पत्र लिहाणाऱ्या गुरूला.. वाढदिवसानिमित्त

त्याच्या वाढदिवसा निमित्ताने.. खाजगीतलं चव्हाट्यावर…. शुभेच्छा रे भावा ---------------- हाय गुरू. हे काही पत्र वगैरे नाहीये. पण तू बर्थडेला लिहीलेलं पत्र भारी होतं. खूप लोकांना आवडलं ते. मलाही प्रचंड आवडलं. मला खरं तर भिती वाटायची की त्या तूझ्या ब्लॉगमध्ये मलाही लिहीशील काहीतरी आणि लाज काढशील माझी. पण तसं काही केलं नाहीस. जाणिवपूर्वक तसं सगळं लिहीणं टाळलंस तू, हे ही लक्षात आलं. थँक्यूंच म्हणायला हवं. असो. खरं तर बर्थडेच्या दिवशीच तूला एक सविस्तर पत्र लिहीणार होतो, पण मग ते कृतज्ञता वगैरे केल्यासारखं वाटलं असतं तूला, म्हणून थांबलो आणि नाही लिहीलं. तू त्या ब्लॉगमध्ये आपली पहिली भेट कुठे झाली ते मेन्शन केलंयस. पण आपली दुसरी भेट केव्हा झालेली, ते नाही आठवत आहे मला. तूला आठवतंय का…. ते आठवण्याच्या नादात मला बाकीचं बरंच काही आठवतंय. म्हणजे आपण एकदा वांद्र्याच्या त्या गार्डनमध्ये बसलेलो. तुझे बाबा तुला हॉस्पिटलमध्ये नोकरी बघत होते वगैरे म्हणून तू फ्रस्टरेट झालेलास आणि बरंच काही बोलत होतास. सगळं कळत असूनही...