Posts

Showing posts from April, 2016

मी मज हरपून...

Image
त्यानं फोन स्विच ऑन केला. आताशा दोन आठवडे निघुन गेले होते. तो भानावर आला होता. पण राग काही शमला नव्हता. चुकून कुठंतरी व्यक्त होऊ म्हणून त्यानं व्हॉट्सअप, फेसबुकवरचा स्टेटसही अपडेट केला नव्हता.  रागाच्या भरात तिला फोन लावू म्हणून मुद्दाम फोनमध्ये बॅलन्सही भरला नव्हता. सगळं काही जाणीवपूर्वक. जाणूनबुजून.  आज काही ती फोन करणार नाही. त्याला खात्री होती. दोन आठवडे फोन बंद ठेवल्यावर ती कशाला आपल्याला करेल फोन?  तिलाही आला असेलच की राग.  आपण करावा का तिला फोन? तिला बिचारीलाही आपल्यासारखंच वाटत असेल ना? एकटं एकटं.  बट व्हाय शूल्ड अलवेज आय? हा विचार खाटकन त्याच्या डोक्यात शिरला.  तिला फोन करण्याचा विचार त्यानं सोडून दिला. स्वतःला उगाचच कशात तरी गुंतवून घ्यावं.. त्यानं ठरवलं.  पण कशात जीव गुंतवावा या विचारात असतानाच… फोन वाजला… रिंगटोन होती… मी मज हरपून.. बसले गं.. आशा ताईंच्या आवाजातलं गाणं.. सखी मी मज हरपून…. बसले गं.. सुरु होण्याआधीचं त्यानं तप्तरतेनं फोन रिसिव्ह केला…  कानाला लावला.. फोन आलाच तर काय बोलायचं आणि काय नाही… हे आधीच ठरलेलं होतं. दोन आठवडे त्याच विचार

गेले द्यायचे राहुन

Image
त्यानं तिला फोन लावला..रिंग वाजत राहली. शेवटी ऐकू आलं...नो आन्सर. पुन्हा फोन लावला. पुन्हा तेच. प्रयत्न सुरुच राहिले. अखेर तो वैतागला. वैतागून त्यानं प्रयत्न करणं सोडून दिलं. फोन दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवला. वैतागलेलं मन स्थिर होण्यात काही काळ गेला. शांत होण्यासाठी पुस्तक हातात घेतलं. तो पुस्तकात लक्ष केंद्रीत करू लागला. पण नजर सारखी फोनकडेच जाई.. अस्वस्थता स्थिर राहू देईना. फोन स्विच ऑफ करण्याचा विचार त्याच्या मनात येऊन गेला. मरु दे..तो मनाशीच पुटपुटला. हातातलं पुस्तक टेबलवर आटपलं आणि फोन तिथंच ठेवून तो निघून गेला. परत आला तेव्हा तिचा मिस कॉल होता... त्यानं लगेचंच कॉल बॅक केला… यावेळी रिंग वाजली… नो आन्सर ऐकू येण्याच्या काही क्षण आधी तिनं फोन उचलला.. ती- काय रे.. फोन करत होतास? तो - हो.. ती - बोल.. काय झालं? तो - काही झाल्यावरच फोन करायला हवा का? ती - तसं नाही.. पण ३० मिस कॉल होते.. म्हणून म्हटलं.. तो - बोलावसं वाटत होतं.. ती - अच्छा..बोलं ना तो - पण आता नाही वाटतंय बोलावंस ती - का? तो - वेळ टळून गेली आता ती - सॉरी अरे, फोन सायलेन्ट