ऐतिहासिक क्षणांचे साक्षी व्हा..!

        आपल्या मुंबईमध्ये मंडळं तशी बरीच. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील, गोविंदा पथकांची मंडळ असतील, साईबाबांची मंडळं असतील किंवा अगदी फक्त नावाला असणारी ही मंडळी मुंबईत काही कमी नाहीत. पण आपल्या दादर मध्ये एक मंडळ आहे. त्याचं नाव अमर हिन्द मंडळ. 68 वर्षांची दर्जेदार परंपरा असणारं मध्य मुंबईतल्या जुन्या मंडळांपैकी एक असलेलं हे मंडळ. म्हणजे भारत स्वतंत्र आणि ह्या मंडळाची स्थापना व्हायचं साल एकच.
         अमर हिन्द मंडळची युएसपी म्हणजे त्यांची वसंत व्याख्यान माला. देशभरातले वक्ते या व्याख्यानमाले मध्ये येउन व्याख्यान देण्यासाठी उस्तुक असतात. याचं मुख्य कारण म्हणजे अमर हिन्हच्या व्याख्यानमालेला येणारा श्रोता वर्ग. या मंडळाने क्रीडा क्षेत्रामध्येही सक्रियता दाखवली आहे. मंडळाकडून कब्बडी आणि खो-खो या खेळांचे विशेष वर्ग ही घेतले जातात. कला क्षेत्रामध्येही अमर हिन्द वाले मागे नाहीत. मंडळातर्फे रंगभूमीवर येण्यासाठी उत्सुक असलेल्यांसाठी विशेष नाट्यशिबिरं आयोजित केली जातात. बंध निर्बंधांचे, मना वासना, परमनिधानम सारख्या नाटकांद्वारे राज्यनाट्यस्पर्धांमध्येही अमर हिन्दने बाजी मारलेली आहे. गेली वीस वर्ष अमर हिन्द मंडळाचा कलाविभाग उल्लेखनीय कामगिरी करत आलाय. अमर हिन्द मंडळाच्या न्यायमूर्ती सारख्या एकांकीकांची आठवण अजूनही काढली जाते. या मंडळाच्या उपक्रमांबद्दल सांगावं तितकं कमी. अभ्यासात्मक शिबिरे, क्रिडा शिबीरं, एप्रिल मध्ये भरविण्यात येणारी बालनाट्य शिबिरं... आणि असं बरेच कौतुकास्पद उपक्रम अमर हिन्द मंडळ राबवित आलं आहे. आणि या उपक्रमांमध्ये आता भर पडतेय ती अजून एक उपक्रमाची.
          अमर हिन्द मंडळाकडून आम्ही दर्पण मध्ये केलेल्या शॉर्ट फिल्मचं स्क्रिनिंग आयोजित करण्यात येतंय. हो... हो खरंय......स्क्रिनिंग उद्या संध्याकाळी 6.30 वाजता दादरमध्ये मंडळाच्या प्रिमायसेस मध्येच होणार आहे. आमच्या चिल्लर पोरांच्या लघुपट माहितीपटांचं स्क्रिनिंग अमर हिन्द मंडळातर्फे होणं, हा आमच्यासाठी सुखद धक्काच आहे.
          अमर हिन्द ला एक इतिहास आहे. दिनकर पाटील, एस्.एम. कुवेकर म्हणजे तेव्हाचे किंग जॉर्ज महाविद्यालयाचे मुख्याध्यापत, प्रकाश भाई मोहाडीकर, आबा फडके, मयेकर सर या अशा मातब्बर मंडळींचा अमर हिंद च्या स्थापनेत महत्वाचा वाटा आहे. उमेश शेनॉय यांनाही विसरुन चालणार नाही. ते ही एक महत्वाचं नाव आहे. स्वातंत्र मिळण्याच्या काळात प्रबोधन करण्याच्या हेतून अमर हिंद चा जन्म झाला. विचारमंथनाच्या बेसिक रुट्स या मंडळाने वृद्धिंगत केल्या. त्याबद्दल त्यांच कौतुक कराव तितकं थोडंय. आणि आता तर आमच्या लघुपट माहितीपटांना सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं एक ऐतिहासिक कार्य त्यांच्याकडनं घडतंय. ज्याचा एक छोटासा भाग आम्हीही आहोत, ही बाब निश्चित सुखावणारी आहे.
          शॉर्ट फिल्म बघणारा प्रेक्षक वेगळाच असतो. हे माध्यम काही फार लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही किंवा शॉर्ट फिल्म बघायच्या तर बघायच्या कुठे असे बरेच प्रश्न असतात. आणि शॉर्ट फिल्म करणा-यांकडेही पुरेसं आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांनाही त्या मर्यादित ठेवाव्या लागतात. युट्युब सारखी माध्यमं शॉर्टफिल्म वाल्यांना सिक्युअर वाटतही वाटत नाही. अशा वेळी अमर हिन्द मंडळाने घेतलेला पुढाकार हा एक वेगळी सकाळ घेउन उदयाया येईल. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षी होताना आनंद तर होतोच आहे पण त्यावेळी जास्तीत जास्त संख्येने आपण सगळेही असलाचं असा विश्वास वाटतो. कारण शॉर्ट फिल्म्स करणा-यांची आपल्या आजूबाजूला बरीच गर्दी आहे. पण अमर हिन्द सारख्या दर्दींनी प्रेक्षकांपर्यंच शॉर्ट फिल्म माध्यम पोहोचवण्याचा वसा घेतल्याबद्दल, त्याचं अभिनंदन हे करायलाच हवं.
           कसंय की मी ही समजू शकतो की उद्या शनिवार आहे. आधीच उद्याचं सगळं प्लानिंग झालेलं असणारं आहे. पण तरी मी सांगायचं काम करतोय कारण नंतर तुम्ही म्हणता की यु ट्युबची लिंक दे किंवा अँटलिस्ट एक डीव्हीडी तरी दे, असं वारंवार सांगण्या-यांना उद्या अमर हिन्द मध्ये स्क्रिनिंग साठी या, असं वेगळं सांगायची गरजच नाही ना. आणि अजून एक आनंदात भर घालणारी गोष्ट म्हणजे... दादर परिसरामध्ये या शॉर्टफिल्म च्या पोस्टर चे ठिकठिकाणी बँनर लावण्यात आले आहे. ही पण एक नवीनच गोष्ट आहे. कधी स्वप्नातही वाटलं नव्हती की आपण केलेल्या शॉर्टफिल्मचा बँनर बनेल आणि दादर सारख्या एरियात तो लागेल. अमर हिन्द चे खूप खूप थँक्स.

          उद्या संध्याकाळी 6.30 ला आहे स्क्रिनिंग. मुख्य म्हणजे फुकट आहे. त्यामुळे फक्त प्रवासाचा खर्च करायचाय आणि चांगल्या गोष्टी बघण्यासाठी थोडा वेळ राखून ठेवायचाय. वेळ तसा कोणाकडेच नसतो म्हणा. वेळ काढावा लागतो. त्यामुळे आता वेळ काढायचा की नाही ते तुमचं तुम्ही ठरवायचं.
          जमलं तर उद्या याच. त्यानिमित्ताने उद्या भेट ही होईल आणि आम्ही दर्पण या नावाने केलेल्या शॉर्टफिल्मही पाहू शकाल. येणार असाल तर 9820760344 या नंबर वर एक एसएमएस करायला विसरु नका. तुमची वाट पाहतोय. अमर हिन्द चे आम्ही सर्वच आयुष्यभर ऋणी राहू.



Comments