राळेगणसिद्धी लाईव्ह
राळेगणसिद्धी अण्णांच गावं. भष्टाचार विरोधाच्या अण्णांच्या उपोषणाला जितकी प्रसिद्धी मिळाली तितकीच त्याच्या गावाला ही मिळाली. अर्थात याचं सगळं श्रेय प्रसारमाध्यमांना जात. अण्णाचं उपोषण सुरु झाल्यापासना काही प्रेसवाले तिथे तळ ठोकून काही स्टोरी मिळतेय का याची वाट बघतायेत... तर काही स्वतः स्टोरी क्रियेट करण्यात बीझी असल्याचं दिसून आलं. शिरुर पासना १०-१२ किमी च्या अंतरावर असलेलं हे गाव. गावासारखं गाव. शे-दोनशे घरं, दोन मंदिरं, अण्णांनी यशस्वीरीत्या उभे केलेले काही पाठबंधारे सारखे प्रकल्प, शेतीची लांबचलांब असलेली जमीन, नदी, एक शाळा. नगर, औरंगाबाद, पुणे पासना थोड्याफार फरकानं समान अंतरावर असलेलं हे गावं. पारनेर हे राळेगण सिद्धीच्या शेजारचं गावं. शिरुर हून पारनेर ला जायला राळेगणसिद्धी हूनच जावं लागतं. राळेगण सिद्धी ला जाण्यासाठी पुणे-नगर हायवेवरुन शिरुर सोडल्यनंतर एक फाटा आहे. आतमध्ये ६-७ किमी च्या अंतरावर गावाची हद्द सुरु होते. गावात जाण्यासाठीचा इतका चांगला डांबरी रस्ता अण्णांच्या दबदब्याखाली बनवला गेलेला असल्याचं प्रकर्षानं जाणवतं. गावाच्या दिशेने जाताना चौफेर हिरवळ दिसू लागते. कधी का...