तुझे गरम ओठ ओठावर टेकलेस तेव्हा

नारायण सुर्वे. एक विद्रोही, बंडखोर कवी. ते आणि त्यांच्या कवितांवर एक सुंदर माहितीपट बनलेला आहे. माहितीपट ग्रेटच. त्यात किशोर कदम सारख्या कवी मनाच्या अभिनेत्यानी साकारलेली नारायणाची व्यक्तिरेखाही तितकीच सरस. माहितीपटामध्ये ही कविता ऐकलेल्याच आठवत नाही. माहितीपटाचा विषय ही थोडासा गिरणी कामगारांच्या लढ्याचे रंग दाखवणारा असाच होता. त्यामुळे कदाचित ही कविता त्यात समाविष्ट करता आली नसावी. नक्षत्रांचे देणे कार्यक्रमाचे यु ट्ब वर व्हीडीओ पाहत असताना त्यात नारायण ची ही कविता चंद्रकांत काळेंनी सुरेख सादर केलेली. दिवसभर डोक्यात कविता फिरत होती. त्याच दिवशी रात्री गुरु भेटला. गप्पा मारताना ह्या कवितेची याद आली. कवितांचा विषय निघाला. आणि अनायसे त्याच्याकडे असलेल्या कवितेच्या पुस्तकांमध्ये ही कविता असलेल्याचं कळालं. पुस्तकच ठेउन घेतलं. रात्रीत जवळपास अख्खं पुस्तक फस्त केल वाचून. पुस्तकातल्या इतर कविताही ग्रेट आहेत. पण सुर्वेंची सत्य भारीच. कवितेंच नाव – सत्य. एवढं साधं सोप्प सत्य कवितेत मांडता येऊ शकतं याच कौतुक वाटतंय. नेहमीच वाटत राहिल. कविता संग्रही असावी म्हणून खाली कॉपी पेश्ट... तुझे ग...