Posts

Showing posts from August, 2014

सॉरी रे बाप्पा..

Image
ऐ बाप्पा.. ऐकतोयेस ना... तुझ्याशी बोलायचं होतं.. थोडं प्रायव्हेट होतं.. आहेस का तू ऑनलाईन...यू देअर...  ऑनलाईन दिसतोयेस तरी पण एका शब्दाने तुझा रिप्लाय नाही.. हे काही बरोबर नाही हा... मला राग येतोय आता तुझा... माझी सटकायच्या आधी प्लीज बोल ना काहीतरी.. अँटलिस्ट एखादी स्मायली तरी पाठव.. जेणेकरुन तू ऐकतोयस याची खात्री होईल मनाला.. बरं जाउदे.. मी सांगायचं काम करतो... ऐक.. मी काय म्ह णतो..   ते खरं तर तुला उद्या आणायला हवं होतं ना लोकांनी.. पण चारचार पाचपाच दिवस आधीच मंडपात आलायेस तू.. ठिक आहे.. कळतंय मला की तू बौअर झाला असशील कारण सोबत कोणी नसेल तुझ्या... पण उद्यापासून चांदीच आहे ना तुझी... पुढचे दहा दिवस तुझेच की... मग काय वर्षभर मोकळे आहेतच की सगळे.. वर्षभर चर्चा तर होणारच ना... असो.. त्याचं काय झालं की लेख वगैरे वाचले रे मी तुझ्या उत्सवावरचे.. खूप बदलला वगैरे आहेस म्हणे तू... पेपरात बिपरात चर्चा आहे फुल ऑन... चेंच तर पायजेच ना राव... तो तुझा लालबागचा फंटर आहे ना... यंदा भारी काम झालंय बग त्याच्या डेकोरेशन चं.. हा.. आठवलं.. एक्च्युली एक डाउट होता.. ह्या ज्या तुझ्या एवढ्या सा

रोखठोक नाना

Image
नाना पाटेकर वर आपण कितीही जोक मारले.. कितीही जरी त्याची मिमिक्री केली किंवा कितीही चेष्ठा केली तरी त्याच्या अभिनयाबद्दल, त्याच्या कलेबद्दल, त्याच्या बोलण्याबद्दल आणि लिहीण्याबद्दलचं त्याचं जे जिवंत आणि खरोखरी असणं आहे, त्याचा आपल्यावर एक प्रकारचा प्रभाव आहेच. तो प्रभाव आपण नाकारु शकत नाही. मग त्याचं सध्या असलेलं शेतात राहणं असो... आनंदवन ला पैसे द्यायचे होते म्हणून केलेला वेलकम सिनेमा असू दे... राजकारण्यांच्या इव्हेन्ट मध्ये जाउन त्यांच्यावरच तोंडसुख घेण्याचा त्याचा खोडकर स्वभाव असू दे.. त्याची अभिनयची स्वतःची अशी शैली असू दे किंवा त्याचं नुसतंच बोलणं असू दे.. लागबागच्या राजाचं लाईनमध्ये उभं राउन दर्शन घेणं असू दे.. त्याचं सामाजिक भान असू दे किंवा मग त्याचं लिखाण असू दे... विवेक नावांच एक साप्ताहिक आहे. सुप्रसिद्ध वगैरे म्हणू शकतो आपण त्याला. आमचा छोटा भाउ त्या साप्ताहिकात असल्यामुळे त्या साप्ताहिकाबद्दल आम्हाला थोडीफार आस्था. या सात्पाहिकासाठी नाना पाटेकर ने एक लेख लिहीला होता. निमित्त होतं गुरुपौर्णिमेच. लेख छापून येण्याआधीच नाना चा लेख येणार आहे हे कळालेलं. आमचा छोटा भाउ ..विवेक