...माझा महाराष्ट्र?

निवडणूका जवळ आल्या कीच राजकिय घडामोडींना उधाण येत. स्वाभाविकच आहे ते. पण २५ तारिख इतिहासात नोंदवली गेली. २०१४ च्या घटस्थापनेच्या दिवशी असा राजकिय इतिहास घडेल याची जराही अपेक्षा नव्हती. आघाडी मध्ये बिघाड झाल्याच जराही आश्चर्य नव्हतं. पण दोन्ही युत्या एकाच दिवाशी तुटल्यामुळे वर्ल्ड ब्रेकअप डे साजरा झाल्या सारखं वाटलं. राजकारणातलं मला १ टक्का ही कळत नाही. त्यामुळे मला त्याच्यातले अंदाज वगैरे लावता येत नाहीत. पत्रकार कुठलाही असला तरी राजकारण हा त्याचा फेव्हरेट हॉट टॉपिक आहे आणि नेहमीच राहील. असं असताना राजकारणातल्या अभ्यासापासून मी काहीसा लांबच राहत आलोय. पण तरी यंदा ज्या काही चर्चांना उधाण आलंय, वेगवेगळे निष्कर्ष लावले जातायेत..त्यांचा एकूणच आढावा घेतला तर माझ्या मनात खुप प्रश्न कल्ला करतायेत. त्यातले काही अगदीच बाळबोध आणि टुकार असले तरी ते प्रश्न जिवंत आहेत...आपण जाणकार असाल तर यावर बोलावं...मार्गदर्शन करावं... हक्कानं समजवावं... सेनेला १५१ जागा हव्या होत्या पण त्यातल्या अर्ध्या तरी कन्फर्म निवडून येतील असं होतं का.. उद्धव यांनी मुख्यमंत्री होण्याआधी नगरसेवकाच तरी काम केलंय ...