...माझा महाराष्ट्र?


निवडणूका जवळ आल्या कीच राजकिय घडामोडींना उधाण येत. स्वाभाविकच आहे ते. पण २५ तारिख इतिहासात नोंदवली गेली. २०१४ च्या घटस्थापनेच्या दिवशी असा राजकिय इतिहास घडेल याची जराही अपेक्षा नव्हती. आघाडी मध्ये बिघाड झाल्याच जराही आश्चर्य नव्हतं. पण दोन्ही युत्या एकाच दिवाशी तुटल्यामुळे वर्ल्ड ब्रेकअप डे साजरा झाल्या सारखं वाटलं.
राजकारणातलं मला १ टक्का ही कळत नाही. त्यामुळे मला त्याच्यातले अंदाज वगैरे लावता येत नाहीत. पत्रकार कुठलाही असला तरी राजकारण हा त्याचा फेव्हरेट हॉट टॉपिक आहे आणि नेहमीच राहील. असं असताना राजकारणातल्या अभ्यासापासून मी काहीसा लांबच राहत आलोय. पण तरी यंदा ज्या काही चर्चांना उधाण आलंय, वेगवेगळे निष्कर्ष लावले जातायेत..त्यांचा एकूणच आढावा घेतला तर माझ्या मनात खुप प्रश्न कल्ला करतायेत.
त्यातले काही अगदीच बाळबोध आणि टुकार असले तरी ते प्रश्न जिवंत आहेत...आपण जाणकार असाल तर यावर बोलावं...मार्गदर्शन करावं... हक्कानं समजवावं...
सेनेला १५१ जागा हव्या होत्या पण त्यातल्या अर्ध्या तरी कन्फर्म निवडून येतील असं होतं का..
उद्धव यांनी मुख्यमंत्री होण्याआधी नगरसेवकाच तरी काम केलंय का..
आदित्य ठाकरे यांना युती तुटण्याचं दुःख का झालं असावं...
अमित शहा सेने साठी व्हीलन कसे काय असू शकतात...
राज ठाकरे या निवडणूकीमध्ये नापास झाले तर ते संपल्यात जमा आहेत का..
उद्धव ठाकरेंना किंवा सेनेला मत द्यावं असं काय ग्रेट विकास सेनेने लोकांसमोर ठेवलाय... मुंबई महानगरपालिकेने काय ग्रेट कामं केलियेत... नालेसफाई खड्डे... इत्यादी इत्यादी.. ते पाहता सेने ला फ्युचर मध्ये काय स्कोप असणार
सेनेकडे बोलणारे किंवा लोकांना प्रोमिनंट वाटणारं भाषण करणारे असे किती नेते उरलेत... उद्धव.. जोशी सर... कदम.. देसाई.. सरदेसाई... छे... यापैकी कुणीच नाही...
सेनेला मत देणं म्हणजे आपण हिंदुत्वाचा पुरस्कार करणं किंवा शिवाजी महाराजांचा सन्माम वगैरे करणं आहे का... उगाच काहीही
मनसेची ब्लु प्रिन्ट आली... त्यात काय आहे हे अजूनही कळलेलं नाहीये.. खरंच ते जाणून घ्यायची इच्छा आहे का कुणाला...
मोदींनी महाराष्ट्रात येउन येत्या निवडूणकांच्या प्रचारासाठी किमाम ५ जरी ऑन लाईन सभा घेतल्या तर खरंच फरक पडेल का..
ज्या बालेकिल्यांबद्दल कार्यकर्ते आणि इतर लोक बडबड करतायेत तिथले लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांचा मतदार बदलणार नाही, ही गोष्ट १ टक्का तरी खरी आहे का
कॉग्रेंस खरचं जनतेला नकोशी झालीये की राष्ट्रवादी...
आपल्याला राजकारणं तलं सगळं कळतं अशा आर्विभावात असणा-या माझ्या पत्रकार मित्रांना लोकसभेच्या निवडूकांमध्ये त्यांनी अकलेचे काय तारे तोडलेत हे कळलेलं असणारच आहे.. तरीही त्यांनी माझ्यासारख्या चिल्लर, सर्वसामान्य मतदार असलेल्यांना आणि शक्य असल्यास प्रथमतः मतदानाचा हक्क बजावणार असल्यामुळे मार्गदर्शन करावं...
प्रश्न अजून बाकी आहेत..
मोंदीचा कित्ता गिरवत इतरही पक्षातले सगळेच नेते, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार सोशल मिडीयाचा आधार घेउ पाहतायेत...त्यात ते बरेच सक्रिय झालेत.. त्याचा उलटाच परिणाम हातोय असं नाही का वाटत.. मोदी जैसा करने चले और खायी मे गिरे, असं होताना दिसतंय.. कॉपी केल्यासारखं वाट्टतय की नाही..
संपुर्ण महाराष्ट्र घेतला तर कुठल्याच पक्षाला एकतर्फी सरकार करता येणं सध्या तर शक्य दिसत नसलं तरी जे ब्रेक अप झाले त्यांनी पार्टनर बदलून पुन्हा कमिटेड झाले, तर जनतेच्या विश्वासाला तडा जाईल की जनतेला असेही ते मुर्ख बनवत आलेत.. पुढची पाच वर्ष पुन्हा मुर्ख बनायचंय...काय शक्यता प्रति शक्यता वाटतायेत.
मी ज्या वॉर्ड मध्ये राहतो तिथे वायकर वर्षानुवर्षे जिंकत आलाय.. युती असल्यामुळं तिथं भाजप चा कोण लिडर अस्तित्वात आहे.. तो जिवंत आहे की मेलाय.. इथपासून सुरवात आहे.. पण तरीही बीजेपी ची लिस्ट जाहीर झालेली नसताना पब्लिक चौकश्या करतेय की.. अपने यहॉं मोदी का कौन बंदा खडा है... हे चित्र अनेक मतदार संघातलं..
रिक्षावाल्याची एक अँड सध्या टीव्हीवर सुरुये.. त्या रिक्षावाल्याने अगदीच टुकार भाषण दिलाय.. स्र्किप्ट जितकी दमदार होती त्यातले सगळे पंच त्याने खाल्ले आणि एकच पंच कचकचीच वाजवला... तो रिक्षावाला म्हणतो...त्याचा तो प्रश्न मलाही पडलाय.. नक्की कुठेय माझा महाराष्ट्र?

  

Comments