मोदी आडनावाची धास्ती

त्या दिवशी सकाळी फार बातम्या नव्हता. बातम्या नसल्या की पेपर चाळावेच लागतात. टाईम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावरच नीरव मोदीची बातमी एका कॉलमात छापलेली होती. दुसरं कोणतंच मराठी चॅनेल नीरव मोदीची बातमी चालवत नव्हतं. टाईम्सनं नीरव मोदीच्या लुकआऊटची बातमी छापलेली. त्या बातमीचा आणि पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळ्याचा काहीही संबंध आणि उल्लेख त्यात नव्हता. त्याचवेळी डोक्या विचार आला की बायकोला हे सांगायला नको. आधीच ती घाबरी. नीरव मोदीच्या ऑफिसमध्ये दोन महिन्यांपूर्वी जॉईन झालेली. त्यात तिला नोकरी जाण्याची लगेचच भीती वाटली.

तिनं खूप आधी, साधारण सहा महिन्यांपूर्वी इटरव्हू दिला. बोलवणं काही आलं नाही. नोव्हेंबरमध्येच कॉल आला. स्वारी नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसात जॉईन झाली.. आणि फेब्रुवारीत मोदीनं हजारो कोटी रुपयांचा चुना लावल्याच्या बातम्या आल्या..आणि अर्थाच बायकोची नोकरी गेलीच. अशा अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. 

बायदवे नीरव मोदीच्या कंपनीत काम करणारे देशोधडीला लागतील, अशी शक्यता जरा कमीच आहे.  कमी शिकलेली, हातात कला असलेली माणसंच नीरवनं भरती केलीएत. त्यामुळे नोकरी गेली म्हणून त्यांच्यापैकी कुणी उपाशी मरेल असं वाटत नाही.

ज्या दिवशी नीरवच्या ऑफिसात रेड पडली, त्या दिवशी बायको कामावरच होती. फोन करुन फक्त कुणी आलंय का याची खात्री करुन घेतली. खात्री पटल्यावर उद्यापासून डबा मिळणार, याचा आनंद तर होताच. पण बायकोची नोकरी गेली याचं दुःखही होतच.

तिला घरी आल्यावर नीरव मोदी कोणंय, त्यानं काय कांड केलाय, हे समजवता समजवता मला एक हिंन्दी लेख सापडला. तो जशाचा तशा भाषांतरीत करण्याचा प्रयत्न केलाय. 

नीरव मोदीकडून हा कांड सोडला तर बिझनेस शिकून घ्यायला हरकत नाहीये.. नीरव मोदीचा प्रवास ब्लॉग स्वरुपात साम टीव्हीसाठी दिला होता. सामसाठी लिहीलेला हा पहिला ब्लॉग जशाच्या तशा पुढे कॉपी पेस्ट.. बघा पसंत पडतोय का..
.....
 ब्लॉगचं टायटल होतं...

साडेतीन
 हजार रुपये पगार घेणाऱ्या नीरव मोदीची गोष्ट
-------------------------------------------------------------------------



14 ऑक्टोबर २०१६, थंडीचे दिवस होते. राजस्थानमधील सगळ्यात विलक्षण सुंदर समजल्या जाणाऱ्या जोधपूर शहरासाठीचा खास दिवस होता
जोधपूरमधील महाराजांच्या महलाचं रुपांतर एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आलं होतं. हे हॉटेल जास्मिनच्या फुलांनी बहरलं होतं
जगातला सगळ्यात महागडा गालिचा महलमध्ये आणण्यात आला होता. पंचतारांकित हॉटेलचा संपूर्ण कर्मचारी वर्ग डायमंड किंग नीरव मोदीची
पाचवी एनिवर्सरी साजरी करण्याच्या तयारीत गुंतला होता
ही पहिलच वेळ होती, ज्या वेळेत नीरव मोदींचं नाव मोठ्या अदबीनं आणि अभिमानानं घेतलं जात होतं

४५ वर्षांच्या नीरव मोदींच्या या पार्टीत जोधपूरचे महाराजा गज सिंह त्यांचं स्वागत करण्यासाठी हजर होते. ही घटनादेखील जोधपूरवासियांना चकीत करणारी होती.
कारण महाराजा गज सिंह हे फार चूजी समजले जातात. ते फारसे कुणासोबत उठबस करत नसत. असं असताना ते देखील नीरव मोदीच्या मेजवानीसाठी हजर होते

तिथल्या स्थानिक महिलांनी पारंपारिक पोशाख परिधान केला होता, ज्यावर नीरव मोदी ब्रॅन्डच्या दागिन्यांचा साज चढवण्यात आला होता. या ग्रॅन्ड पार्टीमध्ये देशातील करोडपती आणि बॉलीवूडचे जानेमाने चेहरे दिसले होते.

नीरव मोदीची सुरुवात कशी झाली?

नीरव मोदीहिऱ्यांसाठी हे नाव जगभर ओळखलं जातं. बातम्यांमध्ये गाजणारा हा माणूस आज फरार असल्याचं म्हणतात. पण या माणसाचा प्रवास ४० वर्षांपूर्वी सुरु झाला होता. ही सुरुवात झाली होती भारतातूनच.
भारतातलं गुजरात हे राज्य कारागिरांसाठी ओळखलं जातं. याच गुजरात राज्यात सूरत नावाचं एक शहर आहे. नीरव मोदी तिथलेच
सूरतमध्ये केशवलाल मोदी नावाचे एक कारागिर होते. भारत स्वतंत्र्य होण्यापूर्वी म्हणजेच साधारण १९३०-४०च्या आसपास केशवलाल मोदींनी हीऱ्यांचा व्यवसाय सुरु केला. १९४० मध्ये केशवलाल मोदी सिंगापूरमध्ये गेले आणि त्यांनी तिथेच हीऱ्यांचा व्यवसाय करायला सुरुवात केली. केशवलाल मोदींचा मुलगा होता दीपक केशवलाल मोदी. दीपक मोदी आपल्या वडिलांसोबत हीऱ्यांचा व्यवसाय करत असत. १९६०मध्ये दीपक मोदी हीऱ्यांचा व्यवसाय एक्सटेन्ड करण्यासाठी बेल्जियममध्ये गेले. बेल्जियममध्येच एंटवर्प नावाचं शहर आहे. हे शहर संपूर्ण जगात हीऱ्यांसाठी ओळखलं जातं
दीपक मोदी एंटवर्प मधून हीरे आणायचे आणि भारतात विकायचे. नीरव मोदी हे दीपक केशवलाल मोदींचे सुपूत्र. म्हणजे केशवलाल मोदी झाले नीरव यांचे आजोबा. नीरव १८ वर्षांचा झाल्यावर त्याला वडीलांनी अमेरिकेत पाठवलं. पेन्सिलवेनिया युनिवर्सिटीत नीरव मोदी शिकायला आले. तिथे जपानी आणि फायनेन्सचं नीरव शिक्षण घेत होता. सगळं आलबेल होतं. पण १९९० च्या दशकात मोदींच्या व्यवसायाला उतरती कळा लागली. अशात पोराला अमेरिकेत शिक्षण देणं परवडणारं नव्हतं. नीरव यांच्यावर शिक्षण अर्धवट सोडायची नामुष्की ओढवली.

साडेतीन हजार रुपयांची नोकरी ते अरबपती

१९९० मध्ये म्हणजे वयाच्या १९व्या वर्षी नीरव मोदी भारतात परतला. इकडे मुंबईत खानदानी हीऱ्याचा धंदा नीरव यांनी त्यांच्या चुलत्यासोबत सुरु केला
पण नीरव यांच्यासाठी हा धंदा नवीन होता. मुंबईत साडेतीन हजार रुपये पगारावर नोकरी केली. एक वेबसाईटच्या माहितीनुसार नीरव आठवड्याचे दिवस प्रतिदिन १२ तास काम करायचा. ज्यात त्याला महिन्याला ३५०० रुपये मिळायचे. दहा वर्षांनंतर नीरव यांच्याकडे ५० लाख रुपये होते. याबाबत नीरव यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं..

- मी घरातल्यांकडून कधीच दमडीही घेतली नाही. जे पैसे कमवायचो, ते साठवून ठेवायचो. आता माझ्याकडे ५० लाख रुपये होते. त्यातून मी एक कंपनी उघडू शकत होतो.

ते वर्ष होतं १९९९. याच वर्षी नीरव मोदीनं फायर स्टार नावानं डायमंडची कंपनी सुरु केली. यात त्यानं स्वतःकडचे ५० लाख रुपये लावले
१५ लोकांसोबत ही कंपनी नीरव मोदीनं सुरु केलीजगातल्या ९० टक्के हीऱ्यांची कटींग भारतातच होते. ही बाब नीरव मोदींना चांगलीच माहित होती
नीरव मोदीची फायर स्टार कंपनी हीरे पॉलिश करायची. पॉलिश केलेले हीरे नीरव मोदी अमेरिका आणि इंग्लंडमध्ये विकू लागला. पॉलिश केलेले हीरे विकून फार नफा होणार नाही, हे नीरव मोदीच्या लगेचच ध्यानात आलं.

जशी वेळ तशी स्ट्रॅटर्जी 

पॉलिश केलेल्या हिऱ्यांचे दागिने बनवायला नीरवने सुरुवात केली. दागिन्यांच्या गरजेप्रमाणं हिऱ्यांची कटींग केली जायची. ज्यात जवळपास १५ ते २० टक्के हिऱ्यांचं नुकसान व्हायचं. या प्रक्रियेला लागायचा एक महिना
यावर नीरवनं शक्कल लढवली. पॉलिश केलेल्या हीऱ्याऐवजी दागिन्यांच्या गरजेप्रमाणं हीरे पुरवले जातील, असं त्यानं ग्राहकांना सांगितलं. याचा फायदा ग्राहकांनाही होईल, पैसेही वाचतली आणि वेळेचीही बचत होईल, असं त्याचं मार्केटींग केलं. ही शक्कल ग्राहकांवर चालून गेली. आणि नीरवच्या बिझनेसनं अशाप्रकारे टॉप गिअर टाकला. यानंतर नीवर मोदी काँन्ट्रँक्टवर अमेरिकेतील ग्राहकांसाठी दागिने बनवून देऊ लागला.

स्वतःच्या कंपनीपेक्षाही मोठ्या कंपन्यांची खरेदी

तेव्हा मार्केटमध्ये फारशी चलती नव्हती. सेन्सेक्स घसरतच होता. भारतासोबतच चीनलाही बायपास करुन कंपन्या थेट अमेरिकेतच व्यवसाय करु लागल्या होत्या. यानंतर नीरव मोदीनं एक मोठा धाडसी निर्णय घेतला. त्या दिवसांत फ्रॅडड्रिक गोल्डमॅन नावाची एक कंपनी होती. ही कंपनी नीरव मोदी कंपनीच्या तुलनेत पट मोठी होती. नीरव महाशयांनी ही कंपनी विकत घेण्यची ऑफर दिली. जवळपास दीडवर्ष लागलं. पण महाशयांनी अखेर ही कंपनी खरेदी केलीच. किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल. तब्बल अब्ज ६० कोटी रुपये नीरव मोदीनं या कंपनीसाठी मोजले. त्यानंतर अजून एक कंपनी नीरव मोदीनं विकत घेतली. २००७मध्ये नीरव मोदीने अमेरिकेतील १२० वर्ष जुनी  सैंडबर्ग एंड सिकोर्सकी ही कंपनी अब्ज २० कोटी रुपयांमध्ये विकत घेतली
याबाबत खुद्द नीरव मोदींनी बिझनेल जगताला असं म्हटलं की -

- फायरस्टार बनवण्याआधी माझ्या एका काकांच्या कंपनीच काम करण्याची मला संधी मिळाली होती. एखादा व्यवयास सुरु करण्यापूर्वी लागणारी ही सगळ्यात महत्वाची शिकवणी होती. रिश्ची ऐंडसोथबीच्या ऑक्शनने मला एक संधी दिली. मला असं वाटलं की या क्षेत्रात खूप संधी आहे, म्हणून मी माझा व्यवसायिक पसारा वाढवायचं ठरवलं.

व्यवसाय मुंबईत होता. त्यामुळं फिल्मस्टारपासून नीरव मोदीही लांब राहू शकले नाही. नीरव मोदींना खरंतर संगीत क्षेत्रात करियर करायचं होतं.
आता हीरे बनवायचे की सारेगम धपमप करायचं, हा प्रश्न त्यांना सतावत होता. अशात २००८मध्ये एका खास मैत्रिणीनं नीरवला एक विनंती केली.
या खास मैत्रिणीला कानातले बनवून हवे होते. नीरव मोदींनी विनंतीचा मान राखला. कानातले बवण्यासाठी नीरव मोदींना वेगळ्या प्रकारचा हीरा हवा होता
हा हीरा शोधण्यासाठी नीरव माऊलींनी रुसची राजधानी असलेल्या मॉस्कोपर्य़ंत हेलपाटा घातला. तेव्हा कुठे त्यांना मनासारखा हिरा सापडला.
त्यानंतर नीरव मोदींनी कानातलं बनवलं. या कानातल्यांच्या चारही बाजूंना हीऱ्यानं वेढलेलं होतं. टेलीग्राफच्या माहितीनुसार नीरव मोदी म्हणाले

- मला कानातले बनवायचे नव्हते. मैत्रिणासाठी कानातले बनवणं म्हणजे एक वाईट स्वप्नच होतं. तब्बल महिन्यांनंतर मी कानातले बनवले आणि तिला दिले. तिला ते खूपच आवडले. तेव्हा माझा निर्णय झाला. हेच ते काम आहे, जे मला आयुष्यभर केलं पाहिजे.

पडलेल्या मार्केटमधून बिझनेस वर आणला

२००८ हे ते वर्ष होतं, जेव्हा संपूर्ण दुनिया आर्थिक मंदीच्या विळख्यात भरडली जात होती. या मंदीनं हीऱ्यांच्या व्यवसायालाही दणका दिला. जगातला हीऱ्यांचा व्यवसाय धोक्यात आला
गुलाबी, निळा आणि पांढऱ्या रंगाच्या दुर्मिळ हिऱ्यांना कवडीमोल भाव मिळत होता. नीरव मोदींनी याचा फायदा उचलला. अतिशय स्वस्त किंमतीत नीरव मोदींनी हे हिर विकत घेतले. पण हे हिर विकण्याऐवजी नीरव मोदीनं त्यांचे दागिने बनवून टाकले

२०१० हे वर्ष नीरव मोदीसाठी एकदम खास होतं. गोलकुंडाच्या खाणीतून निघालेल्या १२ कॅरेट हिऱ्यांमधून नीरव मोदीनं लोटस नेकलेस बनवलं
नोव्हेंबर २०१०मध्ये हे नेकलेस ऑक्शनसाठी ठेवण्यात आलं. त्यातून या नेकलेलला २३ कोटी रुपयांची बोली लागली. यानंतर लगेचच नीरव मोदींनी आपलं स्वतःच्या नावाचा ज्वेलरी ब्रॅन्ड लॉन्च केला. मुंबईतून झालेला नीरव मोदीचा बिझनेस विदेशात जाऊन पोहोचला. दिल्ली, मुंबई, न्यूऑर्क, हॉन्गकॉन्ग, लंडन आणि मकाऊमध्ये नीरव मोदीचे स्टोअर्स ग्राहकांना आकर्षित करु लागले. भारतातील नीरव मोदीचं स्टोआर अर्गायल या गुलाबी हीऱ्याचं डीस्ट्रीब्युशन करणारं एकमेव स्टोअर आहे

२०१७मध्ये फोर्ब्सच्या यादीत नीरव मोदी

२०१४मध्ये नीरव मोदींनी पहिलं स्टोअर दिल्लीत उघडलं. त्यानंतर २०१५मध्ये मुंबईत काळाघोडा जवळ अजून एक स्टोअर उघडलं. याच वर्षी न्यूयॉर्क आणि हॉन्गकॉन्गमध्येही स्टोअर्स उघडण्यात आले. २०१६मध्ये अजून दोन स्टोअर्स हॉन्गकॉन्गमध्ये उघडण्यात आले. हल्लीच लंडनमध्येही एक ब्रॅन्च सुरु करण्यात आली आहे. २०१७ साली जेव्हा फोर्ब्सनं नीरव मोदी हे नाव छापलं, तेव्हा त्यांची संपत्ती १४९ अब्ज इतकी होती. त्यामुळेच त्याच्या नावाची दखल घेण्यात आली

नीरव मोदी हा केवढा पोहोचलेला माणूस आहे, याची कल्पनाही करता येणार नाही. २०१५मध्ये न्यू यॉर्कमध्ये जेव्हा नीरवच्या स्टोअरचं ओपनिंग होतं, तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून अनेक दिग्गज हजर होते. त्यात डोनाल्ड ट्रम्पसोबतच हॉलिवूड अभिनेत्री नाओमी वॉट्स, सुपर मॉडल कोको रोचा यांच्यासोबत भारतातील लीसा हेडन आणि निमरत कौरदेखील हजर होते.

नीरव मोदींचं अंबानी कनेक्शन 

मुकेश अंबानी यांचे वडील धीरु भाई अंबानी. धीरु भाईंची मुलगी आणि मुकेश अंबानींची बहीण आहे दीप्ती साळगावकर. दीप्ती याचं लग्न भारतातील प्रसिद्द व्यावसायिक दत्ताराज साळगावकर यांच्याशी झालं. त्या दोघांची मुलगी आहे इशिता साळगावकर. याच इशिता साळगावकरचं लग्न नीरव मोदीचे धाकटे बंधू नीशल मोदी यांच्याशी झालंय. डिसेंबर २०१६ रोजी हे लग्न गोव्यात झालं. त्यांच्या साखरपुड्याला दिग्गज सिनेस्टार हजर होते. शाहरुख खान, आमिर खान, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि करण जौहर हे देखील साखरपुड्याला आले असल्याचं सांगितलं जातं.

नीरव मोदींचं पंतप्रधान मोदी कनेक्शन

२३ जानेवारी, २०१८ ला स्विझर्लंडच्या दावोअमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचं ४८वं अधिवेशन होतं. पंतप्रधान मोदी या अधिवेशनात निवेदन करणार होते. त्यांच्यासोबत भारतातून एक प्रतिनिधीमंडळही दावोसमध्ये गेलं होतं. या मंडळात नीरव मोदींचाही समावेश करण्यात आला होता

मुंबईच्या समुद्र महलमध्ये राहतात नीरव मोदी


हाजी अली दर्गा तुम्हाला माहित असेल. तिथून एक इमारत दिसते. इमारतीचं नाव आहे समुद्र महल. या इमारतीच्या टॉप फ्लोअरवर नीरव मोदी राहतात. मुंबईत नीरव मोदीच यांचं ऑफिस आहे. या ऑफिसात महागडी पेन्टींग्सही आहेत. त्यात राजा रवि वर्मा, जैमिनी रॉय, रबींद्रनाथ टैगोर, अमृता शेरगिल आणि जितिश कला यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या कलाकृती आहेत. शिवाय नीरव मोदींनी २००८ साली एक सामाजिक संस्थाही उघडलीये. तिचं नाव आहे नीरव मोदी फाऊंडेशन. ही संस्था झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना, शाळेत शिकणाऱ्या मुलांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी काम करते, असं सांगितलं जातं.

Comments