आता मलाही त्यांची भिती वाटते!


शरद पवारांवर हल्ला झाला २४ नोव्हेंबर २०११ ला. हरविंदर सिंग नावाच्या कुणा पंजाबी युवकाने हा हल्ला केला. चांगलीच कानाखाली पेटवली शरद पवारांच्या. 

हा प्रकार घडला तेव्हा मी दादर ला होतो. सोबत प्रसाद पराडकर नावाचा मित्र होता. प्रोजेक्टच्या निमित्ताने आम्ही शिवाजी पार्क च्या दिशेने निघालो होतो. जाताना आयडीअल-श्रीकृष्ण च्या गल्लीतनं गेलो. तेव्हा सगळंकाही अगदी सुरळीत चालू होतं. पार्कात बराच वेळ चर्चा करत बसलो होतो. पार्कातल्या मैदानात कबड्डीचे सामने लागले होते. २३ तारखेला बरीच मोठीमोठी नेते मंडळी येउन गेली होती. त्यात शरद पवार हे ही एक नाव आणि फोटो बॅनरवर लागलेला होताच. आणीही फोटो अन् नावे होती. साधारण २च्या सुमारास तिथे एक महिला पत्रकार लोकांना मुलाखतीसाठी विचारणा करीत होती. आम्ही मात्र गप्पांमध्येच होतो. पार्कातलं हे असं पत्रकारांच येणंजाणं काही नवीन नव्हतं आम्हाला. (नंतर कळालं की ती काय प्रश्न विचारणार होती ते.)
साधारण ३च्या सुमारास आम्ही पार्कातून निघालो. येताना शिवसेना भवनाकडनं परतीच्या वाटेला लागलो. बाळासाहेब आणि राज याच्यातल्या तुलनेवर गप्पांमधून विनोद होत होते. जीप्सीपर्यंत पोहोचल्यावर कळालं की रस्त्यावर बरेच पोलिस जमा झालेत. शिवाजी मंदिर आणि पुढे पुन्हा आयडीअलच्याच गल्लीतनाचं परत येत होतो. येताना सर्व काही बंद दिसत होतं. त्या वेळेला पाहिलेली शांतात कधीच पाहिली नाही दादर मध्ये- सोमवार सोडला तर. पण श्रीकृष्ण ही बंद. पुढे आयडीअल ही बंद. पोलिसांचे जमाव. असं बरचसं विचित्र चित्र.
घरी जायची घाई होती. आम्हाला वाटलं काय तरी झालं असेल. वारलं असेल कोणीतरी.
मग भवना वर इतका फौजफाटा का होता. साहेबांना तर काही.... तसं काही असेल तर पुढचे दोन दिवस बातम्या बघायलाच नकोत... हिंदुहृदयसम्राट, वाघाची कारकीर्द वगैरे विशेष सेगमेन्ट च्या आम्हा बाता मारत होतो.
नंतर माझ्यातला पत्रकार लगेच जिवंत झाला. प्रसाद ला म्हटलं... चल किमान पाहून येउ. का दुकान बंद ठेवलीयेत ते. त्याला त्यात काही इंटरेस्ट नव्हता. मला ही घर गाठायचं होतं. प्रस्ताव खारीत करण्यात आला. पुन्हा भेट कुठे कशी होणार याची चर्चा स्टेशनवर चाललेली. मोबाईल वर कॅलेडर पाहत होतो. वाटलं घरी फोन करुन विचारुया..काय झालंय ते... म्हणून तसा फोन केला आणि न्यूज चॅनेल चेक करण्याचा आदेश घरच्यांना दिला. बोलता बोलताच ट्रेनमध्ये चढलो. नंतर आई ने फोन करुन पवारांवर झालेल्या हल्ल्याच्या हेडलाईन्स मला सांगितल्या. लगेचच प्रसाद ला फोन केला. त्याला हकिकत सांगितली. पण ट्रेनमध्ये नीटसं काही ऐकूच येत नव्हतं.
प्रसाद डोंबिवलीला जाणार होता आणि मी अंधेरी ला. ट्रेनमध्ये बसायला मिळावं म्हणून हा पठ्ठ्या चिंचपोकळी ला जाणार होता हे आधीच ठरलेलं होतं.
मी घरी पोहोचलो तेव्हा प्रसाद ठाण्याला होता. मुलुंड चेकनाका आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ रोखून ठेवला होता, ही बातमी कळाली.
पुन्हा प्रसाद ला फोन. फोनवर वर कळालं की त्याला बसायलाच नाही मिळालेलं. त्याही पेक्षा महत्वाचं की लोकलमधल्या प्रवाशांमध्ये चर्चा होत चालेली की त्या मागच्या ट्रेनलाच काही काळ मद्जिद ला रोखून धरलेलं.
हातपाय तोंड धूउन होईपर्यंत सगळाच राडा लक्षात आलेला. फोन करुन घरच्यांना बातम्या बघायला सांगितलं यायचं घरच्यांना जास्त कुतूहल वाटत होतं. मग चाळीत चर्चा..सगळ्याची पोरं बीरं घरी आलीयेत का...नसतील तर ती नेहमी येतात कशी. आज नेहमी सारखी परिस्थिती आहे की नाही...यांवर तर्क वितर्क लावले जात होते.
आणि एक अर्ध्या तासाने प्रसाद पोहोचलेल्याचा फोन आला तेव्हा जरा हायसं वाटलं. दिवसभर बाबांनी मला मग चॅनल बदलण्याची संधीच नाही दिली.
हा सगळा प्रकार तितका थरारक नव्हता. पण जेव्हा कोणी तर हरपित सिंग का कोणी नावाचा इसम पंतप्रधानपदाचे उमेदवार मानले जाणा-या महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्याला किंबहुना केंद्रातला मंत्री असलेल्या व्यक्तिवर हात उचलतो. नंतर फोडाफोडी होते. जिल्ह्याजिल्ह्यांत बंद पाळले जातात यांपेक्षाही नेत्यापेक्षा जर का सामान्य माणसाला अशी कानाखाली खावी लागली... भांडणाचं निमित्त काहीही असेल... अशा कानचेक करणा-या घटना सामान्यांत होण्याचे प्रकार जास्तच वाढल्याचं जाणवंल..तर काय होईल.
मला जरा का असं कोणी मारलं असतं तर मी काय केलं असतं... किंवा ट्रेन मध्ये बाचाबाची तर रोजच होते... आता हातापायी ला सुरुवात झाली तर...
आता आम्ही काही तरुण आहोत... पण पवारांच्या वयाच्या माणसांसोबर असं झालं तर... आता कायतरीच विचार मनात तेढ निर्माण करत होते.
पवारांवर हल्ला होउ शकतो... तर मग भ्रष्टाचारी बिल्डरच्या विरोधात लढणा-या आमच्या जोशी काकांवर पण हल्ला होउ शकतो... आता ह्या हल्याची भीती वाटू लागली होती.
पवारांसाठी सगळे पक्ष निषेध नोंदवायला एकत्र आलेले. पण जोशी काकांसारख्या वयोवृद्ध सामान्य माणसाचं काय... त्याच्या लढ्याचं काय... त्यांच्या सुरक्षिततेच काय...
संध्याकाळी पॅनल डिसकशन वर चालेली बाचाबाची ऐकून त्या वक्त्यांच्याही कानाखाली मारावी इतकी या सगळ्याची चीड येत होती. नकोनकोत्या लोकांच्या प्रतिक्रियांवर पवारांचा किस्सा रंगवला जात होता. बाबांना मात्र ते एकायला मजा येत होती. फेसबूक वर आलो... तर सगळे हरप्रित सिंग च्या बाजूने स्टेटस अपडेट करत होते. प्रसन्न कुलकर्णी तर फेसबुक प्रतिक्रियांचा रेफरन्स् वापरत होता. सगळंच विक्षिप्त वाटत होते... २६-११ ला झालेला हल्ला त्यामाने बरा होता असं वाटलं... म्हणजे तेव्हा माहित होतं नेमका शत्रू कोण आहे ते... पण आता कोणी शत्रूही नाही.. आणि मित्र तर नाहीच नाही...
आम्ही शाळेत असताना ब-याच मारामा-या वगैरे करण्याच्या गोष्टी करायचो... कधीकधी करुनही यायचो. पण ज्याच्याबरोबर करायचो त्यांना आता शब्दांची भाषा कळतेय... नेत्यांना कळत नसावी अशाही प्रतिक्रिया येत होत्या. पण सध्या जास्त काळजी नेत्यापेक्षा जनसामान्यांचीच वाटतेय... म्हणजे ज्या देशात केंद्रिय कृषि मंत्र्यांवर हल्ला होउ शकतो तिथे आपण तर आम जनता आहोत... तर जरा साभांळून सगळ्यांनी... गांधिगीरी आठवा आणि तिचं आचरण करा असं सांगायलाच मला लाज वाटतेय.. कारण सेल्फ डीफेन्स वरच आता सगळं काही निर्भर आहे.
पुन्हा एकदा नाना पाटेकर आठवला आणि त्याचा प्रहार पिक्चर आठवला. (त्यालाच अनुसरुन राणेंनीही पेपराचं नावं ठेवलं असावं अशी शंकाही आताच येउन गेली मनात...) 
बघा विचार करुन... आपल्या सगळ्यांच्या सेफटी आणि सिक्युरिटीचा...

Comments

siddhu भिडलं रे...!!!
n not just saying for sayings sake, it was real good,
can see a Journalist in making, as Journalists influence common people's way of thinking, I must say It is quite a THOUGHT.
Siddhesh Sawant said…
अरे... मःनपुर्वक आभार...