हा पिक्चर पाहायला याल ना...विनंती आहे



मुंबई फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने चिक्कार सिनेमे आणि लघुपट, माहितपट पाहिले. ते दळवी सरांनी दाखविले. त्यांचे सहृदय आभार. पण ज्या दिवशी ते नव्हते आले तेव्हा एक आनंद पटवर्धन यांची डॉक्युमेन्ट्री पाहिली. तिचं नावं.....
जय भिम कॉम्रेड...!
१९९७ मध्ये रमाभाई आंबेडकर चाळीत गोळीबार झाला. ह्या गोष्टीला आज च्या तारखेला १५ वर्ष झाली. या गोळीबाराचे परिणाम असूनही घडताना दिसत आहेत. १० दलितांचे या गोळीबारात नाहक बळी गेले. झालेल्या प्रकारानंतर वातावरण बराच काळ तंग होतं. तेव्हाचा मिडीया मध्ये आताइतका इलेक्ट्रोननिक स्पीड आणि अद्ययावत नव्हता.
हा सगळा प्रकार पंधरा वर्षांनी आता कसा झालाय, हे नुकतच मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मधील या डॉक्युमेन्ट्री मध्ये पाहायला मिळाला.
काही दिवसांपूर्वी फेसबूक वर एका मूलासोबत हिंदूत्व आणि हिंदूत्वाचा अभिमान यावर मी आणि माझ्या मित्राने वाद घातला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भांडणारे कट्टर मराठे आणि मराठी असून कोणतीच ठोस भूमिका न घेणारे सामान्य लोक, अशी लढाई सुरु होती. ती लढाई कित्येक वर्ष चालू आहे आणि तशीच ती अखंडपणे चालू राहिल. इतिहास त्याला साक्षी आहे. ही फिल्म त्याला साक्षी आहे.
सांगायचा मुद्द हा की, जय भिम कॉम्रेड नावाची एक डॉक्युमेन्ट्री फिल्म पाहिली. तीन तास वीस मिनीटांची ही सगळ्यात मोठी डॉक्युमेन्ट्री आहे. आनंद पटवर्धन नावाचा एका मोठ्या फिल्ममेकरने १२-१३ वर्ष काम करुन ही फिल्म बनवलीये. फिल्म पाहिल्यावर कळालं की या माणसाचं कौतुक करावं तेवढं कमीये.
माणूस आता एक बोलतो तर नंतर एक आणि करतो त्या ही पेक्षा वेगळंच काहीतरी. तसंच काहीसं सत्यस्वरुप दर्शन या फिल्ममध्ये घडतं.
डॉक्युमेन्ट्री मेकिंमधलं आनंद जींच काम खूपच मोठ्ठयं. या फिल्मचे होल आणि सोल ते एकटे आहेत. संकल्पना, दिग्दर्शन, संकलन आणि संहिता ही त्यांचीच आहे. गेले वीस-तीस वर्ष ते या क्षेत्रामध्ये आहेत. त्यांनी आत्तापर्यंत बनविलेल्या सगळ्याच डॉक्युमेन्ट्री संवेदनशील विषयावर आधारित आहेत. त्यांची जय भीम कॉम्ब्रेड ही देखील अशाच एका विषयावरील डॉक्युमेन्ट्री. ही फिल्म पाहून मी इतका भारावून गेलो होतो की जो कोणी ओळखीचा भेटेल त्याला ही फिल्म पाहाच असं सांगत सुटलेलो.
त्या वेळी घडलेल्या या गोळीबारा नंतर दलितांनी सरकार आणि समाजाच्या विरुद्ध उभा केलेला लढा, यातूनच उभारीला आलेले पोवाडे, दलित साहित्य, कविता, कलाकार, दलित पॅंथर आणि इतर राजकीय पक्षांची असलेली चकमक, सामान्य दलित जीवन, बीडीडी चाळी, महापरिनिर्वाण दिनाबद्दल असलेल्या दादरकरांच्या भावना – सगळं च्या सगळं पाहताना आपण फिल्म चं कंपोझिंग – म्युझिक – एडिटींग या सगळीकडे दुर्लक्ष होतं.... इतकी प्रभावी फिल्म आनंद पटवर्धन यांनी बनविलीये.
आनंद जींनी यावर बरंच काम केलंय....या तीन तास वीस मिनिटांमागे त्यानी त्यांचं अर्ध आयुष्य वेचलंय. आणि ते साथर्की लागण्याचे आता कोणतेच आशावाद नाहीयेत. मात्र सध्याच्या फिल्ममेकींगमध्ये असलेला फोलपणा, फुकटचा मीठमसाला आणि त्या ही पेक्षा ते सगळं बघून समाधानी राहणारे आपण यांची चीड येउ लागली. कुठेतरी आपण चांगल्या गोष्टी बघतच नाही आहोत आणि हल्ली चांगल काही मिळत नाही असं बोलून आपल्यालाच शिवी घालतोय. 
किंवा मग अंधार इतका जास्त झालाय आपल्या आपल्याला प्रकाशात येण्यासाठी एक सुर्य कमी पडतोय.
सोशल नेटवर्कींच्या साहाय्याने सर्व तरुण फिल्ममेकर्स, बीएमएम मध्ये शिकत असलेले माझे सगळे मित्र यांना एक विनम्र विनंती करतो...आपण सर्वांनी जम भीम कॉम्ब्रेड ही फिल्म बघावी. दलितांचा विषय आहे म्हणून आपण ही फिल्म पाहायला यावं अशी मुळीच अपेक्षा नाही...केवळ उत्तम मांडणी, तंत्रकौशल्य आणि विषयाची संवेदनशीलता एखादा विषय मांडताना कशी जपवली पाहिजे हे या फिल्म मधून पाहायला मिळेल. फिल्म ३तास२० मिनिटांची जरी असली तरी संपताना आत्ता कुठे फक्त आणि फक्त २० मिनिटंच झालीयेत, अशी माझी प्रतिक्रिया होती. फिल्मचा वेग संतुलित ठेवण्याचं आव्हानं पटवर्धन यांनी लिलया पेललंय.
१० फेब्रु.-12, डोंबिवलीला भाजीमार्केट मध्ये ही फिल्म फुकट दाखवली जाणार आहे. ज्यांना शिकायची खरंच इच्छा आहे, त्यांना फिल्म बघायला जा असं सांगण्याची वेगळी गरज नाही. मात्र ज्यांना या दिवशी जमत नाहीये त्यांनी ११ फेब्रु.-12, बदलापूर मधील वैशाली चित्रपटगृहात याचं पुनःचित्रण करण्यात येणार आहे. आणि १२ तारखेला कलिना कॅम्पस विद्यानगरी मध्ये चित्रण करण्यात येणार आहे. या तिन्ही वेळेला तुम्हाला आनंद पटवर्धन यांच्याशी संवाद साधता येउ शकेल. 

आयुष्याचे कितीतरी तास आपण झोपण्यात घालवतो. त्याच आयुष्यातले त्याही पेक्षा कितीतरी जास्त तास हे आपण फालतु बॉलिवूड चित्रपट पाहण्यात घालवतो. ह्याच आयुष्यातले तीस तास तुम्ही जर या फिल्म साठी राखून ठेवलात तर कदाचित तुम्ही तुमच्या उरलेल्या तासांच मँनेजमेन्ट योग्य प्रकारे करु शकाल. ही फिल्म तुम्ही पाहायला यावं ही आग्रहाची विनंती... याल ना...??

Comments

"आपण चांगल्या गोष्टी बघतच नाही आहोत आणि हल्ली चांगल काही मिळत नाही असं बोलून आपल्यालाच शिवी घालतोय."

बरयापैकी जमलंय :-)

१. पोस्ट मी आता वाचली :/ आणि
२. १० तारीख नंतर मुंबईत नव्हतोच. . जमल्यास गेलो असतो