'ही' शान कोणाची?


राग आला की मी बोलणं टाळतो. राग आला की मी मनाला 'वाट्टेल ते' लिहीतो. तेव्हाही मला राग आला होता आणि आताही आलाय. पण तरी मी काहीच बोललो नाही. लिहीणं जास्त सोप्पयं. बोलण्याने लोक दुखावले जातात..  शिवाय काही थोड्या लोकांना हल्ली मन पण असतं... त्यालाही जखम होण्याची शक्यता असते. म्हणून लिहून काढलं की कस्सं आपल्या मनाला ही शांती मिळते आणि समोरच्याला इजा ही होत नाही. असो.

तर... रागाचं कारण महत्वाचं नाही. बिहाइंड द स्टोरी सांगतो..

हे खरंतरं खूप आधी लिहीलं होतं.. दोन महिन्यांपूर्वी. पण काय परिस्थिती.. आजही तस्संच चित्रय. 

मी हे लिहीलं. गुरुला दाखवलं. त्याला खूपच आवडलं. 'ब्लॉगवर टाकू नकोस हे', असं मला त्यानं बजावलं आणि तरी ते लोकांपर्यंत पोहोचलंच. अर्थात कल्पेश राणेच्या नावाने. आता तो कल्पेश राणे मीच होतो हे काहींना कळलंय. त्यामुळे मला हे उघडपणे टाकण्याचा मोह आवरत नाहीये. 

तेव्हा जसा आला होता.. तस्साच किंबहुना त्यापेक्षा जास्त राग यावेळी आलायं.

टायटलचा आणि ब्लॉगचा काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजू नये.


ऑफ द रेकॉर्ड असलेला ब्लॉग पुढे कॉपी पेस्ट...
------------------------------------------------------

डोळे नीट उघडून वाचायचं बरं का...

गेले काही दिवस खूप त्रास होतोय. शारिरिक मानसिक दोन्ही. वेळेवर झोप नाही.. खाणं नाही… हगणंही नाही… त्यात बाबांची तब्बेत नाजूक… रात्री झोपल्यावर आईचा खोकला सुर धरतो… आळीपाळीने तो मला उठवत राहतो.. आपण हतबल.. काहीचं करु शकत नाही..

सकाळ होते.. आपण ऑफिसला निघून येतो.. सकाळी सकाळी वॉचमन काका गुड मॉर्निंग म्हणतात.. बरं वाटतं.. आपण मस्टरवर सही करतो.. आणि डायरेक्ट न्यूजरुम मध्ये…

साडे आठ नऊ तासांनी न्यूजरुममधून बाहेर येतो तेव्हा ते वॉचमन काका तिथंच असतात.. १२ तास शिफ्ट करतात.. आपल्याला केव्हा जमेल असं काम करायला.. आपण विचार करत निघून जातो…

घरी येतो… डोळे बंद केल्यावर पीसीआर दिसू लागतो.. आपण पँनेलिंगला बसलोय आणि कोणीतरी आपल्या गळ्यात फास टाकलाय… जसजशी दुपारची झोप डोळ्यावर तरळते.. तसतसा तो फास बंद डोळ्यांना कायमचं बंद करण्याची शर्थ सुरु करतो.. आपल्याला गेले कित्येक दिवस शांत झोपच लागलेली नाही… शेवटचं कधी शांत डोक्याने झोपलो असू.. आठवत नाही...

सोबत असणारी माणसं नीट बोलत नाहीत.. नीट व्यक्त होता येत नाही… नीट स्वतःला वेळ देता येत नाही… काहीतरी चुकतंय.. सगळं नीट आणि नेमकेपणे चुकतंय.. 

जत्रेत हरवलेल्या तान्ह्या बाळासारखी आपली स्थिती आहे..

डोळ्यांसमोर काही ध्येय नाही… दिवस येतायेत. जातायेत.. घुसमट दिवसेंदिवस वाढत चाललीये.. प्रश्न पडतायेत.. उत्तर सापडत नाहीयेत…

बॅटरी अबाऊट टू डाय... हार्ट ऑलरेडी डाईड...

आपण काय करतोय.. आपलं काय चालल्लंय… फार इश्यु होतायेत.. त्रास होतोय.. चिल… विचार बिचार नाय करायचा..

आपण निर्जिव होऊन जायचं.. निर्जिव होठ फाकवून हसायचं.. एखादा पानचट जोक मारायचा.. कोणाला कळता कामा नये.. आत काय गडबड सुरुये ती… येन्जॉय… आणि अशाच एका बेसावध क्षणी.. चिरररररर करुन गळा कापून टाकायचा… स्वतःचा… संपवून टाकायचं.. सुरेश भट.. विषय कट..

अरे कमी पडतंय…

थांब पँकेज टाकून देतो…

सेट आहे….दोघेही.. चेक्क….

((चला.. औरंगाबाद रेपनंतर.. पुढची लिंक… ))

थ्री टू वन अँन्कर क्यू…

दरम्यान आत्ताच हाती आलेल्या एका सर्वेक्षणानुसार जवळपास सगळ्यांच तरुणांमध्ये निराशेची भावना आहे.. आणि अशा सगळ्यांना प्रभावित केलंय… अहमदाबादच्या हार्दीकनं… हार्दीकवर कोणताही पक्ष कोणतीही प्रतिक्रिया देत नाही.. कुठच्या तोंडानं देणार म्हणा.. असो… आम्हीही आमच्या आयुष्यावर प्रतिक्रिया वगैरे देत नसतो.. आम्ही हुश्शार असतो.. पत्रकार जात्याच हुश्शार असतो.. आम्हाला भंपकगिरी करायला आवडते… कशी… पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून...

((टेक एनओसी...))

व्हीओ ०१ - 

(मोन्टाज सोबत व्हीओला सुरुवात)

((कितने अजीब रिश्ते है यहा पै.. पेज थ्री मधल्या गाण्याने सुरुवात.. व्हीज्युअल्स.. न्यूजरुम इस्टॅबलिश करावा… मोठाला पिसीआर.. एडीट मशीन्स.. एखादं संपादकाचं बंद असलेलं केबीन.. मग असाईनमेन्ट.. इनजेस्ट.. लायब्ररी आणि ज्याचं कोणतही वास्तव्य नसतं अशी श्रुद्र समजली जाणारी आयटी सरवरची रुम ……सगळ्यात शेवटी कुठेतरी धूळखात पडलेला चँनलला मिळालेला अवॉर्ड.. फेड आऊट))

आपल्यातही एक हार्दीक होता.. मारुन टाकलं त्याला आपण.. शाळेत असतानाच.. नाहीतर मुठी वळायला कितीसा वेळ लागतो ओ..


तुम्हांला आठवतंयं का आपण माणसं होतो… म.. मला काना.. मा.. ण बाणातला… आणि स.. समजूतीतला.. पण आता पत्रकार वगैरे आहोत म्हणे.. 

मध्येच आवाज.. अरे अॅस्टन चुकलंय….. माणसाशी… शी दीर्घ… ऱ्हस्व लिहीलेली शि आपण खाल्ली… वरच्या विषयावर पडदा..

((वरती लिहीलेले व्हिज्युअल्स फेड आऊट))

((युनिय घेउन जाणारा एखादा रिपोर्टर.. फोनवरुन असाईनमेन्टवाले.. अरे पीसी प्रेस क्लबला नाही.. आझाद मैदानात आहे.. लवकर फिड पाठव वगैरे तत्सम रागातले.. आणि शेवटी पीटिसी पाठवू नकोस.. लावणार नाहीये तो.. असं सांगितलेलं असतानाही.. वन टू वन करणाऱ्या रिपोर्टरचे व्हीज्युअल्स..))

((बोबडा पीटिसी.. कोणताही दाखवा… त्या चुत्याचा लावा.. कोण तो रेल्वे प्लँटफॉर्मच्या ब्रीजवर करणारा…वायझेड एक्स लिहायचा राहिला सॉरी..))

कट टू व्हीओ ०२ - 

((कोणीतरी रन डाऊन वरुन आवाज देतंय…))

ऐ ठोंब्या.. तो बाईट काप रे.. ते व्हीज्युअल टाक रे.. 

तूला कितीदा सांगितलं एका वेळी एक काम करत जा अस्सं… ((डेस्क इनचार्ज असलेली व्यक्ती प्रोडक्शन वाल्यावर ओरडते…))

एक बाईट टाकायला एवढा वेळ लागतोय व्हयं रं.. 

हां मग.. म्हशीचं दूध काढण्याएवढं सोप्पं असतंय का ते.. - प्रोडक्शन वाल्याचं तोडीसतोड उत्तर

गावटी भाषेतली पोर् ही सगळी.. कुठनं पकडून आलीयेत.. देव जाणे..  - कोपऱ्यात बसलेला एडीटर मनातल्या मनात पुटपुटला..

((हे सगळं फीड एफटीपी मध्ये आहे))

((न्यूजरुमच्या भांडणांचे कँन्डीड शॉट्स… असाईनमेन्ट वाला प्रोडक्शनवाल्याला ओरडतोय.. प्रोडक्शनवाला एडीटरला शिव्या देतोय.. आणि अशात.. संपादक साहेब आत येतात..))

काय मंग.. आज काय नवीन करण्यासारखं..

((सर फार काही नाहीये… कोल्हापूरात दोघांनी आत्महत्या केलीये.. राधे मा ला अटक व्हायची चिन्हंयैत.. पण आपण इंद्राणीच लावू.. ते दाभोळकर पानसरेचे व्हीजव्हल काही ग्रेट नाहीत…))

हम्मम्म… असं करा.. ओपनिंगला हमिदचा फोनो घ्या.. दाभोळकरांच बिग टेस्ट उतरवा.. आणि राधे माचं लाईव्ह घ्या.. पुढे इंद्राणीचं कालंच पँकेज अपडेट अँस्टनसह लावून टाका..

((एमसीआरचा टॉकबँकवरुन फक्त आवाज वापरा.. रन डाऊन ..ते इंद्राणीचं पँकेज ओव्हर जातंय..))

((रन डाऊन.. हमीद ला लगेच धन्यवाद.. पुढे राधे .. लगैच इंद्राणी सोडायचं नाही..गेलंच पाहिज्येल))

((दोघांचाही ऑडियो… सेट आहे…))

((दरम्यानच्या काळात १० व्हिज्युअल बाईट प्रोडक्शनने कापलेत.. त्यापैकी २ रन डाऊनला मिळालेले नाहीत.. म्हणून जाम बोंबाबोंब सुरुये))

.. कामं करता की काय करता.. बरं "हा" काय बोल्लायं…"तो" काय बोल्लाय.. हा बाईट ४० सेकंदाचा का टाकला… एवढ्यात एक बातमी होते सांगून.. ((काश आपण अतिरेकी झालो असतो.. किंवा एखादा नक्षलवादी… गोळ्याच घातल्या असत्या.. बिच्चारे प्रोडक्शनवाले..))

((प्रोडक्शनला शिव्या.. ))

((घड्याळाचा मोठा काटा… आठवर आलेला.. चाळीस झालेत असं इस्टॅबलिश करावं…))

हेडलाईन्स…

न्यू घे रे…चेक्क्..

((आता एक भयाण शांतता.. हेडलाईन्स चुकीच्या गेल्या… का रे असं का केलं.. बघत नाही का तू..न्यू सांगितलेल्या.. चुकीच्या का घेतल्या.. प्रोडक्शनवाला हे सगळं मनातल्या मनातच बोल्ला… भाऊ लढ की लेका...))

मुद्दा..भूमिका.. नैतिकता.. विचार..मूल्य.. तत्व.. सगळं न्यूजरुमच्या बाहेर ठेवून यायचं.. समजलं का… 

इगो तेवढा घेऊन या आत… हेवेदावे आणा.. एकमेकांचे पाय ओढा… असं सगळं करा..

मध्येच एकाची रिंग वाजते… कोणीतरी व्हीओ करत असतो.. 

दिवसभरातली अजून एक चूक.. फोन आपण घाईत कट करतो…

फोन घरुन असतो… म्हणजे फार महत्वाचं असं काही नसणारंय.. असं समजूनच कट केलेला असतो तो..

अचानक पुन्हा रिंग वाजते… आईचा आवाज रडवेला झालेला असतो.. 

अरे ऐक ना… तुझ्या बाबांची तब्बेत.. पुढे ती माऊली रडूच लागते.. आपल्याला काही कळत नाही… डोक्यात मुंग्या...

आपण थोडक्यात लिहीत असतो… विष घेऊन दोन शेतकऱ्यांची आत्मह…. त्या शब्द लिहायचं विसरुन जातो आपण…

दिवसभरातली अजून एक चूक...

((फेड आऊट… सीन अर्थवट राहतो… पुढे काय होतं, हे महत्वाचं नाहीये नै..))

((केस स्टडी..सीन ०१))
कित्येकांचे संसार रस्त्यावर आलेत.. केवढी भीषण गोष्टय ही लेका… तसं लिही की मग.. फेसबुकवर बरं जमतं लिहायलं हं.. इथं मुंग्या येतात का बोटाला लिहायला… आपण खजिल…

आपल्याला आपली बायको आठवते… लग्नााआधी लिहीलेली प्रेमकविता आठवते.. पण सालं अँस्टन लिहायला शब्द नाही आठवतं… 

थू आहे आपल्या जिंदगानीवर… सच अ वेस्ट ऑफ लाईफ

((केस स्टडी..सीन०२))

सालं कायतरी करायला पाहिज्ये.. जबरी.. एक स्टोरी सुचलीये…

थांब पँकेजच लिहून काढतो… वेळपण आहे… 

ए तू काय लिहीतोय रे.. पँकेज.. कोणी सांगितलं लिहायला… 

जा ऊठ वॉल बनवून घे… आणि टेक्श्ट दे… तेरी केह के लूंगा…

((केस स्टडी..सीन ०३))

आज पीसीआर… थ्री टू वन..फायर..

धूधूधीधीधाधाधुमधड्डामधीधी………

होल्ड.. बाईट.. हृदयाचे ठोके वाढलेत.. इतके की बाजुला बसलेल्या माणसालाही ऐकू यावेत..

((बँग्राऊंड ला ते कल होना हो मधलं.. हार्ट बीट चं म्युझिक लावा..)) 

तिथंच त्याला अॅटेक आला.. आणि तो मेला.. त्याच्या पार्थिवावर ..

((टॉकबँकवरुन आवाज.. अँस्टन ओव्हराईट…))

थरथर कापत तिथंच त्यानं जीव सोडला.. कोणीही वाचवायला नाही आलं…

((पत्रकार म्हणून शरिर तेवढं एवेलेबल आहे… बाकी धमन्यांतल्या रक्तात.. मेंदूतल्या विचारांत माणूस कुठंच नाही…सगळीकडून एप्म्टी…))

((एम्टीनेस मधलं गाणं लावा.. संपूर्ण विडियो… तो चिनी मुलगा त्या मुलीला वाचवण्यासाठी मार खातो.. वगैरे असं सगळं…मग त्या मुलीला कळतं.. ती ही त्या भांडणात मध्ये पडते.. ती निगलगट्ट पोरं त्या मुलीलाही मारतात.. दोघेही मरतात.. विषय संपतो..))

खेळ खल्लास…

((पीडिसी.. एकीकडे इंद्राणीच्या हत्येची बातमी. तर दुसरीकडे राधे मॉ.. तिसरीकडे हार्दीक पटेल तर चौथीकडे कोणीतरी कुणाचा तरी बलात्कार केलाय.. कोणीतरी आत्महत्या केली.. कोणाची तरी ट्रेनमधून चैन मारली गेलीये… या सगळ्या बातम्यांच्या दरम्यान चँनेलमध्ये काम करणाऱ्या एका पत्रकाराच्या घरी कोणीतरी वारलंय.. जो बातमी लिहीतोय.. त्याला व्यवस्थेशी काहीही देणंघेणं नाहीये…शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बातम्या करणाऱ्या रिपोर्टर ला बँक लोन देत नाहीये. प्रत्येकजण नोकरी करतोय.. वेळेत घरी गेल्याचं सगळे लक्षात ठेवतातय… वेळ संपलेला असतानाही काम केल्याचं कोणाला दिसत नाहीये… सगळंच वाईट नाहीये.. खूप सुंदर आहे.. सगळं आलबेल आहे…पण मुळात हा विषय गुंता सोडवण्यासाठीये.. वाढवण्यासाठी नव्हे… हे समजून घेणार आहोत का आपण..))

पुढचा अनावश्यक भाग काढून टाका पीटीसी मधला आणि साईन ऑफ देऊ नकोस…चेक्क…

((अनावश्यक भाग…आता आपल्यातला हार्दीक जागा व्हायला लागलाय… तो सज्ज झालाय… वयाने लहान आहे.. अनुभवाची कमतरता आहे.. ज्यांना पटेल त्यांनी घ्या… आपला मुद्दा सगळ्यांना पटवून द्यायला आम्ही थोडीच निखिल वागळे आहोत…))

एक वॉल बनवून घे रे…. टेक्ट दे - सौ सोनार की….. एक लौहार की…

पँकेज स्कीप कर रे… वॉल नाही होणार वेळेत… एनिवे…चला पुढे..

बाकी आपली एसिडीटी.. घरचे इश्यूज.. ऑफिसचे इश्यू… वॉशरुममधल्या टीश्यू मध्ये चुरगळून फेकून द्यायचे… 

बंड पुकाराल..तर मारले जाल..

आवाज कराल तर तुमचं तोंड दाबलं जाईल..

आणि तरीही तुमचा विचार जिवंत राहिला तर तुम्हाला संपवण्यात येईल किंवा तुम्हीच स्वतःला संपवून घ्याल अशी परिस्थिती आम्ही निर्माण करु. माईंड इट..

बोला काय करायचं.. सॉफ्ट पँकेज लाव आणि विषय सोड. होईल सेट. 

Comments

Unknown said…
मित्रा खरंच … मनातली घुसमट नाही समजत … तुझा शब्द नी शब्द अनुभवला आहे . एकूण एक आपण एकाच गाडीतले प्रवाशी ….
harshada.parab said…
BHARI LIHITOS LEKA. EKHADYA FILPMCHA PLOT LIHILAHES. PURN KAR
Unknown said…
नाही कमेंटायचय मला यावर
Unknown said…
नाही कमेंटायचय मला यावर
Kishor Gaikwad said…
न्युज चॅनलवर अजून काम केलेलं नाहीये. अंगावर काटा आला बघ वाचून
Kishor Gaikwad said…
न्युज चॅनलवर अजून काम केलेलं नाहीये. अंगावर काटा आला बघ वाचून
Unknown said…
हे न्यूज चॅनेलमध्येच नाहीतर सगळीकडेच होतंं...आणि यातुन बाहेर पडायचं तर आधी आपले हात-पाय दुसरीकडे घट्ट रोवून घ्या...मग या घुसमटीपासून दूर...सुंदर लिहीलयं ...अनुभवाशिवाय असं एवढं मार्मिक आणि प्रत्येक ऑफिसचा आरसा दाखवून देणारं माणूस लिहूच शकत नाही