वाट्टेल ते - का करतोय



दहीहंडी म्हणजे काय, हे काही जणांना विचारलं. तर त्यातल्या -याच जणांनी दहीहंडीची व्याख्या एक सण उत्सव म्हणून सांगता हा एक पॉलिटीकल इव्हेन्ट बनत असल्याचं सांगितलं. एका सांस्कृतिक सणांचा राजकिय इव्हेन्ट बनण्याइतकं दुर्दैव दुसरं कोणतं असणार,असं वाटू लागलं. याच प्रेरणेतून दहीहंडी, बाळगोपाळ, वाढणारी गोविंदा पथक यांवर अभ्यास सुरु केला

     का करतोय दहीहंडी वर्षातून एकदा येते. मात्र, वर्षभर गोविंदा त्या एका दिवसाची वाट पाहत असतात. एकापेक्षा एक मानवी मनोरे उभे करताना लागणा-या एकसंघतेचा सराव या दहीहंडीच्या आधीपासूनच अहोरात्र सुरू होतो. दहीहंडीच्या दिवशी ओंसडून वाहणारा गोविंदांमधील उत्साह, एकपेक्षा एक सरस थर लावताना लागणारी जिद्द, या सर्व थरारक गोष्टींच्या पलिकडे जाउन आपण विचार केला तर दहीहंडी फोडणा-या गोविंदांना दरवर्षी काय मिळतं ? महिनाभर प्रॅक्टिस करताना मिळालाच तर वडापाव. गोकुळाष्टमीच्या दिवशी पुलाव आणि मसालादूध. एक टीशर्ट. आणि मोठमोठ्या हंड्या फोडणा-या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या जणांना मिळालेच तर अवघे काहीशे रुपये. तरीही आपल्या बापजाद्यांची परंपरा टिकवायच्या म्हणून दरवर्षी ते जीव तळहातावर ठेवून सटासट थर लावतात. त्यांना माहितही नसतं की आपण मराठी संस्कृती रुजवायचं एवढं मोठं काम करतोय. या कामाला आता व्यावसायिक रूप आलंय. गोविंदा पण आता ग्लोबल होत आहेत. पण या ग्लोबल गोविंदाला अभूतपूर्व इतिहास आहे. तो इतिहास लोकांसमोर यावा म्हणून हा खटाटोप.....

दहीहंडीची व्याख्या गेल्या 10 वर्षांत खूपच वेगाने बदलतेय. तिंच स्वरुप बदलतंय. या बदललेल्या स्वरुपाची व्याख्या योग्य आहे कि अयोग्य आहे, याचा तटस्थ भूमिकेतून (माहितीपटाच्या आधारे) आढावा घेत आहोत. हा आढावा घेताना, त्या विषयावर भाष्य करताना अनेक पैलूंचा विचार करणं ओघाओघनं आलंच. ते पैलू खालीलप्रमाणे
  1. का केली जाते दहीहंडी
  2. गल्लीबोळातून झालेली सुरुवात आणि आताचं ग्लोबल स्वरुप...
  3. मिडीयाहस्तक्षेप..? मदत? की विरोधी?...
  4. उत्सवाचं, सांस्कृतिक सणाचं मार्केटिंग...
  5. आयोजक, प्रायोजक आणि वाढत जाणारी स्पर्धा...
  6. ग्लॅमरचा बोलबाला
  7. गोपाळकाल्याचं, श्रीकृष्णजन्माचं महत्त्व...
  8. गोविंदा पथकांचा या दिवसाकडे पाहण्याचा दृष्टीकोन...
  9. संस्कृतीचे पोशिंदे - गोविंदा?
  10. गोविंदांचे प्रश्न, अडचणी, इत्यादी...
  11. गोविंदांसाठीच्या सरकारतर्फे राबवण्यात येणा-या सोयीसुविधा आणि अंमलबजावणी...
  12. दहीहंडी किंवा गोपाळकाला म्हणजेच मानवी मनोरे यांना खेळ म्हणून मान्यता दिली जावी...
  13. या सगळ्या इवेन्टमधून गोविंदाना मिळणारा बौद्धिक, शारिरिक आणि आर्थिक मोबदला...
  14. काय करावं आणि काय करु नये  
इत्यादी पैलूंवर या माहितीपटाद्वारे भाष्य करण्यात येत आहे.


कोण दिसणार माहितीपटात – 
दहीहंडासाठी वाट्टेल ते या माहितीपटात सर्वात जास्त दिसतील ते मुंबईतील वेगवेगळ्या विभागातील गोविंदा पथकांतील बाळगोपाळांच्या मुलाखती. त्यात प्रामुख्याने जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथक, संघर्ष गोविंदा पथक, साई राम गोविंदा पथक, हिंदु एकता गोविंदा पथक, अखिल शंकरवाडी गोविंदा पथक इत्यांदींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील सर्वात जुन्या समजल्या जाण-या उमरखाडी येथील गोविंदा पथकांतील गोविंदाही या माहितीपटात झळकतील. यांच्याच जोडीला शिवसेना खासदार भारतकुमार राउत, माजी आमदार अशोक मोडक आयोजक म्हणून आमदार प्रताप सरनाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार राम कदम, तसेच नाशिक चे राष्ट्रवादी चे शहर उपाध्यक्ष विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रंजन ठाकरे नाशिक चे माजी महापौर नगरसेवक अजय बोरस्ते देखील दहीहंडी बद्दलची मते मांडताना दिसतील. माध्यमांनी दहीहंडीचं स्वरुप बदलवण्यात विशेष भूमिका बजावल्याने जेष्ठ राजकिय विश्लेषक प्रताप आसबे, जेष्ठ पत्रकार संपादक महेश म्हात्रे, जेष्ठ पत्रकार संपादक सचिन परब त्याचप्रमाणे जेष्ठ पत्रकार संपादक प्रवीण मुळ्ये दहीहंडीचं विश्लेषण करताना दिसतील. या सर्वांच्या जोडीला कृष्ण परमात्मा कृष्ण माझा सखा नावाचे दोन वाचनीय ग्रंथांचे लिखाण करणारे लेखक अविनाश लिमये, अभिनेता आदेश बांदेकर, प्राचीन भारतीय संस्कृती पुरतत्व विभाग, सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मुख्या अनिता राणे त्यांचे विद्यार्थी मते मांडतील. स्पेन मधील कॅस्टलर्स चे खेळाडू देखील दहीहंडी ला मिळणा-या प्रतिसादाबद्दल बोलताना या माहितीपटामध्ये दिसतील

माहितीपट कुठे दिसणार – 
राष्ट्रीय आतंरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्समधून हा माहितीपट दाखवण्यात येईल. त्याचप्रमाणे लवकरच याचे एक ग्रॅंड स्क्रिनिंग करण्यात येईल.

माहितीपटाची भाषा 
सदर माहितीपट मराठीत असून तो इंग्रजी सब-टाईटल सहित पाहता येउ शकेल.
कोण करतय
साद एन्टरटेनमेन्ट नावाच्या बॅनर खाली ह्या माहितीपटाची निर्मिती होतेय.
निर्मातेसंजय दळवी 9323578428
दिग्दर्शकसिद्धेश सावंत 9820760344
लेखनदक्षता ठसाळे 9870922460
संकलनरौनक फडणीस 9870923545
संगीत संयोजनचेतू विचारे 9987182913
छायाचित्रणअवधूत राणे 9702530333
प्रोमो एडीटरवैभव महाडीक 9768763884
Watch out the promo here - http://www.youtube.com/watch?v=swXPFSnZ51A

Comments

Ankush Sutar said…
आपल्या माहितीपटास उत्कृष्ट प्रतिसाद लाभेल अशी आशा आहे आम्हाला...........