कैलासवासी कोकण...?
कोकण हा प्रदेश सह्याद्रीच्या भव्यदीव्य अशा घाटीला लागून आहेत. अशा घाटीमध्ये असलेल्या कैलाश स्वामींच वास्तव्य हे अतुल्य आहे. हर हर महादेवाच्या नाम घोषाने निनादून भारावलेली कोकणनगरी आता कैलासवासी होण्याच्या मार्गावर आहे. कोकणातील भिन्न-विभिन्न भागामध्ये खाणकाम(मायनिंग) आणि खाणकामाशी निगडीत प्रकल्प खूप विस्तरित प्रमाणात चालू आहेत. त्या प्रकल्पांचा कोकणावर होणारा विपरीत परिणाम डोळेछाक करता येण्याइतका नाही. बॉक्साईट आणि इतर काही मॅगेनीज सारख्या खाण्यांचे प्रमाण आणि आताच्या औद्योगिकीकरण च्या युगामध्ये अशा धातूंची वाढीव मागणी विश्वासार्ह वाटते. मात्र खाणकाम करताना वापरण्यात येणारे तंत्र, खाणकामाचा निसर्गाने नटलेल्या कोकणावर होणारा परिणाम अतिशय वाईट आहे. वास्तव परिस्थितीमध्ये अशा आणि 49 खाणकाम प्रकल्पांना सरकार तर्फे परवाना देण्यात येतो, याचा अर्थ न कळण्याइतकी मति कोणाचीहि भ्रष्ट झालेली नाही. अशा परिस्थितीला कोकणातील स्थानिक जनतेने ज्या प्रमाणात विरोध आणि टिका करायला हवी होती, ती नोंदवली गेलेली नसल्याने अशा गोष्टी जास्त फावतात, असे प्रामुख्याने दिसून येते. जैतापूर मुळे पर्यावरण हानी...