...दहीहंडीसाठी 'पुन्हा' वाट्टेल ते?

दहीहंडीला अजून तसा बराच वेळंय. पण पुढच्या आठवड्यात गुरुपौर्णिमेला गोविंदा पथकांच्या सरावाचा नारळ फुटेल. पण खरंतर त्या आधीच दहीहंडीच्या बातम्यांचा नारळ फुटलाय. आशिष शेलार, प्रताप सरनाईक जोडीनं चॅनलवाल्यांना बाईट देताना दिसतायेत. साहसी खेळात दहीहींडीचा समावेश होण्याच्या शक्यता वाढल्याच ते सांगतायेत. नवी स्वप्न गोविंदा पथकांना दाखवली जातायेत. आनंदी आनंदय. आता दहीहंडीच्या उलट सुलट चर्चा सुरु राहतीलंच. पण पुन्हा एकदा या सीजनल बातम्यांना पेव फुटलंय. त्यावर प्रत्येक चॅनेलने एक-एक तासाचं डिस्कशन घेतलं तर आश्चर्य वाटायला नको. दहीहंडीबाबत थोडा सिरियसली विचार केला जातोय.. याचा आनंद आहेच.. त्याबद्दल कौतुक व्हायलाच हवं. पण… बरोब्बर चार वर्षांपूर्वी..२०१२ मध्ये दहीहंडीवर डॉक्युमेन्ट्री बनवली.. दहीहंडीसाठी वाट्टेत ते… हे त्या डॉक्युमेन्ट्रीचं नावं. दहीहंडीने नवी ओळख दिलीये. जेव्हा डॉक्युमेन्ट्रीवर काम करायला घेतला, तेव्हापासून ते आत्तापर्यंत अजूनही हा विषय जैसे थेच आहे. म्हणजे दहीहंडीविषयीचे जे प्रश्न घेऊन आम्ही उत्तर शोधायला चार वर्षांपूर्वी बाहेर पडलो.. तेच प्रश्न काल परवा मला विचारले...