चंदूभाउंच्या प्रेरणेने


ब-याच दिवसांनी लिहायला बसलोय. राग आलेला नसतानाही लिहायला बसलोय, हे नमूद करण्यासारखंच. राग आल्यावरच सहसा लिखाण घडतं माझ्याकडनं...ह्या वेळी माझंच मला आश्चर्य वाटावं अशा घडीला लिहायला बसलोय. अर्थांच चंदूभाऊंच्या प्रेरणेनेच...
चंद्रकांत वानखेडे यांच आत्मकथन वाचलं. चंदूभाउ हे अनेक सामान्य कार्यकर्त्यांमधीलेच एक कार्यकर्ते. नेते मंडळी बरीच माहिती असतात लोकांना पण नेत्यांचे कार्यकर्ते ऑल द टाईम बिहाइंड द स्टेज. अशा बिहाइंड स्टोरिज मधली ही एक आत्मकथा. सामान्य कार्यकर्त्यांच्या असामन्य जीवनाची हिशोबवही. ह्या हिशोबवहीचं नावं – आपुलाचि वाद आपणासी. मनोविकास प्रकाशनाकडंन प्रकाशित झालेलं हे २०० पानी पुस्तक.. डोक्याची आणि मनाची वेणी गुंडाळेल असंच काहीसं. ब-याच दिवसांनी खरतरं पुस्तक वाचलं. गाडीची सर्विसींग केल्यावर जसं वाटतं न् अगदी तसंच्या तसं वाटतंय. पुस्तकांचे रिव्हू वैगेरे लिहीण्यात मला काही रस नाही. पण हा माणूस मनात घर करुन जाईल असा वाटला पुस्तक वाचताना. पुस्तक वाचनीय आहे. मध्यंतरी अमरावतीला त्यांचा सत्कार झालेला. ओळखीची एक जवळची व्यक्ति गेली होती, त्या कार्यक्रमाला. त्यावरचा एक लेखही नवशक्तीमध्ये आलेला. वेड्यांचा सत्कार असं त्या लेखांचे शीर्षक होतं.
पुस्तक वाचून कालंच संपल. संपल्या संपल्या जवळच्या सर्व यार दोस्तांना एसएमएस करुन टाकला की हे पुस्तक वाचाच, अशा आशयाचा. कोणचा काही रिप्लाय नाही आला... फक्त एका दोस्ताचा फोन आला. रात्री खूप वेळ चंगळ गप्पा मार-या. नको-नको त्या भलत्यासलत्या विषयांवर चर्चा केल्या. खूप वेळ आमच्या बोलण्यात इथून तिथून शरद जोशीच येत होते. शरद जोशी हे शेतकरी आंदोलनाचे नेते-सर्वेसर्वा. ते किती चांगले आहेत-किती वाईट आहेत. याच्याशी माझा सरळ सरळ काहीचं संबंध नव्हता. पण पत्रकारीता शिकत असल्याकारणानं आपले सगळ्यांशी संबंध आहेत, असंच वागावं लागत खूपदा. असो. चंदूभाउंच्या पुस्तकात जोशी यांच्यावरही बरंच काही लिहीलं गेलेलं आहे. त्यांनी शरद जोशींना फार जवळून पाहिलेलं असल्याकारणानं तसं होण रास्त आहे. शेतकरी होण्याचा मी विचार करत असताना अशा पद्धतीची पुस्तकं वाचून कोणाचीही टरकेलं.
सध्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे. गावी वडलांनी ब-यापैकी आंब्याची बाग तयार केलेलीय. त्यावरतीच सगळं काही व्यवसाय थाटायच्या मी विचारात होतो-आहे. साधारणपणे माझ्या घरातले कार्टा कुठे नोकरी शोधतोय... किंवा याला नोकरी मिळावी या चिंतेने ग्रासलेले आहेत. त्यामुळे त्यांना आताच निराश करण्यात काही अर्थ नाही. पण शेती म्हटलं की कसंसंच चित्र लोकांच्या मनात येउ लागतं. अर्थात त्याच्याशी माझं देणघेणं काहीचं नाही. आणि वडीलधा-यांनीही माझ्या नोकरीची चिंता करणं, यात अयोग्य काहीच नाही. समाज वैगेरे बदलवण्याच्या भानगडीत पडायचं नाहीये मला. पण समाजाचं देणं फेडूनही समाजावर आपल्याला काही उपकार करायचे नाहीयेत. आनंद सगळ्यात महत्वाचा.
गेली दोन वर्ष अतिशय ग्रासलो होतो. समाज नावाच्या अतिशय जड शब्दाने आणि त्याच्या संबंधित असलेल्य जोडशब्दांनी. आता फ्रेश झालोय. किंचित स्वार्थी ही बनलोय असं म्हणायला हरकत नाही. कसंय की आपण म्हणतो की लोकांसाठी काम करायला पाहिजे...आपल्यापरिनं त्यांना मदत करायला पाहिजे. आता जो पर्यंत कळणार की नक्की घोडं अडतंय कुठे, तो पर्यंत काही करणं शक्क्यचं नाही. सुरुवात गावापासून होईल. अर्थांत तिही माझ्यांच. लोक काय म्हणतील याचा विचार तर अजूपर्यंत तरी कधी केला नाही. आणि यापुढे करेन अशी काही शक्यता सध्या तरी नाही

Comments