आयुष्य तेच आहे...अन् हाच पेच आहे...



गझलनवाज भीमराव पांचाळे एक जबराट व्यक्तिमत्व आणि गायक आणि माणूसही. त्याची गझल ऐकतच हा ब्लॉग लिहायला सुरुवात केलीये... वाचता वाचता तुम्हीही ती ऐकली तर माझं म्हणणं लवकर तुमच्यापर्यंच पोहोचेल... ही त्या गझल ची लिंक...http://www.youtube.com/watch?v=SixqjznQV20

आज बरंच काही होतं लिहीण्यासारखं. मध्यंतरी वेळच मिळत नव्हता लिहायला. पण मनात साठवून ठेवलंल लिहायचंच असं प्रत्येक क्षणाला ठरवत होतो. अखेर आज तो योग आलाच. कालच घरी सत्यनारायण घातला. दरवर्षी मार्गशीर्ष मध्ये असतो... पण यंदा थोडा विलंब झालाच.
डिसेंबर १, २०११ पासून एका कास्टींग एजेन्सीमध्ये नोकरीला लागलेलो. पद होतं...विडीयो एडीटर. उत्साह मनातल्या मनातच उड्या मारत होता. पगाराची फिकीर नव्हती. अनुभव महत्वाचा वाटत होता. कसला डोंबल्याचा अनुभल मिळाला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरेल. खरं तर बरंच काही शिकलो. पण त्याचा एडीटींग शी काहीच संबंध नव्हता.
मी लास्ट इअरला आहे. उपद्व्याप या वर्षाला काही करणार नाही असं ठरवलेलं असतानाही या वर्षी
ब-याच करामती करत होतो. नकळतपणे त्या करामतींना यशही येत होतं. आत्मविश्वास गुणावत होता. अशातच मला एका कास्टिंग एजेन्सिमधून नोकरीचा कॉल आला. मी ही गेलो इंटरव्हूला. ज्या माणसाने इंटरव्ह्यू घेतला, तो ३-४ चित्रपटांचा निर्माता होता. मुलाखत छान झाली. मी कॉलेजही करत असल्याने त्यांना मला दोन दिवस विचार करण्यासाठी वेळ दिला होता. तसा मीही तो केला. सगळ्यांनी मला ही नोकरी करण्याचा सल्ला दिला. लेज सांभाळून हे करता येण्यासारखं होतं. मी ही तो स्वीकारला आणि १ डिसेंबर पासून रुजू झालो. स्टाफ खरंच खूप चांगला होता, आहे.
सुरुवातीचे १५ दिवस मनासारखं सर्व काही चालेल्लं. पण नंतर का कुणास ठाउक मज्जा येत नव्हती.
(याचं कारणं इथे सांगणं उचित ठरणार नाही.) जवळपास आणि ५ दिवसच काम केलं असतं तर अख्या महिन्याचा पगार मिळाला असता...पण मला तिथे थांबण्यात काहीच रस वाटत नव्हता. २ तास विचार मनात घोळला...आणि लगेचच राजीनामा....नोकरी सोडली. नोकरी सोडतानाही दोन दिवस विचार करण्यासाठी भर पगारी सुट्टी मिळत होती...पण १२ तासच पुरेसे होते विचार पक्का करण्यासाठी...पगारावरही लाथच मारलेली. घरच्यांनीही माझ्या निर्णयाचं स्वागतचं केलं. कदाचित त्यांना मी नोकरी करावीशी वाटतंच नव्हती. कारण २२ डिसेंबर ला वाढदिवस होता आणि तो पुर्ण दिवस मला ऑफिसात कामात गेलेला...आयुष्य हरवल्यासारखं वाटत होतं. फोन एसएमएस येत होते... पण काहीतरी अर्धवट राहत होतं.
नोकरी मिळालेल्याचा जसं सगळ्यांना कळवलेलं तसचं नोकरी सोडलेल्याचंही कळवलं...
आता धमाल आली. नोकरी सोडली त्याच्या दुस-याच दिवशी ड्रिम्स् प्रोडक्शन स्टुडियोतना फोन आलेला आणि त्यांनी आणखी चांगली ऑफर दिलेली पण आता ऑफिसातलं राजकारण कळालं होतं... आय़ुष्य कळालं होतं... आपली माणसं... आपली कामं.... आणि ऑफिसातली माणसं आणि ऑफिसातली कामं यातलं समिकरणं कळतंय.
म्हणूनच आता पुन्हा करामती करायच्या नाहीत असं ठरवलंय...पण त्या करायच्या थांबतील असं मुळीच वाटतं नाहीये...आणि त्या थांबाव्यात अशी जराही इच्छा नाहीच आहे...कारण त्या करामतींवर मी माझं उपद्व्यापी आयुष्य आनंदाने जगतोय.
आपलं आयुष्य आपल्या नियमांप्रमाणं जगायचं असं ठरलंय... आणि म्हणूनच जितक्या उत्साहाने नोकरी ला होकार दिलेला तितक्याच उत्साहाने नकारही देउ शकलोय...

Comments

Ankush Sutar said…
पण प्रत्येक वेळी असे घडेलच असे नाही....!
Siddhesh Sawant said…
आणि प्रत्येक वेळी असंच काही व्हावं अशी मानसिकता नाहीच आहे रे अंकुश...
manjarrrr said…
आपल्याच नियमानी जगलेल्या आयुष्यात खंत राहणार नाही ...प्रत्येकाने तसाच जगावं हीच इच्छा
Siddhesh Sawant said…
प्रत्येकाचे नियम वेगळे असतात... त्याचप्रमाणं प्रत्येकाला असणारी खंत ही वेगळी असते... परिणामी प्रती... विचार करणं अपरिहार्य...