सगळा झवझवाट

        जगणं खूप सोप्प नाहीये. कठीण आहे. एकदम Solid. कारण जिथे तिथे झवझवाट आहे. हा शब्द माझ्या एका वाया गेलेल्या मित्राने मला शिकवला आहे. तो खूप घाणेरडा आहे. पत्रकारिता करतो. शरिर संबंध वगैरे सारख्या ब्राम्हणी शब्दांपेक्षा झवझवाट हा क्षूद्र शब्द सर्वसामान्य आणि मिडलक्लास तरुणांचा आवडताच, असा मी आणि माझ्या पत्रकार मित्राने शोध लावलाय. Exellent.

        खूप कठीण काय असतं, तर जगणं. जगण्यापेक्षा वाईट काय… तर प्रेमबिम करणं. एकदम गलिच्छ. बरं केलं तरं लग्न वगैरे कधीच करु नये. लग्न वगैरे केलंच तर मुलंबिलं जन्माला घालू नये. बरं घातलीच तर त्यांना शाळेत वगैरे तर पाठवूच नये. हे म्हणजे क्रूरच. चूकून पाठवल्यास करिअर वगैरे घडवण्याचा अट्टाहास नकोच. क्षेत्र ठरवलंत तर नोकरी मिळवावीच असा हट्ट नको. हे सगळं नको असेल तर जगणं नको. आणि जगणं नको असेल तर प्रेम तर अजिबातच नको. अतिरेकीच झालं हे तर.

        माध्यमं पण ना त्येच्या आयला. भ्येच्योत वीट आणलाय ह्या solidity ने. पुस्तकं, सिनेमे, नाटकं, गाणी… हट त्यैच्या मायला. पण गझल. नादच नाय करायचा. गझल खासच. पण किती दिवस हे सगळं. बरं ध्यान करावं तर नको नको ते विचार येतात. जगणं म्हणजे सावरकरांच्या काळ्यापाण्यापेक्षाही कठोर. शिक्षाच जणू काही. सहली म्हणजे शिक्षाच.

        तेव्हा आम्ही शाळेतले मित्र सगळेजण कॉलेजात जायला लागलेलो. आम्हाला सगळ्यांना वैताग. म्हणून एकत्र आलू आणि सहल ठरली. पैसे सगळ्यांनी झोलझाल करुन मिळवलेच. चार चार हजार काढलेले. सात जण होतो. आधी आम्ही सावर्डेगावात गेलो. हे मित्राचं गावं. जेवणाचं फूकट बघायचे हे आधीच ठरलेलं. अरे हा… एक सांगायचं राहिल्यंच….

        आम्ही गाडी भाड्याने घेतलेली. मला गाडी चालवता येते. सराईत. म्हणून ड्रायव्हर काही भाड्याने घेतला नाही. आम्ही सगळे हुशारच.

        - सावर्डेला रात्री तीन वाज्ता पोहोचलो. मी दमलो. झोपलो. बाकी सगळे रात्री पत्ते कूटत रम्मी खेळले. पैसे लावून खेळले. मूर्ख आहेत ते.

        मग सकाळ झाली. सकाळी मला सगळ्यांत उशिरा उठवण्यात आलं. कारण मी सारथी होतो. मला सगळ्यांच्याबद्दल आदर वाटला. पण प्रेमबीम नाही. उगाच गैरसमज नकोत.

        आम्ही नदीवर चिंब डूबलो. दगडावर बोचे आपटून घेतले. दोघांना पोहता येत होतं. त्यांनी सूर वगैरे मारले. कठीणचं हे. मग मी त्यांच्याकडून पोहण्याचे दोन धडे गिरवले. पण त्यांनी नीट शिकवले नाहीत. ते बावळटच आहेत. मग आम्ही गाडी नदीवरच धूतली. सावर्डेतल्या मित्राच्या घरी गेलो. त्याची आजी खूप मायाळू. भरगच्च मालवणी बोलायची. तसा मी पण कोकणातला. तिला मी हे सांगितलं नाही. मला मालवणी बोलायची लाज वाट्टे.

        आजीने पेज करुन खायला घातलेली.

        आजीने दोन-चार शिव्या आम्हाला शिकवल्या. तिच्या नकळत आम्ही स्वतःहून शिकून घेतल्या. आम्ही हुशारच. मी तीने केलेल्या पेजेची तारीफ केली.
        मी - आजी… पेज फट्टे झालीये…

        -फट्टे हा आम्ही कॉलेजात शिकलेला शब्द. थोडक्यात फारच सुंदर. आजीला वाटलं नीट जमली नाही पेज. रागवली. ती म्हणाली.

        - ता… मेला रांडेचा…लवडा लसून सांगता…. मायझया राजग्या… त्येका येउंदे… गांडीक दात इले हत त्येच्या… बावडीवर जाउची घाई… पेजेत नमकच खालूक न्हाय भोसडीच्यान…

        …मग आम्ही घाबरलो. नंतर गावातल्या देवळात जायला निघालो. देउळ दीड किलेमिटरवर. शायनिंग मारत गावठणातून माती उडवत गाडी वेगात घेउन निघालो. रामेश्वराच्या मंदिरात गेलो. कोकणात रामेश्वर.. नाहीतर कुणकेश्वर… नाही लिंगेश्वर… नाहीतर महादेव नाहीतर शंकर वगैरे इत्यादी दगडाचे देव.
        देवळात दोन चार फोटो वगैरे काढून बाहेर आलो. आमच्या गाडीसमोर रिक्षा उभी होती. आतल्या पायवाटेवरनं पाच-सहा माणसं एका मुलाला उचलून रिक्षात घालणार. इतक्यात …आमच्यातला मित्र जो पत्रकार आहे…तो विचारपूस करायला

        - ओ.. काय ओ… काय झालं..

        एक माणूस - काही नाही… त्येच्या पोटात बिटात पाणी गेलता…
        आधी म्हणतो काही नाही. मग म्हणतो… पोटात पाणी… मी पेजेची निवळ प्यायलेलो जास्त. तिचा ठेकर लगेच देउन टाकला.

        माझी उंची जेमतेम… मला काहीच दिसत नव्हतं. इतक्यात रिक्षावाला.
        - बाळग्या हयती गाडी इली हा. ह्याका गाडीसून पकटन नेहूक गावतला. गाडीत टाक त्येका.

        आमच्यातला एक मित्र जो मनसेचा कार्यकर्ता पण आहे तो लगेच मला गाडी सुरु करायला म्हणाला. डोळ्यांनीच. मी समजून गेलो. सगळं खूप फटाफट होत होतं. मी बसलो. सराईतपणे गाडी गोल फिरवली. पुढे माझा मनसेचा कार्यकर्ता असलेला मित्र बसला. त्येच्या बाजूला गावातला एक भंपक गडी. मधे त्या पोराला मांडीवर घेउन दोन बायका आणि एक पुरुष. नंतर कळलं, ते त्या पोरचे काका काकी आणि आत्या आहेत. पाठीमागे उरले सुरलेले मित्र बसले.

        आता मी गाडी चालवू लागलो. त्या पोराला कुठं दचका बसू नये म्हणून मी सावकाश चालवू लागलो. इतक्यात मला काकींचे उसासे ऐकू येउ लागले. अचानक पाठी बसलेला माझा मित्र… जो शिवसेनेचा गटनेता आहे… तो जोरात माझ्यावर ओरडला…

        - रांडेच्या पळवी की… जीव वाचवायचाय याचा

        मग मला त्याचा राग आला. पण मी त्याला काहीच बोल्लो नाही. सगळा राग एक्सलेटर वर काढला. मी हवेशी स्पर्धा करत सुसाट वेगात गाडी सावर्डे गावच्या दवाखान्यात आणली. मग शिवसेनेच्या माझ्या धोरणी मित्राने गाडीतून उतरून त्या पोराला लगेच दोन हातांवर उचलून दवाखान्यात नेलं. एकट्यानंच.

        हा रांगडा गडी.

        आत्तापर्यंत माझा पत्रकार मित्र माहिती घेउन आला. हा पोरगा १७ वर्षांचा आहे. नदीत पोहायला गेलेला. खूप खोल गेला. ह्याला पोहायला येत नव्हतं. मग अचानक खूप वेळ घरी आला नाही. तेव्हा शोधाशोध. तेव्हा कळालं. हा बुडालेला पाण्यात.

        एवढी माहिती कळेपर्यंतच.. ज्या वेगानं शिवसेनेचा गटनेता त्याला आत घेउन गेलेला त्याच वेगाऩं त्याला पुन्हा बाहेर घेउन आला… गाडीत घातलं. माझ्याशी डोळ्यांनीच बोल्ला.

        मी फटाफट गाडी सुरु केली. गाडी वळवताना सूचना… चिपळूणच्या वालवलकरला घे.

        ह्या वेळी दहा हत्तींच बळ अंगी आणलं आणि १००-१२० च्या वेगानं गाडी वालावलकरच्या प्रांगणात आणली. लगेचच त्या पोराला आत घेउन जाण्यात आलं. मग आम्ही सगळे बाहेर थांबलो. आम्ही म्हणजे फक्त शिवसेनेवाला मित्र सोडून, इतर मित्र. मनसे वाला दोस्त आत जायचा गेटपर्यंत आणि तिथूनच मागे यायचा.

        मग गटनेता असलेला मित्र बाहेर आला आणि मला एक बाजूला घेउन गेला. आम्ही दोघंच फक्त एकमेकांच ऐकू शकू अशा पद्धतीची काळजी घेत.
    आडोशाला आल्यावर तो…

        - सॉरी यार… मगाशी तूला उगाच शिवी दिली.

        मग मला खूप अभिमानी वगैरे वाटलं. मी मौका बघत चौका लगावणार इतक्यात पोटात कळ आली.

        its ok दोस्ता ऐवजी…मी म्हटलं…

        - इथे संडास कुठेय?

        मग तो वैतागला. मी हगायला निघून गेलो. इतर सगळे प्रांगणात थांबलेले. तिथल्या त्या पोराच्या काकांना मदत करत होते.

        मी मोकळा होउन बाहेर आलो. तेव्हा त्या मुलाला लागणा-या गोळ्यांचा सगळा खर्च आमच्या मनसेवाल्या मित्राने केला. आम्ही सहलीसाठी काढलेले सगळे पैसे दुर्देवाने ह्याच्याकडेच जमा केले होते. मला खूप वाईट वाटलं पैशांबाबत.

        थोड्या वेळानं मला भूक लागली. मग आम्ही कॉफी पिउन आलो.
        आलो तर त्याचे काका डोक्याला हात लावून बसलेले. काकी- आत्या महिलामंडळ हंबरडा फोडत होतं. पोरगा नाही वाचला.

        हे कळल्यावर आमच्या सगळ्यांच्या तोंडातना एकच शिवी - आय झवली.

        पाया खालची जमीन सरकते.. तसं काहीसं झालं.

        आता सिगरेट ओढायला हवी. पण मी या आधी कधीच प्यायलेलो नाही. नको. ठसका लागेल.

        बरं… आता काय बोलायचं. खिशातून रुमाल काढून कपाळावरचा घाम पुसत आम्ही वालावलकर रुग्णालयाच्या बाहेर आलो. कोणीच कोणाशी काहीही बोल्लं नाही. मग कुणी आपल्याकडे पाहत तर नाही ना.. हे बधून मी डोळ्यांतला घाम पुसला.

        हे सगळं क्रूरच. मला खूप जड जड वाटायला लागलं.

        मग वातावरण हल्कं करायला गावातले काका बोल्ले. आमच्या सोबतच निघालेले ते. गाडीतनं. कारणं नंतर त्यांना घरी जाताना एसटीची तिकीट काढावी लागली असती, असं सेनेच्या माझ्या दोन्ही मित्रांना आणि मलाही वाटलं.

        मग ते काका बोलायला लागले.
        -ह्यो..अनिकेत गांगण. अकरावीत व्हतो. पहिल्यांदाच इल्लो कुकणात. इल्यापासना नदीवरच भिजत बसायच्यो. सहरात कधी ह्याका नदी गावली नसात. गेलो असात भोव-यात.

        त्यांना तोडत मी ...
        - ह्याचे आईबाप?
        - बा सोडतच नव्हतो. पोरान हट्ट धरल्यानं गावी जाउचो. चुलतो घेउन इलो ह्याका. सख्या भावानं ह्याका आणल्यान. स्वतःक पोरबाळं न्हाय. आता काय… त्येच्या आवशीबापसाक कोणत्या तोंडानं कळवतलो ह्यो. बा झवत गेलो… सांभाळूक न्हाय य्येत तर आणूचा कित्यात त्येका… दुस-याच्या झिलाक.

        मग मला त्याचा खूपच राग आला. गाडी थांबवून ह्या माणसाच्या जवळं जाउन ह्याच्या दोन पायांच्या मध्ये लाथ मारावी असं मनातल्या मनात वाटलं. पण मी ह्यातलं काहीच नाही केलं. त्याला सावर्डे स्डँडवर सोडलं. मग तो भजी खायला गेलो. जाताना आम्हाला विचारलं…

        - कांद्याच्यो भजीयो घेतास चाकरमन्यांनो..?
        मग आम्ही तिथून निघालो आणि परत देवळात जायचं नाही असं ठरवलं.
        सहलीचा आमचा हा पहिलाच दिवस होता. मग मला खूपच भरुन आलं.

        बाबांची म्हणजे माझ्या बापाची मला खूप आठवण आली. त्यांनी मला, मी चौथीत असताना पट्याने मारलेलं. पण तेव्हा रडलो नव्हतो. म्हणजे डोळ्यातं पाणी आलं होतं. पण हंबरडा शेवटपर्यंत सोडला नाही आणि रागाने बापाकडे नजर कोखीन होतो. आपली सहनशक्ती थोरच. तेव्हापासून आजपर्यंत आपण बापाशी बोलण टाकलेलं. नंतर बाप आपल्यावर खुप प्रेम करायला लागला. पैसे द्यायला लागला. नको असताना पण. पैसे आपण घेतले पण प्रेम… शक्यच नाही.

        तेव्हा अभिमानी अस्सं वाटलं. ह्याच्या म्हणजे बापाच्या गांडमस्तीमुळं आपण जन्माला आलो. पण हे उगाचंच.

        एव्हाना मी नेमाड्यांच हिंदू वाचलेलं. जगण्याची समृद्ध अडगळ मी स्वतः वाटलो. त्रासदायकच. तेव्हापासून शाळेतल्या मित्रांशी सहल नाही. भंपक लोक आहेत साले. वाचन नाही करत. कविता नाही. गझल तर नाहीच नाही. च्युतिया साले.

        पण ते सगळे सिगरेट ओढतात. हे एवढं काही आपल्याला जमलं नाही. दारु पिणं जमतंय हळूहळू. पण हे काही जमत नाही. ह्या बाबतीत आपण त्यांना मानतो. माझ्याआधी मरणार ते. रांडेच्यांना जगायचंच कशाला अतसं, काय माहित. ह्यांना गाडगेबांबा बद्दल बोल्लो एकदा तर तर मलाच च्युतियात काढलं भडव्यांनी.

        Hell… कशाला जगायचंय. मरायला Ohh Yes!.. मरुयात. Damm... सावर्डेला जावं लागलेत. त्या नदीत. खोल. तिथं कोण नसणार.

        नको. आता उन्हाळाय, पावसाळ्यात जाउ.

        पण तो पर्यंत काय… शोधा. नोकरी शोधा. म्हणजे नोकरी मिळाली की एक छोकरी आपल्याला पटवेलंच. आपण थोर. मग प्रेम. अतिरेकी व्हायला सुरुवात. लग्न-मुलं-संसार-त्यांच शिक्षण- मग- ohh know….. - This is so irritating.

        - नो नोकरी-नो छोकरी.

        आपले आईबाप जगतायेत. तो पर्यंत जगू. Solid. कडक जगू. तो पर्यंत का? आपलं नसलं तरी त्याचं प्रेम आहे आपल्यावर… त्याच्यांसाठी. ते मेले की…? अरे wait for a second ती छावी..! त्या तिस-या बाकाच्या कोप-यात बसून चोरुन लाईन देणारी… आयचा घो.. पण आपल्याला तर तिच्या बाकावर कडेला बसणारी आवडलेली नेहमी…भरलेलं वांगच जणू काही. कितीदा आणली तिला स्वप्नात… Oh no..Not again.

        I am Fucked up… ह्या झवाझवीच्या गोष्टींनी वीट आलाय. साला एड्स वर औषध नाही ना आलं अजून.. हा रोग झाला पाहिज्ये आपल्याला. मज्जा येईल. अर्ध्याहून अधिकांना ध्यान करत करत मारुन टाकू. भ्येंच्योत सरळ मेल्यावर कोण विचारणार रांडेच्यांना.







Comments

bhushan vaidya said…
धम्माल