भोग संभोग…


        काल बाईकवरुन जात होतो. मित्र आणि मी. थोडं पुढे गेल्यावर एक सिग्नल लागला. आम्ही पुढेच थांबलेलो. आमच्या बाजूला एक बाईकवाला येउन थांबला. कपल होतं. त्यात जी मुलगी मागे बसलेली ती त्या रायडर ला गच्च बिलगून बसलेली. एकदम चिपक्के. त्यांच्या मधून वारा जाण्याइतपतही जागा नव्हती. सगळेजण त्यांच्याकडे पाहात होते. कोण कोणत्या नजरेन पाहत होतं हे सांगणं तस्सं अवघडच. पण ते कपल सगळ्यांच लक्ष वेधून घेत होतं. काही काळ, ही आपली संस्कृती का वगैरे प्रश्न माझ्या मनात घर करुन गेले. तितक्यातच सिग्नल हिरवा झाला. आणि ते कपल वा-याचे वेगाने पुढे निघून गेले. कसं जमतं ह्यांना… ह्यावर मी आणि माझा मित्र चर्चा रंगवू लागलो. 
मला तर त्या मुलीचं अस चिपकून बसणं अजिबात आवडलेलं नव्हतं. चारचौघात बरं दिसतं का असं बसणं. असा माझा मुद्दा. 
मित्र म्हणत होता… जर का त्या मुलीला तो मुलगा सर्वस्व वाटत असेल तर तिने दुनियेची का फिकीर करावी. दुनिया बोलत आलीये..बोलत राहणार. त्या मुलीसाठी तिचा प्रियकरच तिची दुनिया असेल. तर त्या मुलीचं काहीच चुकलेलं नाही. माझा मित्र त्या मुलीची थोरवी गाउ लागला. अखेर मी नमतं घेतलं. मित्रांच बरोबरच असेल. 
ही अशी चिपकाचिपकी करणारी कपल्स बाईकवरुन जातायेता नेहमीच दिसत असतात. त्यात नवीन ते काय. मित्र मित्र सोबत असतील तर - कडक होती रे… ह्या साध्या कॉमेन्ट्स रोजच्याच आहेत. ब्युटी अँप्रिसिएशन सारख्या संज्ञा त्यांच्यासाठीच बनवलेल्या आहेत की काय अशी शंका यावी इतकं ते अँप्रिसिएशन असतं. असो. 
तर मग याच्यावर थोडा विचार करायला हवा का… यावर काही बोलावं का… किंवा… हा विषय काय… कपल… मग त्यांची चिपकाचिपकी… लव्हर्स स्पॉट… किंवा इत्यादीं बद्दल आपण कधी उघडंनागडं बोलणार आहोत का… की नाहीचं बोलायचं.. फक्त बघायचं… तेवढ्यापुरती ब्युटी अँप्रिशिएट करायची आणि बाईकचा पुढचा गिअर टाकायचा.. यातलं नक्की कायतरी एक  ठरवायला हवं.
१४ फेब्रुवारी… वँलेन्टाईन डे… शिवसैनिकांनी यावर विरोध दर्शविलेला. धम्माल बातमी आहे ही. पण यातला सेन्स काही कळत नाही. आपण वरवरचं राजकारण तेवढ बघतो आणि संस्कृतीच्या नावावर ब-याचशा गोष्टी खपवून नेतो. शिवसैनिकांनी तमाशाचा फड उभा केलेला चालतो.. पण १४ तारखेला प्रियकराने प्रियसीला गुलाबाचं फुल दिलेलं चालत नाही. हे अवघ्या महाराष्ट्रापुरतं विशेष हाः. असो. 
बीपी नावाचा सिनेमा आला. टपराट सिनेमा आहे, अस्सं माझ प्रामाणिक मत. विषय गहन होता पण जी मजा एकांकितेत होती ती सिनेमात नाही. आम्ही एकदा मित्र गप्पा मारत बसलेलो आणि तेव्हा विषय सुरु होता… सेक्स… अबाउट सेक्स… विषय सुरु असताना मी एक प्रश्न केला… तुमच्यापैकी प्रत्येकाने बीपी पाहिली आहे की नाही… जवळपास सगळे हो म्हणाले… तर मग पुढचा पोट प्रश्न असा होता की पहिली बीपी बघण्यामागची प्रोसेस सांगा… आणि नंतर मग धम्मालच ना… अर्थात हा प्रश्न ब्लॉग वाचणा-यांना ही… खरंच मला नका सांगू.. स्वतःकडे स्वतःपुरतं रिव्हाईज केलात तरी ईनफ आहे. अगदी मुंबई संध्या पासनाची तुमची सुरुवात ही असू शकते. असल्यास ते सगळ्यात जास्त अपडेटेड व्हूअर्स -रिडर्स म्हणायला हवेत. वाचाल तर वाचाल. काय रे देवा. कहरच.
…आणि मग जेव्हा स्क्रिन वर आधी दोन गुलाब एकमेकांमध्ये गुंतली गेली की ऑडीयन्स समजून जायचं तिथे आता ओठात ओठ गेले तरी भाव पोहचवण्यात असमर्थ ठरणारा आता व्हिज्युअल मिडीया काय कुठवर चाल्लाय..यावर विचारमंथनाची आवश्यकता नक्कीच आहे की नाही. स्केस एज्युकेशन वगैरे सारख्या गोष्टी तेवढ्या पुरत्या लाईमलाईटमध्ये असतात. म्हणून मग… बाईक वर एकमेकांना चिपकून बसलेलं ते कपल डोळ्यांसमोर ठेवून काही मांडण्याचा प्रयत्न केलाय… एवढंच.

खाली संपादित केलेलं… साभार… ओशो - संभोगापासून समाधीकडे 
रामापेक्षा कामाला जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण कामाला जाणून घेतल्याशिवाय रामाप्रत पोहोचता येणं अशक्य आहे. कुणीही आपलं अज्ञान कबूल करायला तयार नसतं आणि हेच तर आपलं मोठं दुर्दैव आहे. जीवनातल्या अमुक एका गोष्टीबद्दल, समस्येबद्दल मला काही ठाउक नाही, असं सांगण्याचं धाडस कुणीही दाखवू शकत नाही, पण हा दुबळेपणा मोठा घातकी आहे. आपण असा समज करुन घेतो की, जीवनाबाबत आपल्याला सारं काही ठाउक आहे आणि त्यामुळेंच आपलं सारं जीवन वाया जातं, मातीमोल ठरतं आणि म्हणूनच याबाबतची आपली सारी उत्तंरही मूर्खपणाची असतात. ज्या गोष्टीबद्दल आपल्याला काही ठाऊक नाही त्याबद्दल उत्तर देण्याचा प्रयत्न करणं म्हणजे मूर्खपणाच होय.
जराशी मोकळीक मिळाली, जबाबदारीतून मुक्त होण्याची संधी मिळाली की, माणूस माणुसकीतून आपली सुटका करुन घेतो आणि त्याच्यात दडलेला पशू प्रकट होतो. आपल्यातला पशू नेहमीच तयार असतो. फक्त तो संधीचीच वाट पाहत असतो.
अहंकार नेहमीच घेण्याची भाषा जाणत असतो आणि प्रेमाला तर देण्याशिवाय काही ठाऊक नसतं. प्रेमाबद्दल काय बोलावं हेच मला समजत नव्हतं, सुचत नव्हतं. कारण ते फक्त अनुभवता येणं शक्य आहे. त्याला शब्दबद्ध करणं मोठं कठीण काम आहे. प्रेम म्हणजे काय याची प्रतीती जर तुम्हांला माझ्या डोळ्यांत, माझ्या बाहूत, माझ्या मौनात येउ शकली नाही, तर मग तुम्हाला माझ्या शब्दाद्वारेही प्रेमाचा प्रत्यय येणं सर्वथा अशक्य आहे.
रानावनात फुलं उमलतात आणि चोहोबाजूला त्याचंा सुगंध दरवळत असतो. मग कुणी वास घेणारा असो वा नसो, ती आपला सुगंध पसरवतच असतात. कारण सुगंध पसरवणं हा त्यांचा स्वभावच आहे. म्हणून आपल्यासाठी फुलं सुगंध परवतात असा गैरसमज चुकूनही करुन घेउ नका. …प्रेमपूर्ण असणं हा आपला स्वभावच बनला पाहिजे. आपलं संपूर्ण व्यक्तिमत्त्वच प्रेमपूर्ण व्हायला हवं. 
प्रेमपूर्ण असण्याचा संबंध एखाद्या विशिष्ट व्यक्तिवर प्रेम करण्याशी नाही, पण प्रेम करणा-या लोकांना असंच वाटत असतं की, माझ्या प्रेम करणा-यानं इतर कोणावरही प्रेम करू नये, पण अशा लोकांना हे मात्र ठाऊक नसतं की, जो सर्वांवर प्रेम करू शकत नाही, तो कधीही कुणावर प्रेम करु शकत नाही. पत्नीला वाटत असतं, की पतीनं फक्त माझ्यावरच प्रेम करावं, इकडं-तिकडं ढुंकूनही पाहू नये, पण तिला हे ठाऊक नसतं की, अशा प्रकारचं प्रेम फसवं असतं आणि खरं म्हणजे ती स्वतःच याला कारणीभूत असते.
जो प्रत्येक क्षणी प्रत्येकावर प्रेम करु शकत नाही, तो आपल्या पत्नीवर तरी प्रेम कसं करेल. प्रेम म्हणजे संबंध नसून स्वभाव आहे. ते माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचं अतंर आहे. म्हणून प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीवर प्रेम करण्याची शिकवण दिली गेली पाहिजे. जेव्हा आपण एखाद्यावर थोडंसही प्रेम करतो, तेव्हा एक वेगळंच समाधान आपल्याला लाभतं. जीवनात निरपेक्ष प्रेमाचे क्षण ख-या आनंदाचे क्षण असतात. ज्या प्रेमात कुठलीही अट नसते, ते प्रेमच खरं असतं. सापेक्ष प्रेम हे प्रेम नसतंच.
जिथून परतणं शक्य नसतं, इतक्या दूर कधीही कुणी गेलेला नसतो. 
दोन व्यक्तींच मीलन अगदी मर्यादित असतं, हेच सा-या दाम्पत्यांचं, सा-या प्रेमाचं दुर्दैव आहे. कारण ज्याच्याशी आपण एकरुप होऊ इच्छितो त्याच्याशीदेखील आपण कायमचे एकरूप होउ शकत नाही. त्याच्याशी अगदी क्षणापुरतेच आपण एकरुप होतो आणि पुन्हा तेच पूर्वीचं अंतर निर्माण होतं आणि मग ते अंतरच सतावत राहतं. दोन प्रेमी जीव या अंतरामुळंच दुःखी असतात आणि ते अतंर का निर्माण होत असावं, या विचारानं त्रस्त होत असतात आणि मग प्रियकराला असं वाटू लागतं की माझ्या प्रियसीमुळंच हे घडत आहे आणि प्रेयसीला वाटतं की, तोच या गोष्टीला जबाबदार आहे आणि म्हणूनच मग त्या दोघांनाही एकमोकांचा राग येउ लागतो.
मग त्या दोघांमध्ये संघर्षाला सुरुवात होते. त्यांच्यात एक ताण, एक अशांती, एक द्वेष निर्माण होतो. त्यांना असं वाटू लागतं की, मला भेटावंस वाटतंय, पण कदाचित दुसराच भेटायला तयार नाही. म्हणून मग त्यांचं मीलन होऊ शकत नाही, पण यात त्या दोघांचाही दोष नसतो. कारण दोन व्यक्तींच मीलन अंनत कालापर्यंत होऊच शकत नाही. त्याचं मीलन तर केवळ क्षणांपुरतंच मर्यादित असतं. कारण प्रत्येक व्यक्ती सीमित असते, म्हणून त्यांचं मीलनही सीमितच असतं.
आपल्या जीवनात ज्या गोष्टींची उणीव असते तिचीच चर्चा आपण करीत असतो. जे आपलं जीवन आहे त्याची चर्चा आपण कधीही करीत नाही. आपण कामवासनेची चर्चा करीत नाही. कारण ते आपलं जीवन आहे, पण परमात्म्याची चर्चा मात्र आपण करत असतो. कारण ते आपलं जीवन नाही. जीनवात जी गोष्ट आपण मिळवू शकत नाही, तिच्याबद्दल बोलून आपण समाधान मानतो.
मी एक माणूस आहे आणि तेवढंच पुरेसं आहे आणि फक्त माणूसच असणं पुरेसं नाही का.. दुस-यावर मात केल्याशिवाय, सत्ता गाजवल्याशिवाय एखादा माणूस कुठल्या ना कुठल्या रुपात माणूसच राहून आनंदी होउ शकत नाही… मी जसा आङे त्यातच आनंदी आहे. मला तर महान मानवता हवी आहे. मला महान मानव हवा आणि ख-या अर्थानं माणूस असणं हीच पूर्ण अर्थानं, मानवतेच्या दृष्टीनं एख महानता नाही का… आणि प्रत्येक माणूस महान होऊ शकतो. कारण प्रत्येक माणूस, माणूस होउ शकतो. महात्म्यांचे दिवस आता संपायला हवेत, त्यांची आता गरज नाही. महान मानवाची आता गरज आहे. आजवर मोठी माणसं बरीच होउन गेली, त्याच्यामुळं काही फायदा झाला आहे का.. तेव्हा आता तशा मोठ्या मोणसांची गरज नसून मोठ्या मानवतेची गरज आहे.
………. संभोगापासून समाधीकडे या पुस्तकातून संपादीत ……….. 

Comments

tannerpaas said…
TINNING GOLDEN SEGA SEGA - Titanium Barts
TINNING GOLDEN SEGA - titanium knee replacement TINNING race tech titanium GOLDEN SEGA. TINNING GOLDEN SEGA, SEGA. titanium sunglasses All Games. ti89 titanium calculators SKU: titanium water bottle 099496937. Category: Games. Additional Information; Reviews.