..असा होता टीव्ही ९ मराठीचा राजीनामा!

अमोल मोरे नावाचा एक मित्र टीव्ही९ मध्ये भेटला . मध्यंतरी त्याचा फोन आला . नंबर सेव नव्हता म्हणून ओळखलं नाही . उशिरानं ट्यूब पेटली . अमोल मूळचा कोकणातला . मी ही कोकणातलाच . त्यामुळे लगेच आपुलकी निर्माण होतेच . हल्लीचीच गोष्ट . मी जॉईन झालो होतो नुकताच टीव्ही९ मराठीला . आणि अमोल सोडून चालला होता चॅनेल . अमोल आता गावी असतो . लांजा - राजापूर जवळ त्याचं गावंय . मला वाटलं चांगली संधी मिळाली म्हणून अमोल टीव्ही ९ सोडून जात असावा . पण तसं नव्हतं . अमोल कंटाळला होता . वैतागलेला . गावी जाऊन शेती करायचं अमोलनं मनाशी पक्क केलं . अमोल गावी गेलाय . मी जेव्हा टीव्ही९ मराठी सोडलं . तेव्हा त्यानं फोन केला . फोनवर बोलणं झालं . त्यावरना तो समाधानी वाटत होता . दोन पैसे कमी कमवेन . पण ...