Posts

Showing posts from February, 2018

मोदी आडनावाची धास्ती

Image
त्या दिवशी सकाळी फार बातम्या नव्हता. बातम्या नसल्या की पेपर चाळावेच लागतात. टाईम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावरच नीरव मोदीची बातमी एका कॉलमात छापलेली होती. दुसरं कोणतंच मराठी चॅनेल नीरव मोदीची बातमी चालवत नव्हतं. टाईम्सनं नीरव मोदीच्या लुकआऊटची बातमी छापलेली. त्या बातमीचा आणि पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळ्याचा काहीही संबंध आणि उल्लेख त्यात नव्हता. त्याचवेळी डोक्या विचार आला की बायकोला हे सांगायला नको. आधीच ती घाबरी. नीरव मोदीच्या ऑफिसमध्ये दोन महिन्यांपूर्वी जॉईन झालेली. त्यात तिला नोकरी जाण्याची लगेचच भीती वाटली. तिनं खूप आधी, साधारण सहा महिन्यांपूर्वी इटरव्हू दिला. बोलवणं काही आलं नाही. नोव्हेंबरमध्येच कॉल आला. स्वारी  नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसात जॉईन झाली.. आणि फेब्रुवारीत मोदीनं हजारो कोटी रुपयांचा चुना लावल्याच्या बातम्या आल्या..आणि अर्थाच बायकोची नोकरी गेलीच. अशा अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.  बायदवे नीरव मोदीच्या कंपनीत काम करणारे देशोधडीला लागतील, अशी शक्यता जरा कमीच आहे.   कमी शिकलेली, हातात कला असलेली माणसंच नीरवनं भरती केलीएत. त्यामुळे नोकरी गेली म्हणून त्यां...