अविचारी

संतोष भिसे नावाचा आपला एक फ्रेन्ड आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये एम.एफ.ए.चा स्टूडंन्ट आहे. यानं कमर्शिअल केलंय, औरंगाबादहून. मूळचा नगरचाय. पोरगा हुशार, मेहनती वगैरे आहेच. पण महत्वाचं म्हणजे एकदम डाउन टू अर्थ आहे. आपल्याला डाउन टू अर्थ असलेली माणसं खूप ग्रेट वाटतात. आपल्या मनात संतोष बद्दल भरपूर रिस्पेक्ट. संतोष ला कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट आहे एम.एफ.ए.चा. त्यासाठी त्याने काही पेन्टीग्स केल्यात. त्यावर त्याला काहीबाही लिहून हवं होतं. मदत मागितली माझ्याकडून. मी पण त्याला देईन लिहून, असं सांगितलेलं. पण चित्र पाहून वेगळं असं काही लिहावसं वाटत नव्हतं. चित्र खूप बोलकं होतं. पण त्याला कॉपी हवीच आहे, अशी अट त्या प्रोजेक्ट मध्ये होती. खूप दिवस.. जवळपास आठवडा विचार करण्यात गेला. कॉन्सेप्ट बँचलर रुमची होती. अशा चार मित्रांसोबत एकत्र येउन मुबई पुण्यासारख्या शहरात मी कधी राहिलेलो नाहीये. कारण मूळच मुंबईचं. त्यामुळे बँचलर्स रुम या कॉन्सेप्टवर मी लिहीलेलं सर्रास चुकीचंच असणार, अशी मला खात्रीच होती. ते...