परत..



  साधारण सात महिन्यांचा तो काळ आहे. जानेवारी पासून ते आत्ता आत्ता काल परवा पर्यंतचा. या दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या मानसिकतेमधनं जाता आलं. जावं लागलं. त्यातल्या काही मानसिकता खूप घाबरवणा-या होत्या. काही खूप उत्साहीत करणा-या. काही खूप विचित्र तर काही अतिशय मार्मिक होत्या. त्या सगळ्यांचच स्वागत करायला हवं. त्यांना स्वीकारायला हवंय. त्या निमित्ताने हे सगळं विवेचन..
होय. मी टीव्ही ९ सोडलंय आणि त्याला आता दीड वर्ष झालंय. खूप लोकांना अजूनही अस्संच वाट्टं की मी टीव्ही ९ मध्ये अजूनही काम करतोय. त्या बद्दल थोडंस. मीडीयात …मेन स्ट्रीम मिडीयात मी तीन महिने होतो. झोकून काम केलं टीव्हीत असताना. वेळेची पर्वा वगैरे केली नाही. तीन शीफ्ट सलग काम करण्याचे परिणामही भोगले. पण टीव्हीत काम करणं हे घरच्यांना, नातेवाईकांना आणि परिचयाच्या माणसांना सांगण्यासाठी म्हणून सोडलं तर त्यात जराही ग्रेटनेस नाही. टीव्हीत तोचतोच पणा आहे. वरवर सांगताना सगळे सिनिअर्स नवेपणाचा ढोंग करतात पण त्यांना कोणीतरी सिनिअर असतो आणि त्यांना काही अलिखित नियम फॉलो करावे लागतात, याचा प्रत्यय टीव्हीतल्या पहिल्या नोकरीत आला. 
लोक मला अस्सं म्हणतात की तीन महिन्यांत काय घंटा अनुभव मिळणार.. खरंच आहे. पण जे वर्षानुवर्ष टीव्हीत आहेत त्यांनी त्यांच्या चँनल ची ओळख सोडून काहीतरी स्वतःच केलंय किंवा करतायेत असे लोक मला दाखवावेत. असे लोक ही मिडीया मध्ये आहेत… पण त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी. टीव्हीत राहून माणसं स्वतःचं अस्सं फार काही ग्रेट करु शकत नाही असं नाही… करु शकतात. सचिन परबांनी प्रबोधनकार.कॉम प्रोजेक्ट केला.. मी मराठी चे कार्यकारी संपादक असताना. पण अशी माणसं फार थोडी. अपवादात्मक. बरं ह्या माणसांनी टीव्हीत नोकरी करताना इतर काही करण्याची अपेक्षा बाळगणं तस गैरच. कारण त्यांना असणारा बौद्धीक ताण, धावपळ इतकी असते की त्या कामाच्या १० तासांनंतर काही आउटपुट ओरीएन्टेड प्रॉडक्ट जी अपेक्षा करणं, म्हणजे दुष्काळग्रस्त भागातून ऊस पिकवण्यासारखं आहे. असो.
टीव्ही नाही आवडला. तिथे खूप इनसिक्युरिटी आहे. सगळ्याच बाबतीत. आर्थिक. वैचारीक. बौद्धीक. शारिरीक. वैयक्तिक. इत्यादी. मला नाही जमल टीव्हीत काम करणं… आणि झेपलं सुद्धा नाही. मे २०१३ च्या शेवटच्या आठवड्यात टीव्ही ९ सोडलं तेव्हा काहीही विचार केलेला नव्हता की पुढे काय करायचं ते.. टोटली ब्लँक.
जून महिना काही नाही केल. जुलै ऑगस्ट असोसिएट रायटर म्हणून काम केल पण ते ही फ्री लान्स. ब-यापैकी पैसे मिळाले. ते काम ऑक्टोंबर मध्ये संपल. पुन्हा ब्लँक. थोडासा फ्रस्टरेट झालेलो. त्यात न्यूज एक्सप्रेस नावाचं चँनेल येणार असल्याचं समजलं. देउन आलो इंनटरव्हू. सिलेक्ट पण झालो. पण त्याच दरम्यान सलाम बॉम्बे मधून कॉल आला.. मिडीया कॉरर्डीनेटर कम सिनिअर फँसिलिटेटर साठी. तिथेही सिलेक्ट झालो. द्वीधा मनस्थिती होती. 
खूप लोकांशी बोल्लो. ब-याच जणांनी न्यूज एक्सप्रेस ला जा असंच सांगितलं. पण मी म्हटलं ह्या वेळी नकोच जायला टीव्हीत. म्हणून सलाम बॉम्बे ला गेलो. पगार हा ही त्या मागचा एक फँक्टर होताच. सलाम बॉम्बे ला गेल्यामुळे ब-याच जणांच्या भुवया उंचावल्या होत्या. एनजीओ मध्ये काम करणं म्हणजे काहीतरी ग्रेट समाजसेवा एन ऑल असण्याचा माझा अंदाज थोड्याच दिवसात खोटा ठरला. दोन महिन्यात वैतागलो किचन पॉलिटीक्स ला. सामाजिक संस्थांचा फोलपणा ही चांगलाच कळून आला. अगदी जवळून. नाही पटलं. मारली लाथ. लाथ मारताना ब-याच जणांनी साथ दिली. त्यात सगळ्यांत मोठा पाठिंबा एका खास व्यक्तिचा होता. त्या व्यक्तिमुळे मला सलाम बॉम्बे सोडण्याच धाडस करु शकलो. थँक्स् दिपाली.
आता जानेवारी २०१४पासनं काय केलं आत्तापर्यंत… तर निव्वळ जगलो.. मनमुराद. म्हणजे फार पैसे कमवले नाहीत. नोकरी केली नाही. किंवा फार मेहनत पण नाही केली. पण जगलो. त्या जगण्यात माणिकराव गावित सारख्या नेत्याची डॉक्युमेन्ट्री एडीट केली. छोटीशी गोष्टी नावाचा सिनेमा एडीट केला. कॉर्पोरेट फिल्म केल्या. भरमसाट वाचलं. ब्लॉग लिहीले. फिर फिर फिरलो. शॉट फिल्म् चे स्क्रिनप्ले.. शॉट डिव्हीजन केले. गेस्श्ट लेक्चरर म्हणून मास्तरकी केली. विटी दांडू नावाच्या मराठी बिग बजेट सिनेमाचं मेकिंग केलं. वेडींग शॉर्ट फिल्म केली. बरंचस लिहीलं. बांदल सरांच्या पुस्तकाच काम पाहिलं. ते ही प्रकाशित झालं. पण गेल्या मे महिन्यापासनं थोंड विचित्र विचित्र वाटू लागलं. 
परत नोकरी करावीशी वाटू लागली. परत नोकरी शोधू लागलो. बांदल सरांच्या परत फक्त पैशांसाठी  नोकरी शोधत नव्हतो …तर बिझी होण्यासाठी. स्वतःसाठी नाही… घरच्यांसाठी… आमच्यासाठी… आपल्यासाठी… माझ्यासाठी… तुझ्यासाठी. ह्या वेळी थोड्या प्रायोरिटीज बदलून पाउलं उचलायचं ठरवलं गेलं… माझ्याकडून नकळंतच. नोक-या शोधत होतो. ऑफर येत होत्या. पण कुठे ऑफिसच लांब… कुठे प्रोफाईलच एक दोन महिने टिकण्यासारखी… कुठे शिफ्टच काय… कुठे पगार कमी… कुठे काय नि कुठे काय… सगळं अजबच. ब-याच ठिकाणी जाउन यायचो.. एचआर वाल्यांचे कुठे दोन तर कुठे तीन राउंड व्हायचे.. शेवटी सिलेक्टशन पण व्हायचं.. पण मीच नाही बोलून यायचो… नकार कळवायला मजा यायची.
खूप वैतागलो… फ्रस्ट्रेट झालो… निर्णय घेण्याची क्षमता गवामून बसलो…प्रचंड डिप्रेशन.. प्रचंड मानसिक खळवळ…काही कळत नव्हतं काय चाललंय…आताही काही फार कळतय अशातला भाग नाही… पण जे करावसं वाटतंय ते करायला मिळत नाही.. म्हणून थोडी घुसमट होउ लागली होती.. होत असतेच ती… ह्या वेळी जवळपास सात महिन्यांपेक्षा अधिक काळाचा ब्रेक घेउन परत नोकरीचा सिरीअसली विचार केला. पण ह्या वेळी सगळी समीकरणं बदलवली. बी कॉम चं शिक्षण घेउन कॉल सेंटर मध्ये काम करणा-यांना शिव्या घालणारा मी… स्वतः पत्रकारीतेत स्पेशलाइज्झ पदवी घेतली… पण आता काम अँडव्हर्टायझिंग मध्ये करणार आहे… थोडंसं पचवायला कठीण जाईल सुरुवातीला. पण नक्की पचेल. आता जॉईन होतोय ह्या नव्या को-या माझ्यासाठी नवख्या असणा-या फिल्ड मध्ये कॉपी रायटर म्हणून… हे असं का केलं वगैरे याची काही उत्तर आणि स्पष्टीकरणं नाहीत माझ्याकडे. मला वाटलं … मी केलं… आणि करतोय.
इथे मला काही काळ थांबायचं… थोडं सहन करावं लागलं.. सोसावं लागलं.. घुसमट झाली तरी देखील इथे स्वतःला काही वेळ द्यायचाय… त्याच्या जोडीला माझी फेस ऑफ शँडो नावाची शॉर्ट फिल्म पण लवकरच आपल्यासमोर आणणार आहे… वर्षाला किमान एक शॉर्ट फिल्म करण्याचा मनसुबा आहे.. आम्ही लढवय्ये नावाचा ब्लॉग प्रोजेक्ट अर्थवट ठेवला होता.. तो सातत्याने अपडेट करत राहायचाय… प्रतिपंढरपूर वर एक एव्ही लवकरच तयार होतोय…  पैसा वसूल नावाची अजून एक शॉर्ट फिल्म ही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे… त्यात गणपती वर पण नवीन काहीतरी मांडण्याचा प्रयत्न काही मित्रांसोबत करण्याचं विचाराधीन आहे…  थोडक्यात परत एकदा नव्याने दमदार सुरुवात करण्यासाठी मार्केट मध्ये उतरतोय… मी परत येतोय. गुड लक टू मी.

Comments