मी मज हरपून...

त्यानं फोन स्विच ऑन केला. आताशा दोन आठवडे निघुन गेले होते. तो भानावर आला होता. पण राग काही शमला नव्हता. चुकून कुठंतरी व्यक्त होऊ म्हणून त्यानं व्हॉट्सअप, फेसबुकवरचा स्टेटसही अपडेट केला नव्हता. रागाच्या भरात तिला फोन लावू म्हणून मुद्दाम फोनमध्ये बॅलन्सही भरला नव्हता. सगळं काही जाणीवपूर्वक. जाणूनबुजून. आज काही ती फोन करणार नाही. त्याला खात्री होती. दोन आठवडे फोन बंद ठेवल्यावर ती कशाला आपल्याला करेल फोन? तिलाही आला असेलच की राग. आपण करावा का तिला फोन? तिला बिचारीलाही आपल्यासारखंच वाटत असेल ना? एकटं एकटं. बट व्हाय शूल्ड अलवेज आय? हा विचार खाटकन त्याच्या डोक्यात शिरला. तिला फोन करण्याचा विचार त्यानं सोडून दिला. स्वतःला उगाचच कशात तरी गुंतवून घ्यावं.. त्यानं ठरवलं. पण कशात जीव गुंतवावा या विचारात असतानाच… फोन वाजला… रिंगटोन होती… मी मज हरपून.. बसले गं.. आशा ताईंच्या आवाजातलं गाणं.. सखी मी मज हरपून…. बसले गं.. सुरु होण्याआधीचं त्यानं तप्तरतेनं फोन रिसिव्ह केला… कानाला लावला.. फोन आलाच तर काय बोलायचं आणि काय नाही… हे ...