एवढंच!

     
            जींन्दगी ना मिलेगी दोबारा नावाचा एक मस्त सिनेमा आहे. त्यात फरहान अख्तर एका लेडीज पर्स वर गॉगल आणि स्कार्फ ठेउन एक आर्टिफिशिअल कँरेक्टर तयार करतो.. तिला तो बँगवती असं नाव देतो. बँगवतीचं ओरीजिन भगवती. पुरुषांमध्ये भगवान असंही नाव असतं. कोकणात प्रत्येक गावात भगवान नावाचा एकतरी माणूस नक्कीच सापडेल. गीता हे मुलींच नाव. ह्या दोन नावांना एकत्र केल्यावर जो शब्द बनतो.. तो एक हिंदूधर्मग्रंथभगवतगीता त्याचं नाव. एवढंच!
           भगवतगीतेबद्दल मला पहिल्या पासूनच खूप कुतूहल होतं. आकर्षण नव्हतं. गीता पे हाथ रख के कसम खाओअसं कोर्टात शपथ घ्यायला सांगतातहे आम्ही लहान असताना सिनेमात पाहिलेलं असतं. पण मग हिंदू धर्माव्यतिरिक्त जर कोणी कोर्टात साक्ष द्यायला गेला तर त्याने पण गीते वरच हात ठेवून शपथ घ्यायची असते, की त्याला त्याच्या धर्मग्रंथावर हाथ ठेवून शपथ घ्यायला लावतात, असा प्रश्न मनात घर करुन जायचा. एवढंच!
    

           आता ह्या प्रश्नाचं काहीच वाटत नाही. आता असे प्रश्नच पडत नाही. कोणत्याही ग्रंथाच्या शपथेची भीती कोणत्याच धर्माच्या माणसाला घालता येत नाही, असं समजल्यावर कशाला असे प्रश्न पडतील. एवढंच!
           भगवतगीतेवर मी उलटसुलट बरंच वाचलेलं. पण गीता वाचली नव्हती. गीता वाचायला घेतली तेव्हा चार-एक दिवसात वाचून काडली. अगदी एका दिवसात ही गीता वाचता येउ शकते. मुळात भगवतगीता म्हटली की, आपल्या समोर ती प्रेझेन्ट होते संस्कृत मध्ये. त्यामुळे प्रचंड मूड ऑफ होतो. कारण संस्कृत ही भाषाच जवळपास कालबाह्य झालेली. त्या भाषेमुळे गीता आपल्यापासून दूर राहिलेली आहे, हे प्रमुख कारण आहे. दुसरं महत्वाचं कारण अस्सं, की भाषांतर असलेली जी गीता आहे, तीचे बरेच वर्जन आहेत. पण त्यातल्या व्हर्जन्स मध्ये भाषांतरापेक्षा स्पष्टीकरणावर जोरदार भर दिलेला आहे, अस्सं वाचताना जाणवतं. त्यामुळे ती वाचताना इंटरेस्ट राहत नाही. ही एवढी कारणं पुरेशी आहेत, भगवतगीतेपासून दूर राहण्याला. एवढंच!
          पैज लावून मी सांगू शकतो की भगवतगीता आताच्या पिढीला अजिबात पटणार नाही, असं नाही. तुम्ही विश्वास नाही ठेवणार पण भगवतगीतेच अँनरॉईड अँप प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. मुख्य म्हणजे ते मराठी मध्ये आहे. साष्टांग नमन माझे..गौरीपुत्रा विनायकासारख्या स्तोत्रासारखी गीता ट्रान्सलेट केलेली आहे त्यात. ही गीता वाचायला संस्कृतपेक्षा सोप्पी आहे आणि मजेशीर आहे. एवढंच!
          आता गीतेमधल्या -याच गोष्टी अशा आहेत, ज्या मला तर्कशुद्ध वाटत नाही. मुळातच त्या नाहीत. माझ्या पिढीला त्या पटणार नाहीतच. त्या पटवून घेण्याचा इथे मुद्दाही नाही. माझा मुद्दा वेगळाच आहे. गीतेमध्ये कृष्ण अर्जुनाशी संवाद साधतोय. ही गोष्ट जर का थोडीशी आजच्या काळाप्रमाणे कोणी रिलेट करुन दिली.. म्हणजे कृष्ण नाही आणि अर्जुन पण नाहीत्यांच्या जागी सुरेश आणि रमेश नावाची पूर्णपणे काल्पनिक पात्र आणली आणि गीतेला एक कल्पनाएक कॉन्सेप्ट म्हणून पाहिलं तर मात्र भगवतगीता ग्रेट वाटली नाही तरी अपील नक्की होईल. ती काही प्रमाणात इमपँक्ट देणारी ठरु शकेल. एवढंच!
           उदाहरणार्थ, सुरेश आणि रमेश यांच्या जाहिराती आपण पाहिलेल्या आहेतच. त्यातली एक जाहिरात अशी आहे, की ज्यात ते टेलर कडे वडिलांची पँन्ट घेउन जातात आणि म्हणतात की, पिताजी की पतलून एक ब्लान छोटी कर दोही एकच गोष्ट सारखी सारखी टेलर ला सांगतातभगवतगीतेमध्ये पण तसंच आहेफिरवून फिरवूनसारख सारखं तेच तेचसांगितलं आहे. एवढंच!
   

            भगवतगीता इनस्टंट नाही. आताची पिढी क्वीक आहे. त्यामुळे ती आताच्या पिढी पर्यंत पोहचू शकत नाहीये. ह्यात गीतेचा काही तोटा नाही. पण आताच्या पिढीचा आहे. आमच्या आजच्या काळाशी गीता रिलेट करुन सांगणारं आमच्यासमोर कोणीही नाही हे सगळ्यात मोठ दुःख. …म्हणजे आम्हाला ह्या गोष्टीची जाणीव ही नाही आहे, ही कल्पनाच हादरवणारी आहे. मी भगवतगीता वाचली म्हणून इतरांनी पण वाचावी अस्सं काही मी सांगत नाही, सांगणार ही नाही. एवढंच!
           महाभारत नावाची सिरीअल सुरु आहे सध्या टीव्हीवर. टीआरपी बराय तिचा. बरेचजण बघतातही. पण ते महाभारत ही डीजीटल वाट्टं. अपूर्ण वाट्ट. म्हणजे हे माझं मत निव्वळ बाळबोधच नाही तर मूर्खपणाचंही आहे, याचीही मला जाणीव आहे. तरीही मला एक प्रश्न पडतोचकृष्णाचं जे रुप आपल्या समोर मांडल जातंते नेहमीचं एका लहान मुलाचं.. किंवा परिपक्व पुरुषांच माडलं जातं. पण मग म्हातारा कृष्ण कसा दिसत असेल, याबद्दल कोणालाच कसा नाही, काही प्रश्न पडत. आश्चर्यच आहे. हे राम सीतेच्या बाबतीतही. म्हणजे त्यांच्या मुर्त्यापण. त्याच्यात पण तसंच दिसतं. इथे सगळ्यांचा कॉमन सेन्स कुठे शेण खायला जातो, हा मला पडलेला अजून एक यक्षप्रश्न. बरं या विषयावर मी काही येड्या आर्टीस्ट लोकांशी बोललोजे चित्र काढतात.. लिहीतात.. कविता करतात किंवा वेगवेगळ्या कला जोपासत आहेततर त्यांच्या एका उत्तरावर माझं तोंड बंद झालंत्यांनी डायरेक्ट हिशोबच केलाते उत्तर असं होतं…    People never want anything to seeit is you … who decides whats you want to show…
  

            गीता वाचलीहे नुसतं वाचणं झालं. समजून घेणं नाही होत. असो. त्यातला वादग्रस्त मुद्यात पडायचं नाही असं ठरवून आणि ह्या आर्टीस्ट ने सांगितल्याप्रमाणे मी जे ठरवलं ते गीतेतलं मांडतोय . गीतेतले काही ठराविक शॉर्टलिस्टेड श्लोक आत्ताच्या मराठीत खाली कॉपी पेस्ट. एवढंच!

           अध्याय २रा श्लोक १५
     हे पुरुषश्रेष्ठ अर्जुना! जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे.

           अध्याय २रा...श्लोक ४१
     जे मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन... जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात.

           अध्याय २रा श्लोक ४८
     हे अर्जुना... यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तुझे कर्म कर. अशा समभावालाच योग असे म्हटले जाते.

           अध्याय २रा श्लोक ७०
     ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो त्याप्रमाणे.. जो मनुष्य, समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणा-या नद्यारुपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही.

           अध्याय २रा...श्लोक ७१
     ज्या मनुष्याने इंद्रियतृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे, जो निःस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे, ज्याने पूर्णपणे स्वामित्वाच्या भावनांचा त्याग केला आहे, त्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही. तोच केवळ वास्तविक शांती प्रात्प करु शकतो.

           अध्याय ४था..श्लोक २१
     ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो. आपल्याकडे असणा-या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो. आणि जीवनावश्यक असणा-या वस्तूंकरिताच कर्म करतो. अशा प्रकारे कर्म केल्याने तो पापकर्मांनी प्रभावित होत नाही.

           अध्याय ४था..श्लोक २२
     जो सहजपणे होणा-या लाभाने संतुष्ट असतो, तो व्दंद्वापासून मुक्त आहे आणि मत्सर करीत नाही, तसेच जो यशापयशामध्येही स्थिर असतो, तो जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी त्यामुळे कधीच बद्ध होत नाही.

           अध्याय ५वा... श्लोक २२
     भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणा-या दुःखाच्या कारणामध्ये बुद्धीमान मनुष्य भाग घेत नाही. है कौंतेया... अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो. म्हणून बुद्धीमान व्यक्ति त्यामध्ये आनंद घेत नाही.

           अध्याय ५वा..श्लोक २३
     वर्तमान शरीराचा त्याग करणयापूर्वी, जर मनुष्य प्राकृत इंद्रियांचा आवेग सहन करु शकला आणि क्रोध यांच्या वेदना आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगात तो सुखी असतो.

           अध्याय ५वा...श्लोक २४
     ज्याचे सुख अंतःकरणात आहे, जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो आणि ज्याचे ध्येय अंतरातच आहे तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे. तो ब्रम्हमध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रम्हाची प्राप्ती करतो.

           अध्याय ७वा...श्लोक २४ (मांडलेल्या श्लोकांपैकी हा एकमेव पटलेला श्लोक)
     मला पूर्णपणे जाणणा-या अल्प बुद्धी लोकांना वाटते की, मी (पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण) पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझी अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत.

           अध्याय ९वा...श्लोक २९
     मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत. परंतु जो कोणी भक्तिभावे माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे. माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे.

           अध्याय १२... श्लोक ,,१०,११,१२
     नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्म-संयमन, इंद्रियविषयांचा त्याग, मिथ्या अहंकाररहित, जन्म, मृत्यू, जर, तर, व्याधी इत्यादींमधील दुःखदोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुलेबाळे इत्यांदीपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित राहणे, माझी (कृष्णाची) निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परम सत्याचा तत्त्वज्ञानात्मक शोध, हे सर्व ज्ञान आहे, असे मी (कृष्ण) घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे.

           अध्याय १२... श्लोक१५
     परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रियरहित आहे. तो सर्व जीवांचा पालनकर्ता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलिकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्रकृतिक गुणांचा स्वामिही आहे.

           अध्याय १५...श्लोक
     ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो, याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुस-या देहात घेऊन जातो. अशारितीने, तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरीता पहिल्या देहाचा त्याग करतो.

           अध्याय १६... श्लोक १ते३
     श्री भगवान म्हणाले निर्भयपणा, सत्त्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म वेदाध्ययन, तमस्य, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून, मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा सर्व जीवांच्या प्रति दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलता, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, शुच्ची आणि द्वेष सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती हे सर्व दैवी गुण. हे, भारता(अर्जुना)! दैवी स्वभावाच्या मनुष्यांमध्ये आढळतात.

     मोठमोठी वाक्य.. जडजड शब्द.. संदर्भांचे बाउन्सर.. वाक्यरचनेच्या गुगली.. आणि हँमरिंग यॉर्कर सारखे अंगवार येणारे अर्थभगवतगीता कॉप्लेक्स करुन टाकतात. सगळीच गोची होते त्यामुळे. माझ्यासारख्या सर्वसामान्य बुद्धीच्या माणसांनी दुस-यांदा भगवतगीत वाचली तर मलाच माझं आश्चर्य वाटेल. एवढंच!
     वरती प्रत्येक ठिकाणी भगवतगीता हा शब्द चुकीचा आहे. भगवतगीता नसतेच. भगवद् गीता असते. ज्यांच्या लक्षात ही चुक हे सगळं वाचताना आलेली नसेल ते तर गीते पासून प्रचंडच दूर. एवढंच!


Comments