राडाचं राडा...

राडा हा शब्द तसा दोन्ही सेनेवाल्यांचा पेटन्टंचं. पण मला हा शब्द भाउ पाध्ये यांच्या मालकीचा वाट्टो. राडा ही त्यांची कादंबरी वाचल्यापासना भाऊ आपल्याला आपल्या खास दोस्तासारखा वाटू लागतो. नाकेकरी फंटर असतात न् गल्लीबोळात...अगदी तसा. डीट्टो.
राडाची नवीन आवृत्ती आली तेव्हा मटा मध्ये एक लेख आलेला छापून तो ही आठवला. पण त्याचा उल्लेख करण्याची आणि तसे लेख लक्षात ठेवण्याची मला गरज वाटत नाही.
सध्या ऑफिस चर्चगेटला आहे. ट्रेन मधे बराच वेळ मिळतो. खूप नाही.. पण ब-यापैकी वाचन होतं. यात पहिली कादंबरी वाचली ती राडा. आणि त्यानंतर वाचली पुन्हा राडाच. व्वा. मज्जाच. मग असं वाटलं की या कादंबरी वर काहीतरी लिहावं. तिची वाहवा करावी. भाऊ बद्दल लिहावं. पण म्हटलं नकोत्या भानगडी कशाला करा. आधीच एवढ्या शहाण्या शहाण्या लोकांनी एवढं सगळं लिहून ठेवलंय ते सालं कोण वाचत नाही. आपलं कशाला कोण वाचणार. नकोच.
पण यावर उपाय शोधला. पुन्हा राडा वाचायला घेतली. हो. अगदी तिस-यांदा. पण यावेळी राडा मधे असलेले काही परिच्छेद, डायलॉग्स् आणि मला आवडलेलं असं सगळं नोट डाउन करत गेलो. आठवडा भर चांगलं खाद्य मिळालं ट्रेन मध्ये प्रवास करताना. मज्जा आली. नोट डाउन केलेला काही कंन्टेन्ट डीटीपी करुन टाकावासा वाटला म्हणून ह्या उचापती लिहाव्या लागल्या. राडावरचा एक लेखही मिळाला एका जेष्ठ पत्रकाराच्या ब्लॉग वर. लेखाचं टायटल पण भारीच... पुन्हा पुन्हा राडा.... ब्येश्टचं... त्या लेखाची लिंक सगळ्यात शेवटी दिलेली आहे.

राडा वाचताना –
1.
भेजा आउट झाला होता.
जिंदगीमे अपना कोई नही.
ये बात भी ठीक है. किसीको मिलना नही. बातचीत नही. कुछ नही. किसीका वास्ता नही. किसीका लेन-देन नही.
2.
अरे क्या सुनाउ? आपल्या लाईफचाच एक घोळ झालाय. गजू ये पिक्चरवाले सब बंडल है. ये मेरे सामने आने चाहिये. हिंमत असेल तर त्यांनी माझ्या स्टोरीवर पिक्चर काढावं. काल तो भाई-भाई पाहिला. सुनील दत्त हिरो आहे. बकवास पिक्चर आहे सालं. काय दाखवलं माहीत आहे? एक कॉलेजकुमार नुसती किताब वाचून डाकू बनतो. असे, कुणाला तरी पटेल काय?अरे किताब वाचून माणूस डाकू बनायला लागला तर गव्हर्मेंट सर्व्हीसवाला भडवा क्लार्कसुद्धा पीचर चेनेची किताब वाचून डाकू बनला असता. बकवास आहे – सब बकवास है.
3. फेss! इसमे क्या? इंदिरा गांधीपण फेल झाल्या असतील. मग तुमचं काय? ड्रिंक घ्या. डोक्यातील विचार नाहीसे होतील. माणसाने विचार करु नये. नेहमी आपल्या धुंदकीत दिवस काढावेत. तुम्ही नेहमी बर्ताव करता तसा करा. आपल्याला तुम्ही तब्येतीत असला म्हणजे वाटतं – कसं? मस्तं!
4.
गरीब. भ्यांचोद गरीब. शेठ, समजू नका माणूस गरीब दिसला म्हणून. मोठी अडेल्या पोटाची असतात ही माणसं – तुम्हाला माहीत नाही. मी असा जन्मापासून आहे ना सॉलिड म्हणून हा सगळा गोरेगाव मला टरकून आहे.
5.
शिवसेनेची गोरेगाव शाखा म्हणजे एक टोलनाक्याचं असतं तसलं एक लाकडी खोपटं. तेच्यावर वाघाचं मुंडकं असलेला अंगापेक्षा बोंगा मोठा बोर्ड – शिवसेना गोरेगाव शाखा. आणि भगवा झेंडा. बाहेर काळा फळा. त्यावर गोरेगावकर जनतेला शिवसेनेची सूचना. द्वारकानाथ सामंत मार्गावरुन जाणा-या येणा-यांना गुंडांकडून उपद्रव होत असल्याचे शाखेला समजले आहे. ज्या कुणाला उपद्रव होईल त्याने शिवसेनेच्या कचेरीत ताबडतोब कळवणे अत्यंत आवश्यक आहे. शिवसेना गोरेगावकर जनतेला सहकार्याचे आवाहन करीत आहे. सही – नानासाहेब खारकर.
6.
घाबरू नका, आम्ही तुमच्यावर हात टाकणार नाही. आम्ही शिवसेनेचे सैनिक आहोत. ठाकरेसाहेबांचा कायदा आहे की शिवसेनेच्या सैनिकाने एकदा शब्द दिला की तो प्राण जाण्याची वेळ आली तरी पाळल्याशिवाय रहाणार नाही.
7.
आम्ही पोलिस नसलो म्हणून काय झालं? उद्या कुणाचं घर फोडलं, एखाद्या मवाल्याने एखाद्या बाईची इज्जत घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या वेळी तिकडे पोलिस नसला तर आपण स्वस्थ बसून चालेल काय? आपण तिथे प्रथम गेलं पाहिजे.
      आणि माल लांबविण्यात पयल्यांदा भाग घेतला पायजे. नायतर त्या बाईवर प्रथम हात टाकला पाहिजे. तुम्ही काळजी घेणार! - हूं!
8.
क्षमा? त्या रांडेची? इम्पॉसिबल.
9.
हंss तुम्हाला माहित आहे, आपल्यामध्ये काही लोक महाराष्ट्राला कलंकासारखे आहेत. आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. मराठी माणसाचं ज्या वेळी प्रचंड वादळ होईल, त्या वेळी या दगडविटा आपल्या महापुरात वाहून जातील कोठच्या कुठे.
10.
जरा जपून हं साहेब. काय आहे, शिवसेनेचा हा ईनोशनल अपील आहे. पुढेमागे तो ओसरला की मग शिवसेनेची संयुक्त महाराष्ट्र समिती व्हायला वेळ लागणार नाही.
11.
सालं, असं विनाकारण कोणी डिस्टर्ब करु लागलं म्हणजे आपल्याला फालतू नर्व्हसनेस येतो. Woman, will you scram. साली आपल्यावरच नजर रोखून आहे.
12.
मी आता जाऊ देतो. पण नेक्स्ट टाईमला सोडनाही तुला चुंबा घेतल्याशिवाय. आणि आपल्या शादीच्यामध्ये तुझा तो नान्या पडला तर – आताच सांगून ठेवतो, राडा झाल्याशिवाय रहाणार नाही! ह्यः ह्यः ह्यः
बरं जाउ?
जा. पण जर नान्याला मध्ये आणलं तर याद राख. या मंदारशी गाठ आहे. रांडे, राडा केल्याशिवाय राहणार नाही मी. ह्यः ह्यः ह्यः !
13.
तो आपला शिवसेना-शिवसेना करत राहणार. आईपेक्षा त्याला शिवसेनाच जवळची झाली आहे. इथे घरात आईचे काय हाल होतात, हे पाह्यलंय का त्याने? – मागे तो टायफॉईडने आजारी होता, त्या वेळी त्याचं हगरमुतर काढायला आली होती का शिवसेना? काय मिळतं याला शिवसेनेत जाऊन? नसते उपद्व्याप लावून घ्यायचे पाठीमागे? कुणाची मुलगी कुणाचा हात धरून गेली? नायतर त्या मृणाल गोरेच्या घरावर मोर्चा काढायचा. दुसरा काही धंदा नाही. अरे, तू एवढा हुशार आहेस , तुला बुद्धी आहे. तू या बेकार कामात डोकं घालवण्यापेक्षा काहीतरी उद्योग कर, पार्टटाईम नोकरी कर. तुझ्यासारख्या शिकलेल्या माणसाला कुठेही नाईट स्कूलमध्ये जॉब मिळेल. तेवढेच पैसे येतील घरात.
14.
नानासाहेबांची काठी म्यान झाली. च्यायला. दरवाजा उघडाच होता की! एकूण आपल्या नालायक बहिणीला मनसोक्त चोपायचं स्वातंत्रदेखील आपल्याला नाही. भोसडयात गेलं सोशल वर्क. आग लगो शिवसेनेला.
-    एका निष्ठावंत शिवसैनिकाचे उद्गार. अर्थात स्वतःशी. वैतागला बिचारा.
क्रमशः
15.
लेखाची लिंक –

Comments

Amruta Khare said…
Please let me know where will I be able to buy this book. Liked no. 13. Would like to read the whole book.
Siddhesh Sawant said…
You can get it online from Bookganga.com - http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5241278753031024561

Or.. You can buy it directly from Ideal Book depot or Magestic Book depot, Dadar west.
Unknown said…
छान..