Posts

Showing posts from December, 2014

सुगंधी जखमा

Image
आपला जन्म मुळातच मरण्यासाठी झालेला आहे, यावर त्याचा ठाम विश्वास होता. जगण्यासाठी जन्माला आलेल्यांना हे तो किंचाळून किंचाळून सांगू लागला होता. त्याला मरणाची एवढी ओढ लागली होती, की तो मरणावर प्रेम करायला लागला. मरण्यासाठी जगू लागला. कधीतरी श्वासांना थांबवायचंय म्हणून तो प्रत्येक श्वास मोजायला लागला. हृदयाच्या ठोक्यांचा अंतर्मुख करणारा आवाज त्याला मरणाची साद घालत होता. तल्लीन होउन, डोळे मिटून तो मरणाची वाट बघत होता. आणि तेव्हा त्याला फराज च्या दोन ओळी आठवल्या. वफ़ा के ख़्वाब मुहब्बत का आसरा ले जा अगर चला है तो जो कुछ मुझे दिया , ले जा ... कधी कोणे एके काळी तो कोणावर तरी प्रेम करुन हरला असेल. अदरवाईज अशी गझल कुणाला का आठवावी. तशाच मिटलेल्या डोळ्यांनी तो देशी दारुच्या त्या दुकानासमोर निमुटपणे जेव्हा झोपी गेला तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. पहाटेची चाहूल लागत होती. कुत्रे आळसावलेल्या आवाजात भुंकत होते. रुममेटचा फोन लागत नाही म्हणून आम्ही तीघे त्याला शोधायला बाहेर पडलो. नेहमीच्या नाक्यांवर चक्रा मारल्या. रात्रभर धावपळ. पोलिसांत जाण्याअगोदर १० वेळा विचार केला. पोलिसांकडे जायला तशी ...

सांगण्यासारखी गोष्ट अशी... की

Image
२०१४ आता संपायला आलंय. या वर्षात नाय बरेच डॉक्युमेन्ट्रीचे प्रोजेक्ट करायचं ठरवलेल. नाय नाय म्हणता त्यातले बरेच अर्धवट राहीले. काही फक्त डोक्यात अजूनही निपचित एका कोप-यात पडून आहेत. काहीं बद्दल खूपदा फॉलो अप करुनही एक्जिक्यूट करायला जमलेच नाहीत. असं सगळं असतानाही खूप समाधानकारक वर्ष होतं २०१४ असं म्हणायला हरकत नाही. या वर्षात अधिकाधिक कमरशिअल होत असतानाही स्वतःला करावेसे वाटणारे प्रोजेक्ट करता आले.. त्या साठी नोकरी सोडावी लागली नाही, याचं मला विशेष कौतुक वाटतंय. माझं मीच अभिनंदन करतो... सांगण्यासारखी गोष्ट अशी... की गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात माझ्या हातून एक भयंकर अपघात घडला. संध्याकाळची वेळ होती. देवगड हून गोव्याला बहीणीकडे तिचीच वँगेनार गाडी घेउन निघालो होतो. सोबत आई बाबा, आणि बहीणीचे सासरे होते. एकूण आम्ही चौघे जण. आमच्या घरात बाईमाणूस सहसा कधी ड्रायवर च्या बाजूच्या सीटवर बसत नाही. हे असं का ते विचारलं नाही कधी.. पण आई एकटीच स्त्री कँटेगरी मध्ये असल्यामुळे मी तिला त्या दिवशी पुढे बसायला सांगितलं. त्याप्रमाणे ती बसलीही. साधारणपणे संध्याकाळी चार च्या दरम्यान आम्ही...