'ही' शान कोणाची?

राग आला की मी बोलणं टाळतो. राग आला की मी मनाला 'वाट्टेल ते' लिहीतो. तेव्हाही मला राग आला होता आणि आताही आलाय. पण तरी मी काहीच बोललो नाही. लिहीणं जास्त सोप्पयं. बोलण्याने लोक दुखावले जातात.. शिवाय काही थोड्या लोकांना हल्ली मन पण असतं... त्यालाही जखम होण्याची शक्यता असते. म्हणून लिहून काढलं की कस्सं आपल्या मनाला ही शांती मिळते आणि समोरच्याला इजा ही होत नाही. असो. तर... रागाचं कारण महत्वाचं नाही. बिहाइंड द स्टोरी सांगतो.. हे खरंतरं खूप आधी लिहीलं होतं.. दोन महिन्यांपूर्वी. पण काय परिस्थिती.. आजही तस्संच चित्रय. मी हे लिहीलं. गुरुला दाखवलं. त्याला खूपच आवडलं. 'ब्लॉगवर टाकू नकोस हे', असं मला त्यानं बजावलं आणि तरी ते लोकांपर्यंत पोहोचलंच. अर्थात कल्पेश राणेच्या नावाने. आता तो कल्पेश राणे मीच होतो हे काहींना कळलंय. त्यामुळे मला हे उघडपणे टाकण्याचा मोह आवरत नाहीये. तेव्हा जसा आला होता.. तस्साच किंबहुना त्यापेक्षा जास्त राग यावेळी आलायं. टायटलचा आणि ब्लॉगचा काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजू नये. ऑफ द रेकॉर्ड असलेला ब्लॉग पुढे कॉपी पेस्ट...