Remaining राडा

झाला ना राडा...क्रमशः ०२
भ्यांचोद, मनावर कोण घेतो असली बकवास. साली काकू फालतू इंटरेस्ट घेते आपल्यामध्ये. असल्या खूबसूरत बायकांचं मी एक पाह्यलंय. रात्री आपल्या फोंगस नव-याला अंगावर घेउनही बखबखलेलं राह्यचं आणि दिवसा फालतू गोष्टीमध्ये इंटरेस्ट घ्यायचा. पोर होत नाही ना यांना. परत पोर होत नाही म्हणून दुस-याजवळ झोपण्य़ाची यांची हिंमत नसते. खूबसूरत काकूने तो काळ्या मण्यांचा थानापर्यंत सर घातला आहे ना, तसल्या फालतू गोष्टीमध्ये त्यांना आपली भलतीच शान वाटत असते. त्या गोष्टीची आम्हीही इज्जत करावी असं त्यांचं म्हणणं आहे.
....
तुम्ही त्या नान्याच्या बहिणीकडे लक्ष देउ नका हो. मरु दे त्या रांडेला. सारी दुनिया ओळखते तिला.
...
टँक्सीतले चार डोळे – दोन गॉगलमधले नि दोन काजळ घातलेले. घरासमोर जमलेल्या पब्लिककडे टरकून पाहात होते.
...
अरे कशी जाशील? – रांडे, ऐकून घे. मी आज तुझ्या घरासमोर बिस्तरा ठेवलाय. कभी न कभी ती येशील की नाही बाहेर. उस घडीतक इंतजार करूंगा. आजसे आपना घेराव शुरू.
...
म्हणतात ना. नीती या कलियुगात पैशावरून ठरत असते.
...
नेसलेली व्हाईट ती पुन्हा अंगावरून उतरवू लागली. छातीवरून पदर काढताच अलमारीच्या आरशात तिला दिसला मंदार. एकदम पदर तिने परत खांद्यावर टाकला. मूडच गेला त्या वैतागामुळे.
...
एक नारी – दो रूप.
कुछ समजत नाही.
काल किस देते! आज भररस्त्यात इनस्लट करते!
कामगार सेनेचे ऑफिस हे पूर्वीचे कम्युनिस्ट युनियनचे ऑफिस. कामगार सेनेच्या ताब्यात हे ऑफिस जाण्यापूर्वी ह्या ऑफिसमध्ये बसणारे कम्युनिस्ट लीडर्स एक नंबरचे बेव़डे होते. ते ऑफिसचा उपयोग कामगारांच्या तक्रारी सोडवण्यापेक्षा वडे-सागुतीच्या आणि दारूच्या पारट्या झोडण्यासाठी करत. भररस्त्यात ते झिंगून आडवे पडत आणि त्यांच्या बायकांना घर-संसार चालवण्यासाठी रस्त्यावर पडावे लागत असे. एक दिवस शिवसेना आली. तिने कमिट्यांच्या निवडणूका जिंकून कम्युनिस्ट युनियनमधून सगळे बेवडे धुऊन काढले.


...
शाखेत येणारे लोक विचारत होते – ज्या माणसाला आपली फँमिली कंट्रोलमध्ये ठेवता येत नाही त्याने सोशल वर्कमध्ये पडावंच कशाला?
मंदार कोण आहे?एक मवाली पोरगा नाही. एका मराठी तरुणाला लागलेली कीड आहे. सडलेला पोरगा आहे तो. रोगजंतू जसे जिकडेतिकडे रोग पसरवतात त्याचप्रमाणे हा सडलेला पोरगा जिकडेतिकडे कीड पसरवतो, यात आपले विघ्नसंतोषी पक्ष णि शाखेचे शत्रू खूप आहेत. अरे चांडाळांनो, कुठे फेडाल ही पापं?तुम्हाला जिकडेतिकडे रोगजंतू पसरवून आपली तरुण पिढी खाक करुन टाकायची आहे. शिवरायाची शपथ तुम्हांला. अरे तुम्ही त्या स्पूर्तिदेवतेचे नाव घेत नसला, तरी तुम्ही जिवंत आहात ते त्याच्यामुळे. शिवराय नसते तर सुन्नत होती सबकी म्हणून म्हटलंय.
...
आपल्या संस्कृतीने त्याला हेच शिक्षण दिलंय का?असे भडव्या मराठी आईबापाची औलाद नाहीस तर काय पवनपुलाच्या कामठणीने तुला बाहेर काढलंय.
...
रघू माळ्याला माझ्या बापेने कामावरुन काढलं. एवढा वफादार माणूस. पण माझ्या बापाला धंद्यातल्या हिशेबापुढे पर्वा नव्हती. या रघू माळ्याने मी नदीत बुडत असताना प्राण वाचवले होते. तो म्हणे सरप्लस लेबर होता. त्याला कामावरून काढणं आणि मला घरातून बाहेर काढणं सारखंच.
...
आज साली शराब चढत नाही. मोहिते, बापाने माझ्याविषयी काय गुन्हा केला माहित आहे. माझ्या आयुष्यातली नशाच काढून घेतली भडव्यानं.
...
असा रांगडा, बेफाट आणि धमाल माणूस मित्र म्हणून मिळाल्याच्या  खुशीत खूप गोष्टी सांगायचा फंटा. म्हण त्याने एकदा एका रांडेशी वायदा केला होता. मी तुला नोटांवर झोपवीन. वायदा पुरा करण्यासाठी तो खूप तरसला. एकदा एका सिंध्याकडे तो नोकरीला लागला. सिंध्याच्या तिजोरीत खूप ब्लँकमनी होता. त्याच्या अँक्ट्रेस पोरीचा. फंटा एक दिवस सकाळी नाश्ता घेऊन सिंध्याच्या बेडरुममध्ये शिरला. सिंधी तिजोरीशी काहीतरी करत होता. तिजोरी उघडी. एवध्या नोटांची चवड पाहून फंटाचे डोळे फाटले नि त्याला रांडेची याद आली. त्याचे नाश्त्याची सुरी ठेवली सिंध्याच्या मानेवर आणि करवत चालवावी त्याप्रमाणे सिंध्याची मान धडावेगळी केली. पैसे घेऊन सरळ रांडेकडे.
...
एकूण आपली जिरणार आहे. चांगलीच. अब देको क्या क्या होता है!
ही माणसं धड चांगली नाहीत – धड सडलेली नाहीत.
...
जस्ट कीप क्वाएट!
गप्प राहणे हे चतुर धोरण आहे – असे सा-या विद्वज्जनांचे म्हणणे आहे.
...
हे पहा साहेब, तुम्हाला इथे रहायचंय नि आम्हाला इथे रहायचंय. आमची अशी गरीब, निरपराझ मुलं रक्त सांडत असताना तुम्ही आम्हाला रूल्स सांगू नका.
...
एक सफेद झूट! प्रत्येक वांध्यात आलेली पोरगी दुस-याच्या गळी अडकविण्याची आयडिया करत असत्ये. परंतु, ते कधी दुस-याच्या गळी उतरत नाही. सफेद झूट बोलता-बोलताच आपला खोटारडेपणा जाहीर करत असतो.
...
ते तिचं प्रकरण मिटलेलं दिसतंय. तेव्हाच ती आपल्याकडे आली आहे.
...
कठीण आहे ना. म्हणून तुमच्यासारखे लोक बासरी शिकत नाहीत. पण चमचेगिरी करायला शिकतात. कारण माणसापेक्षा तुम्हा लोकांना बासरी वाजवणं कठीण वाटतं. बासरी ही एक निर्जीव वस्तू असताना. हेच हँम्लेटनं आपल्या डायलॉगमध्ये सांगितलं आहे.
...
यू डोन्ट बिलॉन्ग टू अस. – मग कशाला विचारतोस.
शी हँज स्लँप्ड मी बँक. आता बोलू नये हेच बरे.
...
च्यायला! काकू आपल्याला त्या रांडेची इज्जत सांभाळायला सांगत्येय. डँम, त्या रांडेमध्ये कुणाला इंटरेस्ट आहे? तिची गंमत करून काहीतरी किक निर्माण होईल एवढंच आपण पहात होतो. कसलाही जिवंतपणा नसलेल्या लोकांमध्ये राहाताना बोअर व्हायला होतं.
...
आपण तर एका नाटकातले व्हिलन आहोत. व्हिलन आहोत म्हणून तर टेन्शन आहे. व्हिलन आहोत म्हणून तर नाटक आहे. व्हिलन आहे म्हणून तर मजा आहे.
...
तुमचं हेच चुकतं. आपलं काम साधायचं तर एखाद्याला मोठेपणा द्यायला काय हरकत आहे?
आय अँम मि. मंदार. सन ऑफ माय ब्लडी डँडी. डँडी इज अँट माडी. व्हॉट कँन आय डू फॉर यू. काय म्हणालात.
८० टक्के मराठी माणसांना नोक-या द्या. आता देतो. दामुअण्णा, प्रिपेअर धी लिस्ट ऑफ बिगर मराठी वर्कर्स हूम वुई आर गोईंग टू स्क्रू.
...
बायकांना या गोष्टी सांगून तरी काय उपयोग?
अरे डरने का कोई बात नहीं. अपने खिसे मे क्या! – मालूम. चक्कू. कोई  जादा बात करेगा तो – करँss!
नानासाहेब, कोकाकोला घ्या. थंड व्हा.
...
शीवss व सेना – झिंदा –
ए स्लोगन नाही एss – स्लोगन नाय. मी सांगितल्याशिवाय स्लोगन नाय – फंटाचा दम.
...
संपलं... पुस्तक बुकगंगा वर उपलब्ध आहे. शब्द प्रकाशन. प्रस्तावना भालचंद्र नेमाडे आणि स्वयंखुद्द लेखन प्रभाकर उर्फ भाउ पाध्ये.



Comments

Unknown said…
व्वा.!