वाघमारे सचिन...तुला विसरण खूपच कठीणं...



तीन वर्षांचा लेखाजोखा. कॉलेजचा. बीएमएम करताना पाटकर कॉलेजात घालवलेली ती ३ वर्ष आय़ुष्यातली मस्तीभरी वर्ष होती. खुप किडेगिरी, करामती आणि उपद्व्याप केले. ही नुसती धम्माल. आणि खुप सारा अनुभव. कधी चांगले तर कधी वाईट. कधी नुसतेच रटाळवाणे तर कधी कधी खुपच घाई गडबडीचे दिवस. तीन वर्ष पूर्ण व्हायला आलीयेत. पण सगळं काही ताजताज आठवतंय. कॉलेजचा पहिला दिवस लख्ख डोळ्यासमोर उभा राहिलाय. तीन वर्षांत बरीच माणसं मित्र सखे सवंगडी यार दोस्त .....थोडक्यात जीवभावाचे बरेच जण भेटले. त्याचं माझ्या आयुष्यावर असलेलं योगदान अमुलाग्र आहे असं समजतो. ते पांग कधीच फेडता येण्याजोगं नाही आणि म्हणून त्यांच्या विषयीची कृतज्ञता आदर प्रेम राग लोभ सगळं काही जसच्या तसं मांडतोय. कुणी वाचावं या आशेने हे लिहीलेलंच नाही. तीन वर्षांची आयुष्याची गोळा बेरीज करतोय. माझ्यासाठीच. ब-याचदा पुस्तक लिहीताना ते कोणाला तरी अर्पण केलं जात. हे पुस्तक नाहीये, की ते मी कोणाला तरी अर्पण करावं. हे निव्वळ माझं मलाचं.
ही गोळा बेरीज कराताना मला सुरुवात करण्यासाठी एकच नाव पहिल्यांदा डोक्यात आलं, ते म्हणजे सचिन वाघमारे. कॉलेज मध्ये असताना आमचा प्रोजेक्टचा ग्रुप एकच असायचा. त्यात हा ही होता. सचिनची माझी ओळख पल्लवी ने करुन दिलेली. शेक हॅन्ड करुन एकमेकांची नावं शेअर केली. तेव्हा सचिन खुपच अरसिक वाटलेला. थोडासा टपोरीसुद्धा. आणि वाट चुकलेलाही.
पहिल्या प्रोजेक्टसाठी आम्ही तयारीला लागलो तेव्हा आम्हाला जागेचा प्रश्न सतावत होता. काम करायला बसायचं कोणाकडे. मी सगळ्यांना माझ्या घराचा पर्याय सुचवला. योगायोगानं...कळांल की सचिंन माझ्या अगदी जवळच राहतो. गेली ११-१२ वर्ष इतकी जवळ राहूनही आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. नंतर कॉलेजला जाताना येताना आम्ही एकत्रच असायचो. दरम्यानच्या काळात खुपच जवळीक साधली गेली.
सचिन भेटलेला तेव्हा तो आपल्यापैकीच आहे असं वाटायचा. दर मित्र मोठ्या भावासारखा वाटतो...पण सचिन लहान भावासारखा वाटायचा. पडेल ते प्रोजेक्टचं काम करायचा. येत नसेल तरी चुकत चुकत कसंबसं शेवटाला न्यायचा. त्या संपवलेल्या कामात गुणवत्ता नसली तरी पुर्णत्वः होतं हे नक्की. साधारणः हल्लीच्या प्रत्येक तरुणामध्ये काहीना काहीतरी स्किल असतं. कोण फोटोग्राफी मस्त करतं, कोण गाणं गातं...कोणी गाण्यावर छान नाचत...कोणी सॉफ्टवेअर मास्टर असतो...आणि कोण काय काय कशात कशात मस्त असतं. सचिनला तसलं काहीच येत नव्हतं. तो इतरांसाठी सामान्य वाटावा इतका अतिसामान्य. कशातच त्याची गिनती नसायची. पण आम्ही कॉलेजमध्ये एकत्र असायचो. किंबहुना कॉलेजच्या पहिल्या वर्षात आम्ही सगळीकडेच एकत्र असायचो. मी एकटा असल्या वर सचिनची चौकशी करायला सगळे माझ्याकडे आणि सचिन एकटा दिसल्यावर माझी चौकशी करायला सगळे सचिनकडे इतकी घनिष्ठ जवळीक.
आम्ही एकमेकांना सगळं काही सांगत असू. एकमेकांच्या पर्सनल पर्सनल गोष्टी सांगण्यासाठी तेव्हा सचिनला मी आणि मला सचिन होता.
प्रोजेक्ट ग्रुममध्ये सगळेजण एकदा सचिनची चेष्ठा करत होते. त्या दिवशी मी काही कामानिमित्त त्याच्यांत उशिराने आलेलो. तेव्हा सगळ्यांना कळालेलं की सचिन आम्हां सगळ्यांपेक्षा ४ वर्षांनी मोठा आहे. बापरे. सगळ्यांचे चेहरे हिच प्रतिक्रिया देत होते. खतरनाकच. आधी तर विश्वासच बसत नव्हता...पण नंतर आयडी वर त्याची बर्थडेट पाहिली. तेव्हा समजलं की हे खरयं.
त्या दिवशी बस मधून जाताना त्याने त्या सर्व गोष्टींचा उलगडा केला. ही त्याची कहाणी...
आम्ही तेव्हा पल्लवीच्या घरी प्रोजोक्ट करायला बसलेलो. तिथून चोरकोप डेपो हून ४६१ बस पकडली. आम्हाला पानचट जोक मारयची जाम सवय. त्यावर आम्ही १०पैकी गुण ही देउन टाकायचो. बोलण्याची सुरुवात अशीच झालेली. अखेर विषय निघालाच. सचिनला बोलकं करण्यासाठी मी त्याला माझी सगळी कहाणी सांगायली आधी सुरुवात केली. माझं शाळेत असताना कसं अफेर सुरु झालं. मग मी कसा अडकलो गेलो. शाळा सिनेमा लोकांनी पाहिला असेन...आम्ही तो जगलोय... इतकं भारी डिसकशन झालं. नंतर कसा त्रास झाला. अखेर मुलींचा नाद चांगला नसतो हा निष्कर्ष निघेल अशा आशयाचा संबाद सुरु झाला. आता पर्यंत बसही हायवेला आलेली. सगळं काही फिल्मी वाटावं असंच.
मग सचिनेही या निष्कर्षावर होकारार्थी मान हलवून आपली कहाणी सांगायला सुरुवात.
मी तेव्हा इस्माईल युसुफ कॉलेजात होतो. मला सायन्स ला अँडमिशन मिळालेल. दहावीला काही खूप चांगले मार्क्स मिळालेले नव्हते. पण मी कास्ट मध्ये होतो. आरामात सायन्स मिळालं. मी इंग्रजी शाळेतून शिकलेलो. त्यामुळे इंग्रजीला भीत नव्हतो....सचिन सांगू लागतो.
दहावीची परिक्षा झाल्यावरच माझं बाहेर लफडं सुरु झालेलं. कोणालाही सिनेमातली काहाणी वाटेल, पण ती माझ्या गॅलरीच्या अगदी समोरच्या घरातच राहायला होती. लफडं कसं झालं हे खरंतर जास्ती महत्त्वाचं नसतंच. पण लोकांना त्याच्यातच जास्ती इंटरेस्ट असतो..
सचिनला गहिवरुन येत होतं. मी त्याचं बोलणं लक्षपूर्वक एकत होतो.
इस्माईल युसुफ सायन्स साठी एकेकाळी स्टॅंडर्ड कॉलेजांच्या लिस्ट मध्ये टॉप वर होतं. पण हल्लीच्या काळात कॉलेजाचं नाव कायच्या काय धुळीला मिळालं होतं. प्रेमप्रकरणं, लफडीबाज कॉलेज, रोजच्या मारामा-या असा तिथला माहोल झालेला होता. अशातच सचिनच्या तिला आणि सचिनला एकाच कॉलेजात अँडमिशन मिळांल. दोघांच्या वयात आलेल्या प्रेमाला चांगलाच जोर आलेला. आम्ही फिरायचो. बक्कळ वेळ एकत्र घालवायचो. कधी कधी भांडणं व्हायची. कधी कधी भांडणात प्रेम असायचं.
अशातच एके दिवशी तिने सचिनला नकार दिला. चक्क डावलंल. सचिन तिच्या नशेत. अजून ही झिंग उतरवण्याच्या मानसिकतेतच नव्हता. आत्ताही नाहीये. तेव्हाच्या लुक्स बॉडी अँड हाईट च्या प्रकारावर तिथे सचिन ला धुडकावलेलं. मी पार तुटुन गेलेलो.......सचिन सांगत असतो.
एकदा भर रस्त्यात तिला अडवून मी स्पष्टीकरण मागण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिच्या सोबत चाललेल्या बाबांनी चांगलीच रांगोळी माझ्या गालावर काढलेली....आम्ही हसतो.
ह्या जोकला त्या दिवशी आम्ही १०पैकी१० मार्क दिलेले.
पण थोडासा हसून मूड बनविण्याचा त्याचा प्रयत्न फसतो. तो भावूक झालेला. नंतर त्याची तेवढ्यापूरती समजूत काढून आम्ही घराच्या दिशेला लागलो.
आता प्रोजेक्ट प्रेझेनटेश चे दिवस हळूहळू जवळ येत होते. १३ सप्टेंबर ला सचिन चा वाढदिवस असायचा. आणि नेमकं याच दिवशी आमचं प्रेझेन्टेशन होतं. सगळे लवकर आलेले. पण सचिनचा पत्ता नव्हता. नेहमी आम्ही एकत्र निघायचो. पण आज मला लॅपटॉप न्यायचा होता म्हणून मी लवकर निघालेलो. तसं रात्री ठरलंही होतं.  आमचा तीसरा नंबर होता. आणि दुस-या नंबरचं प्रेझेन्टेशन संपत आलं तरी सचिन कॉलेजला पोहोचलेला नव्हता. अखेर सचिन नेमक्य चालू होण्याच्या वेळी आला. आणि ते पहिलं प्रेझेन्टेशन बोरीवलीच्या कोरा केंद्र ला असलेल्या मॅगडॉनल्ड मध्ये जाउन सेलिब्रेट केलं. प्रेझेन्टेशन खूपच वाईट झालेलं. सगळ्यांचीच पहिली वेळ असल्याकारणानं कोण किती आणि कसं पाण्यात हेही आपसूकच कळून चुकलं.
नंतर सचिन आणि मी, आम्ही जवळपास एकत्रच असायचो. पहिल्या सेम ला त्याला केटी लागली. तशी त्याला ती अपेक्षितच होती. आम्हालाही त्याचं फारसं काही वाटलं नाही. पण नंतर सचिन ला केटी लागतच गेल्या. एक-दोन-तीन मग क्रॉस केटी...असं करत करत तो केटीच्या जंगलात हरवत होता आणि आम्ही बाकीचे जंगल सोडून जात होतो. दुस-या वर्षाला सचिन सोबत नव्हता. त्याला ड्रॉप लागलेला. पण मग सचिन सोबत नाहीय म्हणून मग लेक्चरला किंबहुना कॉलेजला जाणचं कमी झालं. मी ही मग त्या निमित्ताने माझ्या कॉलेज बाहेरच्या करामती वाढवल्याच होत्या.
आता सचिन आणि मी एकत्र फारच कमी असतो. पण कॉलेजच्या पहिल्या संपूर्ण वर्षात हो सोबत होता. मला त्या वर्षीचा माझा वाढदिवस आठवतोय. वाढदिवस वगैरे कधी सेलिब्रेशन पार्टी असंल काही केल नाही. यंदाला कोण कोण घरी येत होते. ताई-भाओजी, दादा वगैरे... कसली कसली गिफ्ट्स मिळाली होती तेव्हा. त्याच दिवशी रात्री आम्ही चालायला गेलो तेव्हा सचिन म्हणाला स्वतःचा वेळ देण्यापलिकडे माझ्याकडे काहीही नाही. तेव्हा भरुन आलेलं. आजही जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा हा असेल तिथून धावून येतो. जमेल तशी मदत करतो. एकटं असल्यावर सोबतीला येतो.
मध्यंतरी सिगरेट फुकू लागलेला. पण अजून तरी त्याची हिम्मत नाही झालीये माझ्या समोर दम मारायची. तसं त्याने का बोलून दाखवलं माहित नाही.
सचिन त्याच्या घरामध्ये सगळ्यात मोठा. त्याला दोन धाकटे भाउ आहेत. सगळ्यात धाकटा मेंन्टली डीसऑर्डर आहे. आणि कुणाल म्हणजे दोन नंबर...  कुणाल अतिशय हुशार आणि समंजस आहे. खरं तर सचिनच्या घरात कुणालच मोठ्या भावासारखा आहे. हे सचिनने मान्य केलंय. ब-याचदा त्याच्या मारामा-या झाल्यात, भांडणं झालीये... पण आजही कुणार सचिन ला जेव्हा दा म्हणून हाक मारतो तेव्हा त्यांच्यातल्या सगळ्या वादावर पडदा पडतो.
ड्रॉप लागल्यावर सचिनला नोकरी करायची होती. पण धड कुठेच जम बसत नव्हता. दुस-या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही रोज रात्री भेटायचो. जेवण झालं की ओसाड रस्त्यांवर चालायला जायचो. ब-याच गोष्टी बोलायला मिळायच्या. नंतर नंतर मीच उशीरा घरी येउ लागलो आणि हा दिनक्रमही मोडीत निघाला. पण जेव्हाही तो भेटतो तेव्हा तारिफ करतो. एकून घेतो. बोलणं फार नसतंच पण मैत्रीमध्ये न पटणारे मुद्दे ही तो तितक्याच स्पष्टपणे सांगून मोकळा होतो.
त्याच्याशी वाद असूनतरी झाला नाहीच. पण त्याने आयुष्यात पोट भरण्यासाठी काहीतरी करावं असं मनापासून वाट्ट. त्यावरुन त्याला मी ब-याचदा सुनावलं. ते त्याला पटलं. पण पुढे काहीच हाती मिळालेलं नाही. शून्य.
चाहने वाले चंद मिलते है

हजारो दर्दमंद मिलते है
वक्त आता है जब मुसिबत का
तब सारे दरवाजे बंद मिलते है... हा अनुभव ब-याचदा आला.

पण सचिन त्याला अपवाद आहे. आमचे दरवाजे एकमेकांसाठी कधीच बंद होणार नाहीत याची खात्री आहे. पण आता तर खूपच कमी भेटतो आम्ही. जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा आधीचा जिवंतपणा कधीच कमी झालेला नसतो. उलट तो आणि जिवंतपणा येतच राहतो आणि येतच राहिल. असा मित्र प्रत्येकाला द्यावा देवाने, जो आयुष्याची वेळ खर्ची घालेल, सोबत करेल,........ जेवढं लिहेन तेवढं कमीच आहे सचिन साठी.
तुझ्यामुळे ब-याचशा गोष्टी कमी वयात कळल्या आहेत मित्रा...त्या तू कशा शिकवल्यास ते महत्वाचं नाहीये...तुझ्यासोबत घालवलेलं आय़ुष्यातलं, ते एक वर्ष कसं सांडलं ...ते अजूनही भांड्यात भरायच्या मी प्रयत्नात आहे.  


Comments