासमोर जमलेल्या पब्लिककडे टरकून पाहात होते. ... अरे कशी जाशील ? – रांडे, ऐकून घे. मी आज तुझ्या घरासमोर बिस्तरा ठेवलाय. कभी न कभी ती येशील की नाही बाहेर. उस घडीतक इंतजार करूंगा. आजसे आपना घेराव शुरू. ... म्हणतात ना. नीती या कलियुगात पैशावरून ठरत असते. ... नेसलेली व्हाईट ती पुन्हा अंगावरून उतरवू लागली. छ

राडाचं राडा...

Image
राडा हा शब्द तसा दोन्ही सेनेवाल्यांचा पेटन्टंचं. पण मला हा शब्द भाउ पाध्ये यांच्या मालकीचा वाट्टो. राडा ही त्यांची कादंबरी वाचल्यापासना भाऊ आपल्याला आपल्या खास दोस्तासारखा वाटू लागतो. नाकेकरी फंटर असतात न् गल्लीबोळात...अगदी तसा. डीट्टो. राडाची नवीन आवृत्ती आली तेव्हा मटा मध्ये एक लेख आलेला छापून तो ही आठवला. पण त्याचा उल्लेख करण्याची आणि तसे लेख लक्षात ठेवण्याची मला गरज वाटत नाही. सध्या ऑफिस चर्चगेटला आहे. ट्रेन मधे बराच वेळ मिळतो. खूप नाही.. पण ब-यापैकी वाचन होतं. यात पहिली कादंबरी वाचली ती राडा. आणि त्यानंतर वाचली पुन्हा राडाच. व्वा. मज्जाच. मग असं वाटलं की या कादंबरी वर काहीतरी लिहावं. तिची वाहवा करावी. भाऊ बद्दल लिहावं. पण म्हटलं नकोत्या भानगडी कशाला करा. आधीच एवढ्या शहाण्या शहाण्या लोकांनी एवढं सगळं लिहून ठेवलंय ते सालं कोण वाचत नाही. आपलं कशाला कोण वाचणार. नकोच. पण यावर उपाय शोधला. पुन्हा राडा वाचायला घेतली. हो. अगदी तिस-यांदा. पण यावेळी राडा मधे असलेले काही परिच्छेद, डायलॉग्स् आणि मला आवडलेलं असं सगळं नोट डाउन करत गेलो. आठवडा भर चांगलं खाद्य मिळालं ट्रेन मध्ये प्रवास कर

लिलाव

Image
मी जगतोय स्वातंत्र्यात भोगतोय गुलामी स्वातंत्र्याची... मला नाही हक्क इथल्या व्यवस्थेत बोलण्याचा  तरी मी अभिव्याक्तिच्या अधिकाराची मालकी खिशात घेउन फिरत असतो माझ्या बोलण्याने  तसा फारसा फरक पडत नाही कुणालाच... कदाचित मी भान हरवलेला प्राणी आहे माझ्या एका हातात संस्काराची शिदोरी असते आणि एक हातात धारदार शस्त्र हे शस्त्र मी रोज वापरत असतो. श्वासावरती येणारी जळमटे दूर करण्यासाठी मी मोजत असतो माणसांचा प्रामाणिकपणा अन् डोकावत असतो आतल्या तळात मी शोधात असतो मलाच माझ्या अंतरंगात माझी गत तीच आत्मा हरवलेल्या  शरीरासारखी मी कोण? व्यवस्थेच्या तुटलेल्या  पादत्राणांना जोडणारा 'खिळा' मी कोण? माझ्याच घरात ति-हाईतपणाची वागणूक सोसणारा मी कोण? त्यांना नकोस असलेला 'शापित अर्थ' तरी मी लढत असतो झुंजत असतो इथल्या अर्थकारणाशी  समाजकारणाशी संस्कृतीशी कारण  मी अजून आत्म्याचा  लिलाव केला नाही!

अंधश्रद्धा निर्मूलन - समज आणि गैरसमज

Image
          पुराव्याअभावी एखादी गोष्ट स्वीकारण्याची आपल्या मनाची दृढ इच्छा म्हणजे श्रद्धा होय . अशी श्रद्धेची व्याख्या जॉन ड्यूईने केली . पुराव्याच्या आधारे मिळणा - या ज्ञानाचे क्षेत्र जसजसे वाढते तसतसे श्रद्धेचे क्षेत्र कमी कमी होत जाते . ज्ञानाच्या दृष्टीकोनातून श्रद्धेचे क्षेत्र कमी कमी होत जाते त्यामुळे श्रद्धेचे स्वरुप अभावात्मक आहे . अशी श्रद्धा व्यक्तिला कार्यप्रेरणा देते . यातूनच श्रद्धा आणि अंधश्रद्धेबद्दलचे समज आणि गैरसमज यावरील विचारमंथनास सुरुवात होते .                       भारतीय तत्त्वज्ञानात श्रद्धा व बुद्धी यांचा संबंध श्रुतिप्रामाण्यात दाखविला आहे . ब्रम्हजिज्ञासा , कर्मजिज्ञासा , योग आणि भक्ति यांचे आकलन होण्यासाठी श्रद्धा ही नेहमीच एक धार्मिक सद्गुण म्हणून आवश्यक बाब गणली गेली आहे . भगवद्गीतेतही श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होउ शकते - ' श्रद्धावान लभते ज्ञानम् ' , असे म्हटले आहे . म्हणून ईश्वराचे अस्तित्व दर्शविण्यासाठी श्रद्धा हा एक प्रमुख आधार मानला आहे