Posts

..असा होता टीव्ही ९ मराठीचा राजीनामा!

Image
अमोल मोरे नावाचा एक मित्र टीव्ही९ मध्ये भेटला .  मध्यंतरी त्याचा फोन आला .  नंबर सेव नव्हता म्हणून ओळखलं नाही .  उशिरानं ट्यूब पेटली .  अमोल मूळचा कोकणातला .  मी ही कोकणातलाच .  त्यामुळे लगेच आपुलकी निर्माण होतेच .  हल्लीचीच गोष्ट .  मी जॉईन झालो होतो नुकताच टीव्ही९ मराठीला .  आणि अमोल सोडून चालला होता चॅनेल .  अमोल आता गावी असतो .  लांजा - राजापूर जवळ त्याचं गावंय .  मला वाटलं चांगली संधी मिळाली म्हणून अमोल टीव्ही ९ सोडून जात असावा . पण तसं नव्हतं . अमोल कंटाळला होता . वैतागलेला . गावी जाऊन शेती करायचं अमोलनं मनाशी पक्क केलं . अमोल गावी गेलाय . मी जेव्हा टीव्ही९ मराठी सोडलं . तेव्हा त्यानं फोन केला . फोनवर बोलणं झालं . त्यावरना तो समाधानी वाटत होता . दोन पैसे कमी कमवेन . पण ...

वागळे, उभ्या महाराष्ट्रानं आता बसून कुणाकडं बघायचं?

Image
वागळे. तशा माझ्या आयुष्यात आतापर्यंत वागळे आडनावाच्या दोनचं व्यक्तींना मी ओळखतो. एक निखिल वागळे. आणि दुसरी नम्रता वागळे. निखिल वागळे सगळ्यांना माहित आहेत. नम्रता सगळ्यांना माहित आहे की नाही. माहित नाही. खरंतर दोघेही एन्कर. वृत्तनिवेदक. दोघांनीही डिबेट शो केलेत. या दोघांमध्ये निखिल वागळे जास्त प्रसिद्ध आणि चर्चेत असतात, हे कोण नाकारेल? वागळेंचा सडेतोड शो टीव्ही ९ मधून तडकाफडकी बंद केल्यानंतर वागळे पुन्हा चर्चेत आलेत. पत्रकारांमध्ये याच्या गप्पा रंगतायेत. विषय चविष्ट आहे. लोकांमध्येही चर्चाय. टीव्ही9 मराठी बघणारे माझे बाबा विचारतायेत.. 'अरे वागळेंचा शो का येत नाहीये?' मी निरुत्तर. यावरुन निखिल वागळे हे काही फक्त पत्रकारांपुरते मर्य़ादित राहिलेले नाहीयेत, हे सिद्ध होते. प्रेक्षकांना त्यांच्यात फार इंटरेस्ट आहे. मला तर असं वाटतं की ज्येष्ठ पत्रकार, संपादक निखिल वागळे हे एका डॉक्यूमेंन्ट्रीचा विषय आहेत. लोकांना फार इंटरेस्ट आहे त्यांच्या एकंदरीत आयुष्यात. एकंदरीत वागळे जे काही करतात, त्याचं गॉसिप करण्यात केवढा इंटरेस्ट रेट आहे, हे इतर चॅनेल्सनी एकदा तपासून बघायला हवं...

आपल्यातला बाहुबली कुठंय?

Image
एबीपी माझासाठी तसं फारसं लिखाण होत नाही. ठरवून कित्तेकदा लिहीलेले लेख अर्थवट सोडून दिलेत.  लिंक लागत नाही. माझासाठी लिहीताना फार दडपण असल्यासारखं वाटत राहतं.  असं का होतं माहित नाही. पण तरी हातावर मोजता येतील इतक्या वेळा माझा साठी ब्लॉग लिहीलेत. ते मलाही फारसे आवडलेले नाहीत. पण हा ब्लॉग आवडला होता. तो रविवारचा दिवस होता. अनिष वेबला त्याचं काम करत बसला होता. बाहुबलीनं इतकी कमाई केली वगैरे बातमी समोर होती. त्याला म्हटलं, ब्लॉग लिहून देऊ का.. खूप चालेल. त्यानं पटकन दे म्हणून सांगितलं. घाईघाईत हॉ ब्लॉग आटोपला. त्याला मेल केला. मेघराज सरांना फोनवरुन कळवलं. आणि ब्लॉग वेबसाईटवर आला. अपेक्षा होती की हा ब्लॉग वायरल होईल. पण अपेक्षेप्रमाणे चालला नाही. म्हणजे इतर ब्लॉग आणि पोस्टच्या तुलनेने चांगलाच चालला. पण मनासारखा चालला नाही. त्यामुळे हा ब्लॉग लिहूनही मजा आली नाही. हा ब्लॉग न चालण्याचं कारणही अपेक्षित होतं... त्याचं टायटलमुळे ब्लॉग चालला नाही. बाहुबली हीट झाला.. पण त्याच्यावरचा ब्लॉग जोरदार आपटला. टायटल होतं कटप्पाने बाहुबलीला नाही मारलं ...

मी मज हरपून...

Image
त्यानं फोन स्विच ऑन केला. आताशा दोन आठवडे निघुन गेले होते. तो भानावर आला होता. पण राग काही शमला नव्हता. चुकून कुठंतरी व्यक्त होऊ म्हणून त्यानं व्हॉट्सअप, फेसबुकवरचा स्टेटसही अपडेट केला नव्हता.  रागाच्या भरात तिला फोन लावू म्हणून मुद्दाम फोनमध्ये बॅलन्सही भरला नव्हता. सगळं काही जाणीवपूर्वक. जाणूनबुजून.  आज काही ती फोन करणार नाही. त्याला खात्री होती. दोन आठवडे फोन बंद ठेवल्यावर ती कशाला आपल्याला करेल फोन?  तिलाही आला असेलच की राग.  आपण करावा का तिला फोन? तिला बिचारीलाही आपल्यासारखंच वाटत असेल ना? एकटं एकटं.  बट व्हाय शूल्ड अलवेज आय? हा विचार खाटकन त्याच्या डोक्यात शिरला.  तिला फोन करण्याचा विचार त्यानं सोडून दिला. स्वतःला उगाचच कशात तरी गुंतवून घ्यावं.. त्यानं ठरवलं.  पण कशात जीव गुंतवावा या विचारात असतानाच… फोन वाजला… रिंगटोन होती… मी मज हरपून.. बसले गं.. आशा ताईंच्या आवाजातलं गाणं.. सखी मी मज हरपून…. बसले गं.. सुरु होण्याआधीचं त्यानं तप्तरतेनं फोन रिसिव्ह केला…  कानाला लावला.. फोन आलाच तर काय बोलायचं आणि काय नाही… हे ...

गेले द्यायचे राहुन

Image
त्यानं तिला फोन लावला..रिंग वाजत राहली. शेवटी ऐकू आलं...नो आन्सर. पुन्हा फोन लावला. पुन्हा तेच. प्रयत्न सुरुच राहिले. अखेर तो वैतागला. वैतागून त्यानं प्रयत्न करणं सोडून दिलं. फोन दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवला. वैतागलेलं मन स्थिर होण्यात काही काळ गेला. शांत होण्यासाठी पुस्तक हातात घेतलं. तो पुस्तकात लक्ष केंद्रीत करू लागला. पण नजर सारखी फोनकडेच जाई.. अस्वस्थता स्थिर राहू देईना. फोन स्विच ऑफ करण्याचा विचार त्याच्या मनात येऊन गेला. मरु दे..तो मनाशीच पुटपुटला. हातातलं पुस्तक टेबलवर आटपलं आणि फोन तिथंच ठेवून तो निघून गेला. परत आला तेव्हा तिचा मिस कॉल होता... त्यानं लगेचंच कॉल बॅक केला… यावेळी रिंग वाजली… नो आन्सर ऐकू येण्याच्या काही क्षण आधी तिनं फोन उचलला.. ती- काय रे.. फोन करत होतास? तो - हो.. ती - बोल.. काय झालं? तो - काही झाल्यावरच फोन करायला हवा का? ती - तसं नाही.. पण ३० मिस कॉल होते.. म्हणून म्हटलं.. तो - बोलावसं वाटत होतं.. ती - अच्छा..बोलं ना तो - पण आता नाही वाटतंय बोलावंस ती - का? तो - वेळ टळून गेली आता ती - सॉरी अरे, फोन सायलेन्ट...

पत्र लिहाणाऱ्या गुरूला.. वाढदिवसानिमित्त

Image
त्याच्या वाढदिवसा निमित्ताने.. खाजगीतलं चव्हाट्यावर…. शुभेच्छा रे भावा ---------------- हाय गुरू. हे काही पत्र वगैरे नाहीये. पण तू बर्थडेला लिहीलेलं पत्र भारी होतं. खूप लोकांना आवडलं ते. मलाही प्रचंड आवडलं. मला खरं तर भिती वाटायची की त्या तूझ्या ब्लॉगमध्ये मलाही लिहीशील काहीतरी आणि लाज काढशील माझी. पण तसं काही केलं नाहीस. जाणिवपूर्वक तसं सगळं लिहीणं टाळलंस तू, हे ही लक्षात आलं. थँक्यूंच म्हणायला हवं. असो.                  खरं तर बर्थडेच्या दिवशीच तूला एक सविस्तर पत्र लिहीणार होतो, पण मग ते कृतज्ञता वगैरे केल्यासारखं वाटलं असतं तूला, म्हणून थांबलो आणि नाही लिहीलं. तू त्या ब्लॉगमध्ये आपली पहिली भेट कुठे झाली ते मेन्शन केलंयस. पण आपली दुसरी भेट केव्हा झालेली, ते नाही आठवत आहे मला. तूला आठवतंय का…. ते आठवण्याच्या नादात मला बाकीचं बरंच काही आठवतंय. म्हणजे आपण एकदा वांद्र्याच्या त्या गार्डनमध्ये बसलेलो. तुझे बाबा तुला हॉस्पिटलमध्ये नोकरी बघत होते वगैरे म्हणून तू फ्रस्टरेट झालेलास आणि बरंच काही बोलत होतास. सगळं कळत असूनही...